Thursday, November 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Author: national forum

पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात आरोपी, फिर्यादींसह नातेवाईकांचा राडा, पोलीसांना धक्काबुक्की,

पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात आरोपी, फिर्यादींसह नातेवाईकांचा राडा, पोलीसांना धक्काबुक्की,

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 येथे समर्थ पोलीस ठाण्याकडील आरसीसी प्रकरण बोर्डावर असतांना, न्यायालयाकडून आदेश पारित करतांना, फिर्यादी व आरोपींमध्ये वाद होवून एकमेकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. मध्यस्थी करणाऱ्या पोलसांना शिवीगाळ करून पोलीस व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना एक हजार रूपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 येथे शुक्रवार दि. 30 ऑक्टोंबर रोजी समर्थ पोलीस ठाण्याकडील ( महाराष्ट्र शासन विरूद्ध प्रशांत नामदेव पवार व इतर ) आरसीसी प्रकरण बोर्डावर होते. न्यायालयाचे कामकाज साधारण 11.50 वाजण्याच्या सु...
स्वारगेट बसस्टॅन्डवर सापडला 3 लाख रुपये किंमतीचा 6 किलो गांजा, अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे स.पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांची कामगिरी

स्वारगेट बसस्टॅन्डवर सापडला 3 लाख रुपये किंमतीचा 6 किलो गांजा, अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे स.पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांची कामगिरी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आरोपीतांची चोरटी नजर ओळखायची कला फक्त पोलीसांकडेच आहे. थोडादेखील वहीम बळावला तरी आरोपी पोलीसांच्या ताब्यात अलगद आलाच म्हणून समजा. अगदी असाच प्रकार स्वारगेट बस स्टँन्ड जवळ घडला. स्वारगेट बस स्टँन्डच्या बाजुस असलेल्या पार्कींग मध्ये दोन इसम संशायास्परित्या थांबले होते. जेंव्हा त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळ सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा 6 किलो गांजा आढळुन आला. गुन्ह्याची हकीकत अशी की,स्वारगेट पोलीस स्टेशन परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या अनुषंगाने कारवाई करणे बाबत वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सुचनांनुसार दि. 28 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 02 कडील पोलीस निरीक्षक श्री. जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व स्टाफ असे अंमली पदार्थ विरोधी पेट्रोलिंग व कारवाई करण्याच्या उद्देशाने पुणे शहर हद्दीमध्ये स्व...
पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला क्राईम युनिट 2 ने केले जेरबंद,सहकारनगर, भारती व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्हे करून एक वर्ष फरारी आरोपीस साताऱ्यातून केली अटक

पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला क्राईम युनिट 2 ने केले जेरबंद,सहकारनगर, भारती व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्हे करून एक वर्ष फरारी आरोपीस साताऱ्यातून केली अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीतांनी सहकारनगर, भारती विद्यापीठ व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गंभिर स्वरूपाचे गुन्हे करून मागील एक वर्षांपासून फरारी होता. त्यातच सहकारनगर पोलीस स्टेशन यांनी सबंधित आरोपींवर एमपीडीए कायदयानुसार कारवाई केल्यानंतर देखील मागील एक वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत होता. अखेर युनिट दोन कडील पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर यांनी अतिशय शिताफिने आरोपीचा माग काढत, आरोपीला ता. म्हसवड जि. सातारा येथुन ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,पुणे शहरात विशेष मोहिमेअंतर्गत पाहिजे , फरारी आरोपीताचा शोध घेत असताना दि. 29 ऑक्टोंबर रोजी युनिट 2 कडील पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर यांना गोपनीय बातमी मिळाली की, सहकारनगर पोलीस स्टेशन एम.पी.डी.ए. कारवाई अनुषंगाने दि.03/10/2026 रोजी झालेल्या आ...
पुण्याच्या क्राईम युनिट एकने पकडला 10 लाखाचा गुटखा, पोलीस अंमलदार मंहमद हनिफ शौकत शेख यांची कामगिरी

