Friday, November 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राची बदनामी

गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राची बदनामी

राजकीय
मुंबई/दि/गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी केंद्राकडून केली जात आहे, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला आहे.दरम्यान, या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला आहे, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्याने कोर्टकचेर्या करत आहे, असे म्हणत भुजबळांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. ते पुण्यात बोलत होते. गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ते कुणी आणले, कुठून आणले, का आणले याची काही चौकशी नाही. दुसरीकडे २ ग्रॅम सापडले, ५ ग्रॅम सापडले असे करत सर्वांचं लक्ष ३० हजार कोटीच्या ड्रग्जवरून हटवून महाराष्ट्रावर आणले जात आहे. न्यायालयाने हे सर्व ऐकून निर्णय दिला आहे. आता...
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची  सततची भाववाढ नेमकं काय घडवणार आहे ?

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची सततची भाववाढ नेमकं काय घडवणार आहे ?

राजकीय
पेट्रोलची गरज दुचाकी वापरायला, खाजगी वाहनांना सगळ्यात जास्त लागते. भारतातली ९० टक्के मालवाहतूक डिझेल मालवाहू वाहने, डिझेल रेल्वे इंजिन, डिझेलवर चालणार्‍या जलवाहतूक बोटी याद्वारे होते. डिझेलच्या किमतीत होणारी वाढ थेट सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढवायला कारणीभूत ठरते. अजूनही मालवाहतूक करणार्‍या टेम्पो, तीन चाकी वाहने, ट्रक यांना डिझेलचे भाव जेवढे वाढलेत त्या प्रमाणात भाडे वाढवून मिळालेले नाहीत. डिझेलच्या भाववाढीच्या नावाखाली सगळा मलिदा आणि मलाई फक्त व्यापारी खात आहेत. या वाहतूक व्यवसायिकांना कमी भाड्यात धंदा करणे अपरिहार्य आहे, नफा अतिशय कमी असला तरीही कर्जाचे हप्ते, वाहनाचे टायर्स, विमा, सरकारी कर या सगळ्यांना पर्याय नाही म्हणून वाहतूकदार अतिशय कमी मार्जिनवर काम करत आहेत, मात्र या कोंडीचा स्फोट कधीही होऊ शकतो आणि वस्तूंच्या किमतीत अजून जास्त आणि मोठी भाववाढ होऊ शकते. ही महागाई अभूतपूर्व ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे- आंबेडकर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे- आंबेडकर

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळा साठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर पनवेल या पट्टयातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी जमिन दिली आहे. या बांधवांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे. नवी मुंबई च्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखिल दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते.पनवेल चे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. नि लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच महाराष्ट्राच्...
तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं; बाळासाहेब आंबेडकर

तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं; बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/अकोला/दि/विजय वडेट्टीवारांनी अनलॉक जाहीर केल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यात लॉकडाऊन कायम असल्याचं प्रसिद्धीपत्रक काढलं. त्यामुळे ठाकरे सरकारमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आलीय. भाजपनं हा मुद्दा उचलून धरत रान पेटवलंय, तर सत्ताधार्‍यांमध्येही एकमेकांना चलबिचल पाहायला मिळत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनीही या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची अन् भाजपवर टीका करायचीवंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसला मोलाचा सल्ला दिलाय. एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं, असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाही, असंही त्यांनी सुनावलंय.आपत्ती व्यवस्...
पुणे महापालिकेच्या पद्मावती येथील शिवशंकर पोटे दावाखान्यात नगरसेवकांची आरेरावी

पुणे महापालिकेच्या पद्मावती येथील शिवशंकर पोटे दावाखान्यात नगरसेवकांची आरेरावी

राजकीय
कोरोना व्हॅक्सिन कुणाला दयायचे हे नगरसेवक ठरवितात, वैदयकीय अधिकारी अळी-मिळी-गुप-चीळी पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या पद्मावती येथील सरकारी दवाखान्यात कोरोनावर व्हॅक्सिन देण्याचे काम केले जात आहे. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक नागरीक रांगेत उभे असतात. दवाखाना साडेनऊवाजता उघडला जातो. नगरसेवकांचे कारकर्ते ९ वाजता येवून थांबतात. नगरसेवक दहा वाजता येतात. मग त्यानंतर प्रत्येकाला टोकन देण्याचे काम केले जाते. परंतु पहाटेपासून थांबलेल्या नागरीकांना टोकन देण्याऐवजी नगरसेवकांच्या लोकांनाच टोकन देवून व्हॅक्सिन घेण्यासाठी पाठविले जात असल्याने स्थानिक नागरीकांमध्ये प्रचंड आणि कमालिचा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत माहिती अशी की, पुणे महापालिकेच्या शिवशंकर पोटे दवाखान्यात व्हॅक्सिन देण्याचे काम केले जात आहे. नागरीक भल्या पहाटेच येवून नंबर लावत आहेत. अशा वेळी लाईनमध्ये थांबलेल्या नागरीक...
मराठा आरक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी राजेंचा एकत्रित लढण्याचा निर्धार, राजसत्तेसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी पुढाकार घ्यावा – आंबेडकर

