Sunday, June 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecpoffice

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट यांनी देखील मोठी कारवाई करून सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचे चरस अंमली पदार्थासह 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारांसह सुमारे 5 लाख 72 हजार 50 रु चा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ पथकाचे विनायक गायकवाड यांनी तर अंमली पदार्थाविरूद्ध मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. थोडक्यात मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थांची बाजारपेठ होत चालली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही घटनांचा आढावा घेतला आहे. उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपचा वापर करून एल...
पुण्यातील जनता वसाहत… अरुंद रस्ता… एकमेकांना लागला धक्का, झाली बाचाबाच… दिल्या शिव्या… चिडून जाऊन त्याने घातला डोक्यात दगड आणि केला खून,

पुण्यातील जनता वसाहत… अरुंद रस्ता… एकमेकांना लागला धक्का, झाली बाचाबाच… दिल्या शिव्या… चिडून जाऊन त्याने घातला डोक्यात दगड आणि केला खून,

पोलीस क्राइम
दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंदनॅशनल फोरम/ पुणे/ दि/ प्रतिनिधी/दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सुनील विठ्ठल मोरे वय 52 वर्ष रा. जनता वसाहत यांचा पहाटे कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्या बाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट तीन यांनी तपास पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने केलेले तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या बातमीदार मार्फत आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर स्थानिक घटनास्थळी उपस्थित असलेला आरोपी समीर उर्फ वीरेंद्र पांडुरंग चौरे वय-33 वर्ष रा.निलायम पुलाजवळ, पर्वती पायथा यास अटक करण्यात आली. तपासात निष्पन्न झालेला माहिती...
कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आठवड्यातील सर्वांना सुटीचा असलेला वार म्हणजे रविवार. परंतु हाच रविवार मात्र पोलीसांना शांतपणे बसू न देण्याचा देखील वार ठरत आहे. काल शनिवार व रविवारी पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत चोरी आणि दरोड्याचे प्रकार समोर आले असून, जिकडे तिकडे चोरी आणि दरोडा… पुढे काय तर घरेदारे सोडून आता भर रस्त्यावर चोर लुटारूंनी लुटालुटीचा खेळ सुरू करून पुणे पोलीसांना आव्हान दिले आहे. काल रविवारी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशन सह शनिवारी स्वारगेट, खडकी व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत भर रस्त्यावर चोरी व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील हॉटेल चालकांचा सविनय कायदेभंग, पोलीस मात्र कशात आहेत दंग -दुकान अधिनियम व पोलीस नियमानुसार, रात्रौ 11 वाजेपर्यंत सर्व खाजगी दुकाने ...
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील खून, हत्याकांड, दरोडा, घातपात, फसवणूक, देहव्यावारासह अमली पदार्थांचा खुलेआम बाजार…कोरेगाव पार्क मध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ब्रिटिश काळापासून ते आज पर्यंत पुण्यातील कोरेगाव पार्क हा परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या निरीक्षणाखाली असलेला भूभाग आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हाधिकारी पुणे यांच्या स्वतंत्र निरीक्षणाखाली असलेल्या कोरेगाव पार्क, कल्याणी नगर परिसरात शेकडोंच्या आसपास स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असताना. त्याच्यावर कारवाई केली जात नाही. सेक्स टुरिझम च्या नावाखाली संपूर्ण कोरेगाव पार्क हद्दीत दिवस-रात्र 24 तास देश विदेशातील मुली व महिलांचा बाजार भरविला जात असताना, त्याच्यावर कायद्यातील कठोर तरतुदींचा वापर केला जात नाही. दरम्यान मागील एक दीड वर्षात संपूर्ण...
महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

