Sunday, June 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: Punepolice

बंदूका सापडतात भारतीच्या हद्दीत, फायरिंग होते सहकारनगरात…

बंदूका सापडतात भारतीच्या हद्दीत, फायरिंग होते सहकारनगरात…

पोलीस क्राइम
सर्व आरोपी आणि फिर्यादी सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीच्या बाहेरचे, तरीही हद्दीत फायरिंगच्या दोन घटना नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(विश्लेषण)सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदे हायस्कुल जवळील बिकानेर चौक गजलक्ष्मी सोसायटीजवळ बुधवार (दि. 10 जून) रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या गोळीबारापूर्वी धनकवडी बालाजीनगर येथे आंदेकर टोळीने गोळीबार केल्याची घटना घडली होती. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत दोन्ही ठिकाणे येत असले तरी, गोळीबार करणारे आरोपी आणि फिर्यादी हे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील असल्याचे समोर आले आहे. तथापी मागील सहा महिन्यांतील ऑर्म ॲक्ट नुसार सर्वाधिक जास्त अग्निशस्त्रे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आली आहेत. परंतु फायरिंगसाठी सहकारनगरची जमीन निवडली गेली आहे काय अशी शंका उपस्थित होत आहे. शिंदे हायस्कुलजवळ फायरिंग -सहकारनग...
पुणे शहरावर 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा दरोडा, घरफोडी आणि फसवणूक

पुणे शहरावर 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा दरोडा, घरफोडी आणि फसवणूक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचे पत्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वेसर्वा खासदार सुप्रिया सुळे यांना पाठविले होते. खासदार सुळे यांनी देखील पोलीस आयुक्तांच्या पत्रावर दुसरे पत्र रवाना करून पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान पुणे शहरात दररोज गावठी कट्टे, बंदूका, लोखंडी कोयते पोलीस अंमलदारांकडून जप्त केले जात आहेत. त्यात भरीस भर म्हणून घरफोडी, दरोडा, फसवणूकीच्या प्रकरणात देखील कमालिची वाढ झाली आहे. लोकसेवक व लोकप्रतिनिधींच्या वाकःयुद्धात पुणेकर मात्र भरडले जात आहेत. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था असल्यामुळे की काय पुणे शहरात पुन्हा 37 (1) (3) कलम लागु करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना पुन्हा नव्याने आरासा दाखविण्याची आवश्यकता नाही हेच खरे. मागील दोन दिवस...
PUNE Police-पुण्यातील क्राईम ब्रँच ॲक्शन मोडवर?  युनिट 1, युनिट 2 व युनिट 4 ने आंदेकर टोळीसह वेगवेगळ्या टोळ्या व गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपीस केले जेरबंद

PUNE Police-पुण्यातील क्राईम ब्रँच ॲक्शन मोडवर? युनिट 1, युनिट 2 व युनिट 4 ने आंदेकर टोळीसह वेगवेगळ्या टोळ्या व गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपीस केले जेरबंद

पोलीस क्राइम
  नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ANIRUDDHA SHALAN CHAVAN-पुणे शहर पोलीस दलातील क्राईम ब्रॅंच ॲक्शन मोडवर आली असल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून आले आहे. युनिट एक, युनिट दोन व युनिट 4 ने फरार व पाहिजे आरोपीस जेरबंद केले आहे. दरम्यान पुणे शहरात कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांतील पाहिजे व फरार आरोपींचा रोजच्या रोज शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच टोळीतील सक्रिय व असक्रिय सदस्य आणखी गंभीर गुन्हे करण्याची दाट शक्यता असून पाहिजे व फरार आरोपी मिळून आल्यास त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच त्यांचेवर कडी निगराणी ठेवावी. त्यांचेकडुन कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे गुन्हे शाखेला आदेश दिल्याची माहिती क्राईम ब्रॅंच युनिट एकने प्रसिद्धीला दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे. दरम्यान युनिट एक ने आंदेकर टोळीतील व 8 महिन्यांपासून फरार आरो...
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा सापडली बंदूक आणि जिवंत काडतुसे

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा सापडली बंदूक आणि जिवंत काडतुसे

