Friday, September 13 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Khadak police station

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 व खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नजीर सलीम शेख वय 29 रा. काशेवाडी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणूकीत काहीएक फरक पडत नव्हता. तसेच तो अत्यंत कु्रर, खुनशी व भांडखोर असल्याने तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करून गुन्हे करीत होता. व्यापाऱ्यांना व बिल्डरांना खंडणी मागणे, नागरीकांना त्रास देवून त्याचे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने अखेर खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने याबाबत अहवाल पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांचेपुढे सादर करून सराईत गुन्हेगाला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायदयानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. खडक पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य -खडक पोलीस स्टेशन पुणे या गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख, व...
दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्व व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान या गुन्हेगारी टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी कायदयासह एमपीडीए व तडीपारीचे शस्त्र पुणे पोलीसांकडून उगारण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णि यांनी काल खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शेडगे टोळीवर 54 वी कारवाई केली तर आज शिवाजीनगरात यल्ल्या कोळानट्टी टोळीविरूद्ध 55 वी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व पुणेकर नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुणे शहरातून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्...
बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल क्राईम आणि महाराष्ट्र क्राईम रेकॉर्डनुसार देशात व राज्यात गुन्हेगारी वाढली असल्याचे आकडेवारीनिशी प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान गुन्हेगारीमध्ये वाढ का होत आहे याबाबत पुणे शहर पोलीसांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. गुन्हेगारीतूनच अवैध धंदे व खाजगी सावकारी, कंपनी सावकारी अधिक वाढली लागली आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात बऱ्यापैकी वास्तवातील गुन्हेगारीचे चित्रण करण्यात आले आहे. थोडक्यात आर्थिक फायदयाकरीता गुन्हेगारी वाढली आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. आता त्यामध्ये पोलीसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायचे सोड...
शिवाजीनगर-खडकी -विश्रांतवाडी पोलिसांच्या त्रिकुटाचा संघटित गुन्हेगारांच्या जुगार अड्ड्यात भागीदारी, सासु ड्रग माफिया तर जावई गॅम्बलर

शिवाजीनगर-खडकी -विश्रांतवाडी पोलिसांच्या त्रिकुटाचा संघटित गुन्हेगारांच्या जुगार अड्ड्यात भागीदारी, सासु ड्रग माफिया तर जावई गॅम्बलर

सर्व साधारण
पुणे पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनला गुन्हेगारी टोळ्यांनी केले ऑल आउट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांनी ज्या गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का व एमपीडीए कायदयाने कारागृहात डांबले त्याच संघटित गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मागील सात दिवसात पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला कळवून देखील मागील सात दिवसांपैकी एक दिवसही कारवाई झालेले नाही. अशीच अवस्था खडकी पोलीस स्टेशन व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांची असून या तीनही लगतच्या पोलीस स्टेशनची संघटित गुन्हेगारांनी अक्षरशः चाळणी केली असून जागोजाग सर्वसामान्यांना बक्षीस आणि पैशाचे आमिष दाखवून मटका जुगार अड्डे, पत्त्याचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट आदि सर्व प्रकारचे जुगार अड्डे सुरू करून तीनही पोलीस स्टे...
पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम… जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती

पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम… जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वाढते शहरीकरण, वाढते नागरीकरण, विस्तारित होत चालेला सोशलमिडीया यामुळे नशाखोरीचे ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखाबंदी केली असली तरीही शासन व पोलीस यांची नजर चुकवून, चोरट्या मार्गाने आजही गुटखा विक्री होत आहे. स्थानिक पोलीस स्टेशनसह इतर गुन्हे शाखांकडून कारवाया सुरू आहेत. त्यातच आता अंमली पदार्थ सेवन करण्याचा नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. अंमली पदार्थ विरोधी विभाग गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कारवाया केल्या तरी सोशल मिडीया आणि ऑनलाईन मार्केटमुळे पोलीसांची नजर चुकवून चोरटी विक्री होत आहे. दंडात्मक कारवाई होत असली तरी सामाजिक जाणिवेतून जनजागृती होणे देखील तितकीच आवश्यकता आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील खडक पोलीस स्टेशन यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेज सह चौका चौ...
गुरुवार पेठेत पायी जाणाऱ्या डॉक्टर महिलेची सोनसाखळी हिसकावली, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी पाठलाग करून चोरास पकडले …

