Tuesday, August 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

शासन यंत्रणा

पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या 28 रिक्त जागा भरण्याची मागणी

पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या 28 रिक्त जागा भरण्याची मागणी

शासन यंत्रणा
पुणे महापालिकेचा 2014 चा आकृतीबंध व 2026 पर्यंत वाढलेल्या हद्दीनुसार विद्युत अभियंत्यांच्या 200 पदांचा समावेश आकृतीबंधात करण्याची आवश्यकता… नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदाच्या 28 जागा मागील तीन वर्षांपासून रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पद भरतीसाठी आवश्यक असणारे बिंदूनामावलीचे रोस्टर व इतर प्रशासकीय काम पूर्ण झाले असल्याने ही पदे तातडीने भरण्याची मागणी समस्त बेरोजगार विद्युत अभियंता पुणे यांनी केली आहे. याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे. यात नमूद केले आहे की, सध्या 25 ते 30 हजार उमेदवार पदभरतीची वाट पाहत आहेत. तसेच भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने अनेक पात्र आणि होतकरू उमेदवारांची वयोमर्यादा उलटून चालली आहे. त्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत चा...
आदिवासी विकास कागदावर – सरकारी व्यवस्थेलाच दंश?

आदिवासी विकास कागदावर – सरकारी व्यवस्थेलाच दंश?

शासन यंत्रणा
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा या तालुक्यातील “ जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन मंडळ अनुदानित आश्रम शाळेतील तिन मुलींना सर्प दंशाने जीव गमवावा लागला आहे. दुर्गम आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षततेच्या व्यवस्थेचे विदारक वास्तव आणि धिंडवडे समोर आणणारी ही घटना आहे . देश स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित निवास, आरोग्य सुविधा आणि तातडीचे उपचार उपलब्ध होत नसतील, तर विकास नेमका कोणासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रामध्ये 497 शासकीय आश्रम शाळा आहेत, तर 556 अनुदानित आश्रम शाळा आहेत . या मध्ये सुमारे 1,97,812 मुले - मुली शिकत आहेत. या मुलांवर शासन दरवर्षी सुमारे 1000 कोटी ते 1350 कोटी इतका खर्च करत असून सुमारे 5000 कोटी सर्व आस्थापनासह खर्च होत असल्याचे विविध माहितीच्या श्रोतांवरुन दिसून येत आहेत. अशा आशय...
पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात आखाड राडा, दारूच्या नशेत उपअभियंता बडे आणि काकडेंनी, शाखा अभियंता शेळकेंचा नामफलक काढुन टाकला !

पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात आखाड राडा, दारूच्या नशेत उपअभियंता बडे आणि काकडेंनी, शाखा अभियंता शेळकेंचा नामफलक काढुन टाकला !

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 2026 मधील सार्वत्रिक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात पुण्याच्या सा.बां. उपविभाग क्र. 1 अंतर्गत विधानभवन शाखा अभियंतापदी श्री. नवनाथ शेळके यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आहेत. तथापी मागील 3/4 वर्षांपासून विधानभवन शाखेत बोगस बीलांवर ताव मारणाऱ्या श्री. अनिल काकडे यांनी महाराष्ट्र शासनाचा आदेश धुडकावुन लावला आहे. श्री. अनिल काकडे यांची नियतकालिक बदली झालेली असतांना देखील विधानभवनाचा पदभार सोडण्यास तयार नाहीत. नवनाथ शेळकेंनी पदभार स्वीकारलेला असतांना देखील, श्री. काकडे हे विधानभवन शाखेचा पदभार सोडायला तयार नाहीत. त्यातच शेळके यांनी शासनाच्या आदेशानुसार विधानभवन शाखेत स्वतःच्या नावाचा लावलेला नामफलकही काढुन टाकण्यात आल्याने, विधानभवन शाखेत राडा झाला आहे. विधानभवन शाखेतील शेळकेंचा नामफलक काढला, पोलीसा...
PMC-PUNE पुणे मनपाच्या आयुक्त, उपआयुक्तांनाही दोन महिन्यांची रजा मिळत नाही, बदली नंतर सुपणार दोन महिने मेडिकल रजेवर.. ?

PMC-PUNE पुणे मनपाच्या आयुक्त, उपआयुक्तांनाही दोन महिन्यांची रजा मिळत नाही, बदली नंतर सुपणार दोन महिने मेडिकल रजेवर.. ?