पोलीस क्राइम
वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजीवन कारावासाची शिक्षा नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करणारे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु कायदयांच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळेच संपूर्ण देशातील न्यायालयात कोट्यवधीचे कोर्ट केसेस आजही प्रलंबित आहेत. दरम्यान पोलीसांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली तर गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्यांची गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध मागील सप्ताहात जबरी कारवाया केल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम अतिशय सक्षम असा कायदा आहे. त्याच बरोबर फौजदारी कायदे व भादविमधील परस्पर पु...
पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील सप्ताहात विमानतळ पोलीस स्टेशन व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दतील मजसा पार्लर, स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याने त्यांच्याविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियमातील कलम 3, 4 व 5 सह भादवी 370 व 34 नुसार गुन्हे दाखल करून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध जबर दहशत बसविण्यात आली आहे. दरम्यान कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील चार महिन्यात सुमारे 8 ते 10 ठिकाणी कारवाया करून देखील अपव्यापाराची कमी शिक्षा व कमी दंडाचे कलम लावुन आरोपींवर दयामाया का दाखविण्यात आली याबाबत सामाजिक संघटना प्रश्न विचारत आहेत. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत अनेक वर्षांपासून सेक्स टूरिझमच्या नावाखाली मोठा वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. कोरेगाव पार्क, कल्याणी न...
अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/खडक पोलीस स्टेशन येथे संघटीत गुन्हेगारी कायदयाखालील आरोपी कुमार लोंढे हा अटक टाळण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देऊन पळत होता. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. नागरीकांमध्ये हवेत हत्यार फिरवुन भाईगिरीची नशा चढलेल्या लोंढे यास खडक पोलीसांनी अखेर जेरबंद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांच्या टिमने अथक प्रयत्न करून अखेर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. भाईगिरीतून गुन्हेगारीचा कैफ चढला-तु मंदारकडे पैसे का दिले नाहीस ? “ तुला लय माज आला आहे का ? असे म्हणुन उमेश वाघमारे व कुमार लोंढे यांनी मिळून फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश वाघमारे याने तेथे जवळच पडलेले खोरे घेवून ते जोरजोरात हवेत फिरवून तेथील नागरिकांचे मनात दहशत निर्मा...
पोलीस आयुक्तालयातील प्रेस रूमवर आयुक्तालयाचे नियंत्रण नाही, प्रेसरूमला पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची आवश्यकता

पोलीस आयुक्तालयातील प्रेस रूमवर आयुक्तालयाचे नियंत्रण नाही, प्रेसरूमला पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची आवश्यकता

पोलीस क्राइम
pune cp office press room पुणे शहर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे वृत्त पुणे पोलीस वेबसाईट वरून प्रसारित करण्यास एका महिन्यात दहा वेळा खंड नॅशनल फोरम/पुणे/दि/पुणे शहरातील सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखेच्या सर्व युनिट तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी, सराईत गुन्हेगारांसह गुन्हेगारी डोळ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची तसेच पकडण्यात आलेल्या अट्टल आरोपींची माहिती वृत्तपत्रांना पोहोचवून पुणे शहरामध्ये गुन्हेगारांवर धाक निर्माण करणे व पुणेकर नागरिकांना कायद्याच्या राज्याचा विश्वास निर्माण करण्याकरिता, गुन्हेगारावरील कारवाईची माहिती नोंदणीकृत वृत्तपत्रांसह खाजगी वृत्तवाहीया व इतर माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी पाठविले जाते. तसेच सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट कडून आलेल्या प्रेसनोट वर संस्करण अर्थात एडिटिंग करून, संबंधित बातम्या वृत्तपत्रांकडे पाठवण्याचे काम पुणे शहर पोल...
पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मुंबई पोलीस दलात कर्तव्यावार असतांना अपघाती मृत्यू झालेल्या झालेल्या पोलीसाच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी पोलीस पत्नीने सरकारकडे दाद मागितली परंतु, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पोलीस पतीला न्याय मिळावा म्हणून त्या माऊलीने मंत्रालया समोर विष प्राशन करून मायबाप शासनाचे लक्ष वेधले. परंतु उपचारादरम्यान पोलीस पत्नीचा मृत्यू झाला. महिलांचा कैवार घेणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या महिला आघाड्या किंवा महिला आयोगाने देखील याची दखल घेतली नाही. सामाजिक राजकीय संघटनांनी साधे निवेदनही दिले नाही. इतकी अस्पृश्यता इथे पाळली गेली आहे. न्यायासाठी पोलीस आणि पोलीस पत्नीला जीव गमवावा लागला. यात सरकार पर्यंत आवाज पोहोचला नाहीच. आणि राजकीय पक्ष, संघटना यांच्या सह माध्यमांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष करावे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. याच ठिका...
पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पोलीस क्राइम
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख… वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील न...