Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

कॉंग्रेस ची अवस्था जुन्या जमीनदारासारखी?

कॉंग्रेस ची अवस्था जुन्या जमीनदारासारखी?

राजकीय
घराणेशाही आणि एकाधिकारशाही यांचा अनिष्ट संगम असलेला पक्ष म्हणून कॉंग्रेसची ख्याती आहे. बिगरभाजपवादी पक्ष कॉंग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास करण्यास तयार नाहीत. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला घराणेशाहीचा मोह सुटत नाही. बहुतांश घटकराज्यांत भाजपची किंवा भाजपप्रणीत राज्य सरकारं असल्यामुळे राज्यपातळीवरील पक्षसंघटना डबघाईला आलेली आहे. आहेत त्या नेत्या-कार्यकर्त्यांत सुसंवाद नाही, अशा परिस्थितीत २५ वर्षांपूर्वी २८८ पैकी २०० आमदार असलेला कॉंग्रेस पक्ष आज केवळ ४४ आमदारांवर आलेला आहे. तरीही कॉंग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सातत्याने सांगणारे नाना पटोले ह्यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसच्या नशिबी राज्यात फरफटत जाणे एवढेच आहे. ह्या फरफटीला अधिकच गती दिली ती तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी. कहा है युपीए? यूपीए आता उरली नाही, असा जबरी टोला ममता बॅन...
महागाईचा महाउद्रेक

महागाईचा महाउद्रेक

राजकीय
पुणे/दि/अच्छे दिनाचे वादे करून लोकांना फसवणार्‍या केंद्रातील भाजपा सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवले नसून या महागाईत गरीब मात्र होरपळताना दिसत आहे. भारतातील महागाई १४.२३ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर गेली असल्याने आज गरीबासमोर जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.यापूर्वी डिसेंबर १९९१ मध्ये इतकी उच्चांकी पातळी होती. देशात घाऊक महागाई वाढण्याचा दर एप्रिलनंतर सलग दुहेरी अंकात आहे. केंद्राकडून मंगळवारी जारी घाऊक महागाईच्या आकडेवारीबाबत आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या, ‘अंदाजापेक्षा जास्त महागाई वाढली आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर ५ टक्केपेक्षा कमी होता. घाऊक महागाई १४ टक्क्यांवर गेली आहे. यामुळे आगामी दिवसांत सामान्य ग्राहकांवर त्याचा परिणाम होणे अटळ आहे. महागाई वाढीच्या आंतरराष्ट्रीय कारणांचा परिणाम फक्त भारतावरच झालेला नाही. सामान्यपणे महागाई वाढीचा कमी दर असलेल्य...
ST कर्मचार्‍यांच्या संपावर  Media गप्प का?

ST कर्मचार्‍यांच्या संपावर Media गप्प का?

राजकीय
कर्मचार्‍यांचा संप माध्यमांनी जास्त कव्हर का केला नाही, माध्यमांची नेमकी काय भूमिका आहे. जवळपास सर्वच माध्यमे गोदी मिडिया आहेत, ही माध्यमं जनसामान्यांचे प्रश्न का कव्हर करत नाहीत. एस टी कर्मचारी जीवाच्या आकांताने लढतोय, मग माध्यमांना त्यासाठी जागा का द्यावीशी वाटत नाहीय. माध्यमांचं नेमकं काय चुकतंय. आर्यन खान साठी दहा बारा टीम लावणारी माध्यमे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी का पडतायत?जीवावर उदार होऊन एसटी कर्मचारी शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी आंदोलन करत आहेत. नक्कीच माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक पार पडली. राज्य शासनाने यापूर्वीही महामंडळाचे शासकीय विलीनीकरण शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे.कार्यकर्ते एसटी कर्मचार्‍यांच्या इतर मागण्या मान्य करून हा संपवु शकतो का? प्रसार माध्यमांचे या आंदोलनाकडे दुर्लक्ष का? प्रसारमाध्...
मोदीजी आणि भाजप नेते माफी मागणार का?

मोदीजी आणि भाजप नेते माफी मागणार का?

राजकीय
शेतकर्‍यांच्या लढ्यापुढे सपशेल माघार घेत पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी माफी मागत असल्याचेही सांगितले. शेतकर्‍यांपुढे सरकारने माघार घेतल्याची ब्रेकिंग न्यूज सर्वत्र चालली…. शेतकर्‍यांनी, विरोधी राजकीय पक्षांनी जल्लोष केला, तर भाजपचे नेते मोदींच्या माघार घेण्याला ग्लॅमर मिळवून देण्याच्या प्रयत्नात दिसले. पण एकीकडे शेतकर्‍यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणणार्‍या मोदींनी याच शेतकर्‍यांनी आंदोलनजीवी म्हटले होते, त्याबद्दल ते माफी मागणार का, हा प्रश्न आहे.केवळ मोदीच नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांनी आंदोलक शेतकर्‍यांवर असभ्य टीका करण्यापासून ते त्यांना दहशतवादी ठरवण्यापर्यंत वक्तव्य केली होती. यापैकी काही वक्तव्ये खालील प्रमाणे * पंतप्रधान नरेंद्र मोदी -शेतकरी आंदोलनामागे आंदोलनजीवी नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री - गर्दी जम...
देखभालीसाठी ५८ कोटी – सर्वच राजकीय पक्ष व नगरसेवकांचे मिले सुर मेरा तुम्हारा