गुरुवार पेठेत पायी जाणाऱ्या डॉक्टर महिलेची सोनसाखळी हिसकावली, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी पाठलाग करून चोरास पकडले …

पोलीस क्राइम
घोरपडे पेठेतील तरुणांचा खडक पोलिसांकडून सत्कार नॅशनल फोरम /पुणे /दि/ प्रतिनिधी/पुण्यातील गुरुवार पेठेत भर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर महिलेची सोनसाखळी चोरीचा प्रकार घडला असून पळून जाणाऱ्या चोरास घोरपडे पेठ येथे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी पळून जाणाऱ्या चोराचा पाठलाग करून त्याला पकडले आहे . याबाबत फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सतीश गोवेकर खडक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव यांनी या धाडसी तरुणांचा सत्कार केला आहे गुन्ह्याची हकीकत अशी की, १६ मे २०२३ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महिला डॉ. अर्णिका अखिलेश सिंग वय २९ वर्षे, रा . शांतीनगर सोसायटी, गुरुवार पेठ पुणे या पायी चालत घरी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चैन जबरीने चोरून तेथून पळ काढला . त्यावेळी त्या मदतीसाठी ओरडल्या असता घोरपडे पेठ येथे क्रि...
रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार, खडक पोलीसांची धडक कारवाई

रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार, खडक पोलीसांची धडक कारवाई

पोलीस क्राइम
khadak police pune नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/रेशनिंगचे सरकारी धान्य, रेशनदुकानदारांकडून काळ्या बाजारातून विकत घेवून त्याची विक्री दौंड तालुक्यात विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या आरोपींवर खडक पोलीस स्टेशनने धडक कारवाई केली आहे. यात 54 पांढऱ्या पोत्यातील 40 हजार 500 रुपये किंमतीचा तांदळासह तीन लाख रुपयांचा मालवाहतुक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही घटना राजीव गांधी सोसायटी समोर, कासेवाडी भवानी पेठ येथे दुपारी 12.30 वाजता घडली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, आरोपी 1. जावेद लालु शेख वय-35, रा. कासेवाडी, 2. अब्बास अब्दुल सरकावस वय 34, रा. अशोकनगर कॉलनी कासेवाडी, व 3. इम्रान अब्दुल शेख वय 30 वर्ष रा. गोल्डन ज्युबली कासेवाडी ह्या तीन आरोपींनी वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून माल काळ्या बाजारात विकत घेवून तो एकत्र केला. तो माल अशोक लेलंड कंपनीच्या मालवाहतुक टेम्पोमध्ये भरून केडगाव ता. दौंड जि. प...
अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/खडक पोलीस स्टेशन येथे संघटीत गुन्हेगारी कायदयाखालील आरोपी कुमार लोंढे हा अटक टाळण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देऊन पळत होता. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. नागरीकांमध्ये हवेत हत्यार फिरवुन भाईगिरीची नशा चढलेल्या लोंढे यास खडक पोलीसांनी अखेर जेरबंद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांच्या टिमने अथक प्रयत्न करून अखेर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. भाईगिरीतून गुन्हेगारीचा कैफ चढला-तु मंदारकडे पैसे का दिले नाहीस ? “ तुला लय माज आला आहे का ? असे म्हणुन उमेश वाघमारे व कुमार लोंढे यांनी मिळून फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश वाघमारे याने तेथे जवळच पडलेले खोरे घेवून ते जोरजोरात हवेत फिरवून तेथील नागरिकांचे मनात दहशत निर्मा...
खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

पोलीस क्राइम
khadak police pune खडक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपातच असतात हे खरे आहे काय… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुले हातात कोयता, हॉकीस्टीक सारखी हत्यारे घेवून दहशत माजवित सुटले आहेत. चिल्लर पार्टी सारखी वानर सेना संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आग लावत सुटली आहेत. सगळीकडे दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुख्यात असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. असे असतांना खडक पोलीस स्टेशन मधील डीओंची दादागिरी समोर आली असुन अनेक पोलीस कर्मचारी त्रस्त झाले असल्याची माहिती नॅशनल फोरमला मिळाली आहे. त्यामुळे त्या दादागिरी करणाऱ्या डीओंवर सहायक पोलीस आयुक्त किंवा उपआयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. नॅशनल फोरम प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 ...