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडील आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार मागील 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा बदलीचा अधिनियम लागु केला जात नाही, त्यामुळे त्यांची बदली केली जात नाही. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी केलेल्या तक्रार अर्जामुळे सुपणार यांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार प्रथमच समोर आले. दरम्यान श्रीमती चाकणकर यांच्या तक्रार अर्जांवर कोणतीही चौकशी न करता सुपणार यांची बदली, सुमारे 13 वर्षांनंतर सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथुन धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे करण्यात आली. तथापी अतिरिक्त आयुक्तांचा आदेश धुडकावुन व धनकवडी येथे रुजु न होता, सुमारे 2 महिन्यांच्या वैदयकीय रजेवर निघून गेले. पुणे मनपाच्या आयुक्त, उपआयुक्त किंवा कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला 7 दिवसांपेक्षा अधिक कालावधीची रज...
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या शीतल वाकडे यांची कार्यकर्त्यांना आरेरावी, गनिमा कावा संघटनेतर्फे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे वाकडे यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल!

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या शीतल वाकडे यांची कार्यकर्त्यांना आरेरावी, गनिमा कावा संघटनेतर्फे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे वाकडे यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल!

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील अप्पर,सुपर व शेळके वस्ती येथील ड्रेनेज चेंबर फुटून त्यातील मैला-पाणी नागरिकांच्या घरात घुसत असल्याने व सर्वत्र दुर्गंधी पसरून डास, मच्छर यांचा उपद्रव वाढला होता. दरम्यान ड्रेनेज चेंबरची तातडीने दुरूस्ती करण्याबाबतचे निवेदन गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त शितल वाकडे यांना देण्यासाठी गेले होते. तथापी निवेदन घेऊन गेल्यानंतर त्यांना अतिशय उर्मट उत्तरे देऊन त्यांच्याबरोबर अरेरावी केल्याची घटना बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे घडलेली आहे. तसेच दलित नागरी वस्तीमध्ये असा प्रकार घडत असल्याने त्याबाबतचे निवेदन घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे-बिबेवाडी क्षेत्रीय कार्...
येरवड्यातील जुन्या इमारतीवरील हॉर्डींगच्या सांगड्यामुळे नागरीकांच्या जिविताला धोका, आकाशचिन्ह विभागातील निरीक्षकांच्या बेफिकीरीचा नमूना

येरवड्यातील जुन्या इमारतीवरील हॉर्डींगच्या सांगड्यामुळे नागरीकांच्या जिविताला धोका, आकाशचिन्ह विभागातील निरीक्षकांच्या बेफिकीरीचा नमूना

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा येथील स.नं. 24 प्रफुल्ल निवास या अतिशय जिर्ण व जुन्या इमारतीवर टार्गेट ॲडव्हरटायझिंग यांचे होर्डींग असून मागील दोन वर्षांपासून त्याचे नुतनीकरण करण्यात आले नाही. जुन्या इमारतींमुळे त्याला परवानगी नाकारण्यात आली असली तरी त्यावरील कपड्याचे बॅनर काढण्यात आले असले तरी हजारो किलोचा लोखंडाचा सांगाडा जागेवरच ठेवण्यात आलेला आहे. यामुळे स्थानिक नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला असतांना देखील पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या निरीक्षकांनी कारवाईकडे साफ दुर्लक्ष केले असून त्यांच्या बेफिकीरीचा नमूना समोर आलेला आहे. येरवडा गावठातील प्रफुल्ल निवास या जुन्या इमारतीवरील होर्डींगला परवानगी नाकारल्यामुळे त्यावरील निव्वळ कापड काढण्यात आले असले तरी लोखंडी सांगाडा आहे तसाच ठेवण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते रामभाऊ फुगे यांनी 13 नोव्हेंबर 2023 र...
पुणे महापालिका बांधकाम विभागाच्या धानोरीतील अभियंत्यांचे अनाधिकृत बांधकामाकडे साफ दुर्लक्ष !

पुणे महापालिका बांधकाम विभागाच्या धानोरीतील अभियंत्यांचे अनाधिकृत बांधकामाकडे साफ दुर्लक्ष !

शासन यंत्रणा
आधी बांधकाम पूर्ण होऊ दयायचे, मागाहून नोटीसा देऊन सेटलमेंट करण्याच्या धोरणामुळे पुणे शहरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील उपनगरांमध्ये अनाधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. जुनी बांधकामे पाडून त्यावर तीन/चार मजल्यांची बांधकामे सर्रास होत आहेत. तरी देखील बांधकाम विभागाचे अभियंता अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करीत नाहीत. थोडक्यात आधी अनाधिकृत बांधकाम पूर्ण होऊ दयायचे आणि मागाहून नोटीसा देवून सेटलमेंट करण्याच्या वृत्तीमुळे पुणे शहरात अनाधिकृत बांधकाम करणारांनी उच्छाद मांडला आहे. धानोरी अभियंत्याच्या कार्यक्षेत्रातील टिंगरे नगरमध्ये देखील अनेक अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत. काही व्यक्ती व संस्थांनी तक्रार अर्ज देवून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे, तरी देखील नोटीसा किंवा कारवाई केली जात नसल्याचे आजचे चित्र आहे. एअरपोर्ट रोडवरील टिंग...
पुणे महापालिका कर्मचारी वसाहतीतील अनधिकृत बांधकामावर क्षेत्रिय कार्यालयाने कारवाई करावी- अति. आयुक्त