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेगाव बुद्रुक येथे एका विधी संघर्षित बालकाकडून 50 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत मागील सहा महिन्यांमध्ये बहुतांश विधी संघर्षित बालकांकडून अग्निशस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत. अग्नीशास्त्रासह अनेक जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आलेले आहेत. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र व हत्यारे येतात तरी कुठून असा गहन प्रश्न आता समोर उभा ठाकला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलिस अंमलदार नितेश चोरमले सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त...
PUNE POLICE: पुण्यातील खराडी परिसर म्हणजे- पूर्वी आयटी हब आणि आत्ता ड्रग्ज हब

PUNE POLICE: पुण्यातील खराडी परिसर म्हणजे- पूर्वी आयटी हब आणि आत्ता ड्रग्ज हब

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/खराडी परिसरातून सुमारे दोन लाख 61 हजार रुपयांचा पॉपी स्ट्रा (अफु) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 यांना यश आले आहे. दरम्यान खराडी परिसरात सातत्याने अंमली पदार्थांवर कारवाई केल्याचे व गुन्हा दाखल केल्याच्या नोंदी येत असल्या तरी, खराडी परिसरात एवढे अंमली पदार्थ येतात तरी कुठून हा प्रश्न निर्माण होत आहे. अंमली पदार्थापैकी बहुतांश अंमली पदार्थाविरूद्ध कारवाई करून माल जप्त करण्यात आलेला आहे. मेफेड्रोन, चर्रस, गांजा व आता तर पॉपी स्ट्रा अफु आढळुन आला आहे. त्यामुळे एकेकाळी खराडी परिसर हा आयटी हब म्हणून ओळखल जात होता. आता हाच खराडी परिसर ड्रग्ज हब म्हणून ओळखला जात आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,दि. 6 जून 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण व पोलीस अंमलदार असे पुणे शहर हद्दीत अंमली पदार्...
खोटी बनावट पेमेन्ट स्लिप व्दारे न्यायालयाची फसवणुक करणाऱ्या आरोपीस शिवाजीनगर पोलीसांनी केले गजाआड

खोटी बनावट पेमेन्ट स्लिप व्दारे न्यायालयाची फसवणुक करणाऱ्या आरोपीस शिवाजीनगर पोलीसांनी केले गजाआड

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर येथे जामीनासाठी खोटे सात बारा उतारे, बनावट प्रॉपर्टी कागदपत्रे आता तर बनावट पगार पावती देणाराला शिवाजीनगर पोलीसांनी गजाआड केले आहे. न्यायालयात एखादा कागद सादर केल्यानंतर, तो खरा आहे की खोटा आहे, हे तपासण्याचे काम महसुल विभागाकडे आहे. न्यायालय केवळ सर्टीफाईड म्हणजे खरी नक्कल प्रत देण्याचे काम करते, परंतु ते खरे की खोटे हे तपासण्यासाठी कोर्टाकडे तशी यंत्रण उपलब्ध नसल्यामुळे वर्षानुवर्षे कोर्टात बनावट कागदपत्रे देवून, न्यायालयाची फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी सातत्याने अशा प्रकारांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला तरी, नव नवीन प्रकरणे समोर येत आहेत. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे श्री. अरविंद ललित सोमाणी, (रा- खडकवासला, पुणे ) यांनी फिर्याद दिली की, आ...
पुणे शहर पोलीस भरतीला 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ, एकुण जागा 1633, एकुण अर्ज आले 1 लाख 85 हजार एका एका जागेसाठी 105 जणांचे अर्ज

पुणे शहर पोलीस भरतीला 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ, एकुण जागा 1633, एकुण अर्ज आले 1 लाख 85 हजार एका एका जागेसाठी 105 जणांचे अर्ज

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस भरतीला पोलीसांच्या 1633 जागांसाठी 1.39 + 46,000 = 1.85 लाख अर्ज, आरएफआयडी-सीसीटीव्हीच्या निगरानीत पारदर्शक प्रक्रिया पुणे शहर पोलीस दलात 1633 + 130 पदांसाठीची भरती प्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या भरतीसाठी 1.39 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) श्री. संजय पाटील यांनी दिली आहे. दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे की, या भरतीत पोलीस अंमलदार, 105 वाहनचालक आणि 33 पोलिस बैंडसमन अशा एकूण 1633 पदांचा तसेच कारागृह पोलीसांच्या 130 पदांचा समावेश आहे. मैदानी व शारीरिक चाचणीला 16 फेब्रुवारीपासून...
स्वारगेटचा एसटी स्टँड-सहकारनगरचा बस स्टँड, दोन्हीकडे प्रवाश्यांची लुटालुट,खरा आरोपी का सापडत नाही …

स्वारगेटचा एसटी स्टँड-सहकारनगरचा बस स्टँड, दोन्हीकडे प्रवाश्यांची लुटालुट,खरा आरोपी का सापडत नाही …

पोलीस क्राइम
सहकारनगर पोलीस स्टेशन *स्वारगेट पोलीस स्टेशन *बंडगार्डन पोलीस स्टेशन *वारजे माळवाडी पोलीस स्टेशन *वानवडी पोलीस स्टेशन नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील आजच्या गुन्हेविषयक घडामोडींमध्ये नेहमीप्रमाणे स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील स्वारगेट एसटी स्टँड आणि सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील के.के. मार्केट, बालाजीनगर मध्ये सार्वजनिक वाहनातून नागरीक प्रवास करीत असतांना, त्यांच्यावर दरोडे पडले आहेत. तर बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत एका 50 वर्षीय महिलेचे 1 लाख 44 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्राची चोरी झाली आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीतही सोनाराच्या दुकानात महिलांनी सोने खरेदीच्या बहाण्याने 2 लाख 35 हजार रुपयांची चोरी केली आहे, तर वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत मारहाण व शिवीगाळीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत शेकडो गुन्ह्यांची नोंद होते...
ब्रेकअप केल्याचा रागातून ऊस गुऱ्हाळातील हत्याराने मित्रावर वार, धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील थरारक घटना

ब्रेकअप केल्याचा रागातून ऊस गुऱ्हाळातील हत्याराने मित्रावर वार, धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील थरारक घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील ऊसाच्या गुऱ्हाळातील, ऊस तोडण्याच्या हत्याराने आरोपीवर वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा थरारक प्रकार घडला आहे. 2 फेब्रुवारी रोजी फिर्यादी व आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय 24 वर्षे रा. समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे असे संजीवनी बार त्रिमुर्ती चौक, येथे बोलत बसले होते. फिर्यादी यांनी आरोपीस त्याच्या मैत्रिणीपासून ब्रेकअप घडवून, त्यांच्यात भांडण लावून, त्याने कॉल केल्याच्या रागातून आरोपी चेतन चव्हाण याने बाजूच्या ऊसाच्या रसवंती गृहातील ऊस तोडण्याचे हत्यार घेवुन आज तुला जिवंत सोडणार नाही.... असे म्हणून त्या कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हातावर, डोक्यावर, डाव्या पायाचे नडगीस व कानास हत्याराने वार करुन गंभीर जखमी करून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी विरूद्ध भारती विदयापीठ स्...
पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर स्वारगेट पोलीसांची कारवाई

पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर स्वारगेट पोलीसांची कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील स्वारगेट जवळील लक्ष्मीनारायण चौकात एलडिनेरो या हॉटेलमध्ये तंबाखुयुक्त हुक्का पार्लर सुरू असल्याची तक्रार, स्वारगेट पोलीस स्टेशन यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाल्यानंतर, स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी तातडीने बेकायदेशिर हुक्का पार्लरवर कारवाई करून सुमारे 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच हॉटेलच्या वेटरसह मालक, चालक यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,स्वारगेट पोलीस स्टेशन यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून खबर मिळाली की, लक्ष्मीनाराण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डीग मधील एलडिनेरो हॉटेल मध्ये अवैधरित्या हुक्का चालु असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले. त्यानुसार स्वारगेट पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक विकास भारमळ, मपोउपनि सुजाता जाधव, तपास पथकातील पोलीस अंमलदार पोअंमलदार टोणपे, पोअंम कुडाळकर, चालक पोअंम ठोंबरे, मार्शल...