पुण्याच्या क्राईम युनिट एकने पकडला 10 लाखाचा गुटखा, पोलीस अंमलदार मंहमद हनिफ शौकत शेख यांची कामगिरी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/मध्यवर्ती (सेंन्ट्रल) पुण्यातील पेठांमध्ये अंमली पदार्थांचे गैरव्यवहारांच्या अनुषंगाने क्राईम युनिट एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार तपास करीत असतांना, कादरभाई चौकातील लँडमार्क हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील गोडावुन मध्ये सुमारे 10 लाखाचा प्रतिबंधित गुटखा आढळुन आल्याने, आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,क्राईम युनिट एक कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंध व अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने तपास करीत असतांना, युनिट एक कडील मा. वरिष्ठांचे आदेशान्वये दि. 29/10/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 01 चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार मंहमद हनिफ शौकत शेख यांना एक गुप्त बातमती समजली की, कादरभाई...
पुण्यातील गणेश उत्सवा दरम्यान भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलीसांनी केला पर्दाफाश !

पुण्यातील गणेश उत्सवा दरम्यान भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलीसांनी केला पर्दाफाश !

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेवून, गणेश भक्तांना सर्व बाजुने घेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कटरच्या साहाय्याने कापुन, खिशातील मोबाईल, पैसे लुटण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी पोलीसात दाखल आहेत. दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी पुण्यात गणेश उत्सवा दरम्यान घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्याच्या सुचना पोलीसांना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, फरासखाना पोलीसांनी उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून 21 लाख 21 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सुमारे मंगळसुत्र चोरीचे 13 गुन्हे उघड केले आहेत. गुन्ह्याचा तपास पुण्यासह थेट परराज्यात जावून, आरोपींचा शोध घेवून, मुद्देमालासह त्यांच्या मुसक्या आवळण्यात व आरोपीतांना पकडुन थेट आणण्यात फरासखाना पोलीसांचे ...
<font dir="auto" style="vertical-align: inherit;"><font dir="auto" style="vertical-align: inherit;">कल्याणीनगर, येरवतील लॉजवर वेश्याव्यसायासाठी महिला पुरविवड्या आरोपी, दोन पिडीतांची सुटका</font></font>

कल्याणीनगर, येरवतील लॉजवर वेश्याव्यसायासाठी महिला पुरविवड्या आरोपी, दोन पिडीतांची सुटका

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील कल्याणीनगर येरवडा येथील लॉजवर वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्यांवर येरवडा पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. यात अनैतिक व्यापारास प्रवृत्त करणाऱ्या दोघांसह, पिडीत दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. येरवडा पोलीस स्टेशनकडील तपास पथक प्रभारी अधिकारी किशोर बेरड, पोलीस अंमलदार वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड व रामेश्वर नवले यांनी ही धडक कारवाई केली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत अनैतिक मानवी व्यापार करणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार नवले यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येरवडा येथील एका हॉटेल मध्ये एक इसम व त्याचे साथीदार हे ग्राहकांना फोनवर बुकींग करुन मुली अनैतिक व्यापार करण्यासाठी पाठवून विशिष्ट रक्कम ठरव...
वाई परिसरात गावठी पिस्टल मिरवुन, दहशत माजविणाऱ्या दोन आरोपींना पोलीसांनी केले गजाआड, दीड लाखांच्या देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्टलसह 5 जीवंत काडतुसे जप्त