मराठा आरक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी राजेंचा एकत्रित लढण्याचा निर्धार, राजसत्तेसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी पुढाकार घ्यावा – आंबेडकर

राजकीय
पुणे: मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं हा एक मार्ग आहे. ही याचिका फेटाळल्यानंतर दुसरी याचिका करता येते. हा एक मार्ग आहे. पण सत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी संभाजी छत्रपती यांना बहुजन समाजाचं नेतृत्व करण्याचं आवाहनच केलं. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठीचा महत्त्वाचा उपायही सांगितला. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल...
गरीब मराठ्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे! ऍड. आंबेडकर

गरीब मराठ्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे! ऍड. आंबेडकर

राजकीय
जोपर्यंत गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांच्या पोटात आहे तोपर्यंत त्याच्यात वेगळेपण दिसणारच नाही. आतापर्यंत गरीब मराठा जातीसाठी माती खात राहिला पण, दुर्दैव ज्या गररीब मराठयाने श्रीमंत मराठ्याला सत्तेत बसवलं त्याने गरीब मराठ्याकडे पाठ फिरवली आहे. वंचित बहुजन आघाडी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशीच भूमिका सुरुवातीपासून मांडत आली आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल दिला आणि असा निर्णय कायद्याचे जे जाणकार आहेत त्यांच्यासाठी नवीन नाही. दुर्दैव हे आहे की, मराठा समाज नेहमीच आणि त्यापैकीच श्रीमंत मराठा, हा आपल्या संख्येच्या आणि मनगटाच्या जोरावर आपण सर्वकाही मिळवू शकतो अशी त्याची मानसिकता आहे. संख्येच्या जोरावरती विधानसभा जिंकता येते तसेच इतर सत्ता बळकवता येतात. आज तोच मराठा समाजात विरोधात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सत्तेची बळकट स्थाने ही म...
पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !

पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/दि. ७ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे.देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील कर्मचार्‍यांना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळू नये याचे प्रयत्न सतत या संघटनांकडून करण्यात येतात. या धर्मांध संघटनांचा हा आरक्षण विरोधी अजेंडा स्वतःला पुरोगामी म्हणवणारे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार का अमलात आणत आहे असा प्रश्न आता मागासवर्गीय समाजातून विचारला जात आहे.पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटरवर चांगलाच समाच...
राज्यातील ७ कोटी मागासवर्गीयांसाठी असलेले ३३ टक्के पदोन्नतीचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारकडून रद्द

राज्यातील ७ कोटी मागासवर्गीयांसाठी असलेले ३३ टक्के पदोन्नतीचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारकडून रद्द

राजकीय
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. राज्यातील शासनात मराठा समाजाचे अ, ब, क व ड संवर्गात पुरेसे प्रतिनिधीत्व असल्याची माहिती गायकवाड कमिशननेच दिली होती. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले. ७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले, अगदी त्याच दिवशी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ६ कोटी मागासवर्गीयांसाठी असलेले ३३ पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णया जारी करण्यात आला आहे. भारतीय संविधानातील कलम १६ नुसार अनु. जाती, अनु. जमाती यांचे आरक्षण घटनातीत आहे. त्यांच्या आरक्षणावर कुणीच मर्यादा घातली नाही. त्यांच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने १८ मे २०१८, १५ जुन २०१८ व २६ सप्टेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने नमूद केले की, अनु. जाती, अनु. जमाती यांचे मागासलेपण मोज...
फडणवीसांना हप्तेखोरीचा अनुभव, आरएसएसला किती वाटा दिला? नाना पटोले यांचा सवाल

फडणवीसांना हप्तेखोरीचा अनुभव, आरएसएसला किती वाटा दिला? नाना पटोले यांचा सवाल

राजकीय
मुंबई/दि/गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत कॉंग्रेस का बोलत नाही असा सवाल करणार्‍या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टोला लगावला आहे. फडणवीस यांना मोठा हप्तेखोरीचा अनुभव आहे. त्यांनी पाच वर्षात आरएसएसला किती वाटा दिला? असा सवाल करतानाच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर पलटवार केला. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करीत आहेत असा टोला पटोले यांनी हाणला. पाच वर्षे सत्तेत असताना मंत्रालयात आरएसएसचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते. ते किती वसुली करत होते, त्यातला किती वाटा आरएसएसला जात होता याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमं...