Wednesday, November 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: nationalforumcrimenews

पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात आरोपी, फिर्यादींसह नातेवाईकांचा राडा, पोलीसांना धक्काबुक्की,

पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात आरोपी, फिर्यादींसह नातेवाईकांचा राडा, पोलीसांना धक्काबुक्की,

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 येथे समर्थ पोलीस ठाण्याकडील आरसीसी प्रकरण बोर्डावर असतांना, न्यायालयाकडून आदेश पारित करतांना, फिर्यादी व आरोपींमध्ये वाद होवून एकमेकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. मध्यस्थी करणाऱ्या पोलसांना शिवीगाळ करून पोलीस व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना एक हजार रूपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 येथे शुक्रवार दि. 30 ऑक्टोंबर रोजी समर्थ पोलीस ठाण्याकडील ( महाराष्ट्र शासन विरूद्ध प्रशांत नामदेव पवार व इतर ) आरसीसी प्रकरण बोर्डावर होते. न्यायालयाचे कामकाज साधारण 11.50 वाजण्याच्या सु...
स्वारगेट बसस्टॅन्डवर सापडला 3 लाख रुपये किंमतीचा 6 किलो गांजा, अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे स.पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांची कामगिरी

स्वारगेट बसस्टॅन्डवर सापडला 3 लाख रुपये किंमतीचा 6 किलो गांजा, अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे स.पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांची कामगिरी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आरोपीतांची चोरटी नजर ओळखायची कला फक्त पोलीसांकडेच आहे. थोडादेखील वहीम बळावला तरी आरोपी पोलीसांच्या ताब्यात अलगद आलाच म्हणून समजा. अगदी असाच प्रकार स्वारगेट बस स्टँन्ड जवळ घडला. स्वारगेट बस स्टँन्डच्या बाजुस असलेल्या पार्कींग मध्ये दोन इसम संशायास्परित्या थांबले होते. जेंव्हा त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळ सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा 6 किलो गांजा आढळुन आला. गुन्ह्याची हकीकत अशी की,स्वारगेट पोलीस स्टेशन परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या अनुषंगाने कारवाई करणे बाबत वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सुचनांनुसार दि. 28 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 02 कडील पोलीस निरीक्षक श्री. जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व स्टाफ असे अंमली पदार्थ विरोधी पेट्रोलिंग व कारवाई करण्याच्या उद्देशाने पुणे शहर हद्दीमध्ये स्व...
बंदूका सापडतात भारतीच्या हद्दीत, फायरिंग होते सहकारनगरात…

बंदूका सापडतात भारतीच्या हद्दीत, फायरिंग होते सहकारनगरात…

पोलीस क्राइम
सर्व आरोपी आणि फिर्यादी सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीच्या बाहेरचे, तरीही हद्दीत फायरिंगच्या दोन घटना नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(विश्लेषण)सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदे हायस्कुल जवळील बिकानेर चौक गजलक्ष्मी सोसायटीजवळ बुधवार (दि. 10 जून) रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या गोळीबारापूर्वी धनकवडी बालाजीनगर येथे आंदेकर टोळीने गोळीबार केल्याची घटना घडली होती. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत दोन्ही ठिकाणे येत असले तरी, गोळीबार करणारे आरोपी आणि फिर्यादी हे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील असल्याचे समोर आले आहे. तथापी मागील सहा महिन्यांतील ऑर्म ॲक्ट नुसार सर्वाधिक जास्त अग्निशस्त्रे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आली आहेत. परंतु फायरिंगसाठी सहकारनगरची जमीन निवडली गेली आहे काय अशी शंका उपस्थित होत आहे. शिंदे हायस्कुलजवळ फायरिंग -सहकारनग...
मध्यवर्ती पुण्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीसांना यश

मध्यवर्ती पुण्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीसांना यश

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/अप्पा बळवंत चौक ते मंडई, मडई ते शनिवारवाडा, अप्पा बळवंत चौक ते रेडलाईट एरिया या संपूर्ण दाट लोकसंख्येच्या भागावर सीसीटीव्हीची नरज असली तरी पुणे शहरातील उपपोलीस आयुक्तालय असलेले फरासखाना इमारतीतील पोलीस आणि ज्या गुन्हेगारांचा इथे सतत राबता असतो, त्याच फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर हदीत 12 फेबु्रवारी श्री भारतीय इलेक्ट्रानिक्स नावाचे दुकानाचे शटर उचकटुन सुमारे 1 लाख 25 रूपयांच्या इलेक्ट्रीकल पॉलीकॅब वायर चोरी झाल्याचा गुन्हा घडला होता. सीसीटीव्ही, पोलीस आणि सराईत गुन्हेगारांच्या नजरेखाली चोरी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. तथापी फरासखाना पोलीसांनी देखील प्रयत्नांची पराकष्टा करीत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळाले आहे. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार य...
ब्रेकअप केल्याचा रागातून ऊस गुऱ्हाळातील हत्याराने मित्रावर वार, धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील थरारक घटना

ब्रेकअप केल्याचा रागातून ऊस गुऱ्हाळातील हत्याराने मित्रावर वार, धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील थरारक घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील ऊसाच्या गुऱ्हाळातील, ऊस तोडण्याच्या हत्याराने आरोपीवर वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा थरारक प्रकार घडला आहे. 2 फेब्रुवारी रोजी फिर्यादी व आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय 24 वर्षे रा. समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे असे संजीवनी बार त्रिमुर्ती चौक, येथे बोलत बसले होते. फिर्यादी यांनी आरोपीस त्याच्या मैत्रिणीपासून ब्रेकअप घडवून, त्यांच्यात भांडण लावून, त्याने कॉल केल्याच्या रागातून आरोपी चेतन चव्हाण याने बाजूच्या ऊसाच्या रसवंती गृहातील ऊस तोडण्याचे हत्यार घेवुन आज तुला जिवंत सोडणार नाही.... असे म्हणून त्या कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हातावर, डोक्यावर, डाव्या पायाचे नडगीस व कानास हत्याराने वार करुन गंभीर जखमी करून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी विरूद्ध भारती विदयापीठ स्...