वाई परिसरात गावठी पिस्टल मिरवुन, दहशत माजविणाऱ्या दोन आरोपींना पोलीसांनी केले गजाआड, दीड लाखांच्या देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्टलसह 5 जीवंत काडतुसे जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/वाई (सातारा)/ दि/प्रतिनिधी/हातात पिस्टल घेवून वाईमध्ये मिरविणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या वाई पोलीसांनी आवळल्या आहेत. सुदेश दिपक पाटणे व अक्षय विलास देसाई या दोन आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदरील गावठी पिस्टल ह्या स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडुन घेतल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली आहे. दोन्ही आरोपींकडील दोन गावठी पिस्टल व 5 जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 22 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,साताऱ्याच्या वाई तालुक्यातील मौजे शेंदुरजणे गावच्या हद्दीतील वाई ते सुरूर रोडवरील कॅनॉलजवळ एक युवक हातात गावठी पिस्टल मिरवुन दहशत माजवित असल्याची खबर वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सुर्यवंशी यांना समजल्यानंतर, त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक श्री. अमित स...
परराज्यातून अंमली पदार्थांची पुण्यात तस्करी, पाहिजे आरोपी दिपक तुपे याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले जेरबंद!

परराज्यातून अंमली पदार्थांची पुण्यात तस्करी, पाहिजे आरोपी दिपक तुपे याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले जेरबंद!

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/आंध्र प्रदेश, ओडीसा राज्यातून गांजा अंमली पदार्थाची विक्री पुण्यात करणाऱ्या पाहिजे आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. दोन यांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरामध्ये परराज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या संघटित टोळी विरोधात प्रभावी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पुणे शहर पोलीसांनी दिली आहे. वानवडी पोलीस स्टेशन, मध्ये गु.र.नं. 364/2026 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 20(ब) व 29 प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी दिपक आबाजी तुपे, (वय 39 वर्षे, रा. लेन नं. 01, राजस सोसायटी, गणपती मंदिराजवळ, विद्यानगर कात्रज, पुणे) यास अंमली पदार्थ विरोधी पथक 02. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे सोलापुर महामार्गावर पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले असुन दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आलेली आहे. आरोपी विरुद्ध यापुर्वी आंध्र प्र...
एक लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री तुड्येकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक

एक लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री तुड्येकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर हद्दीत रॉयल फॉरेक्स ट्रेडींग या नावाने कंपनीचे कार्यालय चालू करून रॉयल ट्रेडिंग कंपनीमध्ये 01 लाखापासून पुढे 100 कोटी पर्यंतच्या गुंतवणुक स्विकारल्या जातात तसेच दिलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतविली जाते व उरलेली 70 टक्के रक्कम सुरक्षीत ठेवली जाते, त्यामुळे गुंतवणुकदारास त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर चांगला परतावा दिला जातो… असे सांगून अनेक गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे खोटे आमिष दाखवुन फसवणुक करणारी महिला राजश्री राजेश तुडयेकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली आहे. रॉयल फॉरेक्स ट्रेडींगच्या राजश्री राजेश तुडयेकर हीच्या विरोधात शिवाजीनगर येथे भादवि कलम 406,409,420, सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 (एमपीआयडी) कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हयाच्य...
PWD-PUNE- स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, पुण्याच्या विधानभवनातच,सा.बां. खात्याकडून विधीमंडळ सदस्यांचा अपमान, आमदार निलम गोऱ्हे यांचा संताप!

PWD-PUNE- स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, पुण्याच्या विधानभवनातच,सा.बां. खात्याकडून विधीमंडळ सदस्यांचा अपमान, आमदार निलम गोऱ्हे यांचा संताप!

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवन पुणे येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. तथापी या ध्वजारोहन कार्यक्रमात जाणिवपूर्वक स्वातंत्र्य सैनिक व विधीमंडळ सदस्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यात शासन नियुक्त शाखा अभियंता श्री. नवनाथ शेळके यांच्यावर खापर फोडण्याचा हेतू असल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुण्याच्या विधानभवन शाखा अभियंतपदी नवनाथ शेळके यांच्या नियुक्तीमुळे उपअभियंता श्री. अनिल बडे व अनिल काकडे अतिशय व्यथित झाले आहेत. शासनाने दिलेला निर्णय या दोन अभियंत्यांना मान्य नसल्यामुळे, श्री. बडे व श्री. काकडे यांनी त्यांचा राग स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वातंत्र्य सैनिक व आमदारांवर काढला असल्याची धक्कादायक घटना...