पुणे महापालिका कर्मचारी वसाहतीतील अनधिकृत बांधकामावर क्षेत्रिय कार्यालयाने कारवाई करावी- अति. आयुक्त

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/पुणे महानगरपालिका चाळ विभागाच्या एकूण 30 मनपा व बिगर मनपा वसाहती असून सदरच्या वसाहतीमध्ये एकूण 3 हजार 459 सदनिका आहेत. मात्र या वसाहतीमध्ये अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर क्षेत्रिय कार्यालयांनी थेट कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले आहेत. सदनिका वाटप समिती उपविधी 2011 नुसार मनपा वसाहतीमधील वर्ग 1 ते 4 मधील मनपा सेवकांना सदनिका वाटप करण्यात येत आहेत. मनपा सेवकांच्या दरमहाच्या वेतनातून त्यांना देय असलेले घरभाडे कपात केली जाते. तसेच पुणे महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील घाण भत्ता देय असणाऱ्या सेवकांच्या त्यांच्या सेवानिवृत्ती ऐडीक सेवानिवृत्ती व मयत या कारणाने त्यांच्या वारसांची त्यांच्या जागी नियुक्ती झाल्यानंतर सदरची सदनिका वारसांच्या नावे हस्तांतरण करणे. तसेच सेवानिवृत्ती ऐच्छीक सेवानिवृत्ती...
तळजाई पठरावर सिमेंट मिक्सर व ड्रायव्हींग स्कुलमुळे नागरीकांच्या जीवितेला धोका, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

तळजाई पठरावर सिमेंट मिक्सर व ड्रायव्हींग स्कुलमुळे नागरीकांच्या जीवितेला धोका, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/धनकवडी क्षेत्रिय कार्यालय व सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळजाई पठारावर ड्रायव्हींग स्कुलच्या ट्रेनिंग मुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांच्या जीविताला अक्षरशः धोका निर्माण झालेला असून, नागरीकांनी पोलीसांना वारंवार कळवुन देखील पोलीस त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यामुळे दाद मागायची तरी कुठे असा प्रश्न नागरीकांच्या मनांत निर्माण होवून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तळजाई पठारावरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची नागरीकांकडून मागणी केली जात आहे. तळजाई पठारावर चाटे पब्लिक स्कुल असुन तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. शाळेची वाहने, पालकांच्या वाहनांची संख्याही मोठी असते. त्यातच तळजाई पठरावर सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी, शुद्ध हवेत फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यातच ज्येष्ठ नागरीक देखील पायी चालण्यासाठी तळजाई प...
एका दिवसात 2500 अनाधिकृत फ्लेक्स बॅनरवर कारवाई करणारे माधव जगताप, बिबवेवाडीतील थकित 2 कोटी रुपये वसूल करणार की त्यावर पाणी सोडणार…?

एका दिवसात 2500 अनाधिकृत फ्लेक्स बॅनरवर कारवाई करणारे माधव जगताप, बिबवेवाडीतील थकित 2 कोटी रुपये वसूल करणार की त्यावर पाणी सोडणार…?

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे उपआयुक्त श्री. माधव जगताप यांनी अतिक्रमण व टॅक्स विभागात केलेल्या गलथान कारभारामुळे पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊन जनमानसात पुणे महापालिकेची प्रतिमा मलिन केली म्हणून तत्कालिन आयुक्तांनी माधव जगताप यांची बदली करून दोन इन्क्रीमेंट स्टॉप करण्याची शिक्षा देण्यात आली होती. आता पुन्हा सहा महिन्यानंतर श्री. माधव जगताप यांच्याकडे आकाशचिन्ह विभागाचा पदभार देण्यात आलेला आहे. त्यांनी आकाशचिन्ह विभागात पाय ठेवता क्षणीच पहिल्याच महिन्यात व एकाच दिवसात, पुणे शहरातील सुमारे 2500 फ्लेक्स बॅनर्स, होर्डींग काढून टाकल्याच्या व जे अनाधिकृत बोर्ड बॅनर्स लावतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे व दंडात्मक कारवाई करणर असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांना देण्यात आली आहे. त्यानुसार काही वृत्तपत्रांसह काही न्यूज पोर्टलवर त्यांच्या ह्या बातम्या फोटोसहित प्रसारित करण्यात आल...