देखभालीसाठी ५८ कोटी – सर्वच राजकीय पक्ष व नगरसेवकांचे मिले सुर मेरा तुम्हारा

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/देखभालीसाठी ५८ कोटी रुपये देणे म्हणजे पुणेकरांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या टाकलेला हा दरोडा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणेकरांची अशी ही लुट कधीही होऊ देणार नाही त्यााठी वाट्टेल तो त्रास सहन करण्याची आमची तयारी असल्याची असल्याची राणाभिमादेवी थाटात वल्गना करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित कॉंग्रेसने आजच्या सर्वसाधारण सभेत यु टर्न घेतला. कोणत्याही अडथळ्याविना ५८ कोटी ९४ लाख रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली. शिवेसेनेच नगरसेवक तटस्थ राहिले तर आरडा ओरडा बहाद्दर नगरसेवक ऐनवेळी सभागृहातून गायब झाल्याने ५८ कोटी निविदेसाठी सर्वच राजकीय पक्षांचे मिले सुर मेरा तुम्हारा असल्याचे दिसून आले आहे. ५८ कोटी रुपयांच्या केवळ देखभाल निविदेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे त्याची तक्रार ईडीकडे करण्यात येणार असल्याची भाषा कालपर्यंत बोलली जात होती. मिडीया समोर देखील अशा प्रकारच्या आणा...
बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांचे कारण

बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांचे कारण

राजकीय
पुणे/दि/राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर दहशतवादी आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून एलबीएस रोडवरील ३ एकर जागा खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.ऍड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही? त्यांनीच कारवाई का केली नाही? आता स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठीच मलिकांचे प्रकरण काढले. आपल्यावर शेकले जाते त्यावेळी त्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरी माहिती द्यायची. आपल्यावर झालेले आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी हे सर्व केले आहे. आता न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे. न्यायालयाने फडणवीसांवर दाखल असलेले सर्व प्रकरणे निकाली काढावी, असेही आंबेडकर म्हणाले. ...
गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राची बदनामी

गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राची बदनामी

राजकीय
मुंबई/दि/गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी केंद्राकडून केली जात आहे, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला आहे.दरम्यान, या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला आहे, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्याने कोर्टकचेर्या करत आहे, असे म्हणत भुजबळांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. ते पुण्यात बोलत होते. गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ते कुणी आणले, कुठून आणले, का आणले याची काही चौकशी नाही. दुसरीकडे २ ग्रॅम सापडले, ५ ग्रॅम सापडले असे करत सर्वांचं लक्ष ३० हजार कोटीच्या ड्रग्जवरून हटवून महाराष्ट्रावर आणले जात आहे. न्यायालयाने हे सर्व ऐकून निर्णय दिला आहे. आता...
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची  सततची भाववाढ नेमकं काय घडवणार आहे ?

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची सततची भाववाढ नेमकं काय घडवणार आहे ?

राजकीय
पेट्रोलची गरज दुचाकी वापरायला, खाजगी वाहनांना सगळ्यात जास्त लागते. भारतातली ९० टक्के मालवाहतूक डिझेल मालवाहू वाहने, डिझेल रेल्वे इंजिन, डिझेलवर चालणार्‍या जलवाहतूक बोटी याद्वारे होते. डिझेलच्या किमतीत होणारी वाढ थेट सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढवायला कारणीभूत ठरते. अजूनही मालवाहतूक करणार्‍या टेम्पो, तीन चाकी वाहने, ट्रक यांना डिझेलचे भाव जेवढे वाढलेत त्या प्रमाणात भाडे वाढवून मिळालेले नाहीत. डिझेलच्या भाववाढीच्या नावाखाली सगळा मलिदा आणि मलाई फक्त व्यापारी खात आहेत. या वाहतूक व्यवसायिकांना कमी भाड्यात धंदा करणे अपरिहार्य आहे, नफा अतिशय कमी असला तरीही कर्जाचे हप्ते, वाहनाचे टायर्स, विमा, सरकारी कर या सगळ्यांना पर्याय नाही म्हणून वाहतूकदार अतिशय कमी मार्जिनवर काम करत आहेत, मात्र या कोंडीचा स्फोट कधीही होऊ शकतो आणि वस्तूंच्या किमतीत अजून जास्त आणि मोठी भाववाढ होऊ शकते. ही महागाई अभूतपूर्व ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे- आंबेडकर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे- आंबेडकर

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळा साठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर पनवेल या पट्टयातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी जमिन दिली आहे. या बांधवांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे. नवी मुंबई च्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखिल दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते.पनवेल चे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. नि लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच महाराष्ट्राच्...
तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं; बाळासाहेब आंबेडकर

तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं; बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/अकोला/दि/विजय वडेट्टीवारांनी अनलॉक जाहीर केल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यात लॉकडाऊन कायम असल्याचं प्रसिद्धीपत्रक काढलं. त्यामुळे ठाकरे सरकारमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आलीय. भाजपनं हा मुद्दा उचलून धरत रान पेटवलंय, तर सत्ताधार्‍यांमध्येही एकमेकांना चलबिचल पाहायला मिळत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनीही या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची अन् भाजपवर टीका करायचीवंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसला मोलाचा सल्ला दिलाय. एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं, असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाही, असंही त्यांनी सुनावलंय.आपत्ती व्यवस्...