Thursday, October 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pune crime latest news today

पुणे पोलीसांच्या 206 वर्षाच्या काळात प्रथम, पुण्यातील कुख्यात गुन्हेगारी टोळ्या समोरासमोर,मारणे, बोडके, घायवळ ते आंदेकरसह सुमारे 15 टोळ्या आणि 50 उपटोळ्यांसह 267 गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्तालयात परेड

पुणे पोलीसांच्या 206 वर्षाच्या काळात प्रथम, पुण्यातील कुख्यात गुन्हेगारी टोळ्या समोरासमोर,मारणे, बोडके, घायवळ ते आंदेकरसह सुमारे 15 टोळ्या आणि 50 उपटोळ्यांसह 267 गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्तालयात परेड

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे पोलीस दलाची स्थापना ब्रिटीश राजवटीत 1818 रोजी झाली. तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी करण्यात आली. ब्रिटीश राजवटीपासून ते महाराष्ट्र राज्य निर्मितीपर्यंत आणि त्यापासून आज 2024 पर्यंत गुन्हेगारी टोळ्यांची आजपर्यंत कुणीच ओळखपरेड काढली नव्हती. पुण्याचे नव नियुक्त पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी, पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील सुमारे 15 मुख्य, 50 उपमुख्य टोळ्यांसह सुमारे 267 गुन्हेगारांची ओळख परेड पोलीस आयुक्तालयात काढण्यात आली आहे. पुण्याच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारांची अशी ओळख परेड काढण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडीओ, रिल्स बनवल्यास काय कारवाई केली जाईल याचा अजेंड यावेळी वाचुन दाखविण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील कुख्यात ...
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मटका जुगार अड्डयावर पोलीसांनी कारवाई केली, म्हणून पोलीसांवर हात उगारणाऱ्या मटका अड्डयाच्या मालकाला पोलीसांनी तडीपारीची का करू नये अशी नोटीस काढली… मग काय… त्याने सहायक पोलीस आयुक्त फरासखान्याला दरदिवशी 10 प्रदक्षिणा घालण्याचा उपक्रम सुरू केला. पुढे एमपीडीएची तरतुद ठेवण्यात आली. तेंव्हा तर देवाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या नसतील तेवढ्या प्रदक्षिणा फरासखाना इमारतीला घातल्या. पुढे कारवाई नाममात्र करून, मोठी कारवाई संस्थगित ठेवण्यात आली आणि आता पुनः समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत नव्याने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. भिमनगराकडे जाणाऱ्या ऑईलच्या दुकानापासून ते पॉवर हाऊसपर्यंत त्याने रान पेटवुन ठेवले आहे. सगळीकडे गप्पाही गप्पामय वातावरण निर्माण झाले आहे. जागोजाग रायटर आणि पंटरचा धुमाकुळ सुरू आहे. एवढी मेहेरबानी समर्थ पोलीस स्टेशन आणि पुणे शहर पोलीसांनी का केली ...
खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

पोलीस क्राइम
खडकी पोलीस आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी म्हणजे मटका, जुगार अड्डे आणि अंमली पदार्थांची बाजारपेठ… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)पुणे शहरात सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्याच्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने काल खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अजमेर शेख वय 22 वर्ष रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे येथील गुन्हेगारावर 78 वी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अजमेर शेख याच्या विरूद्ध मागील 5 वर्षात एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याने त्याच्या साथीदारांसह खूनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापतीसह जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, दंगा, बेकायदेशिर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याने त्याच्यावर एमपीडीए नुसार कारवाई करून त्याची रवानगी नागपुर कारागृहात केल्याचे पुणे शहर पोलीसांकडून 2 जानेवारीच्या प्रसिद...
तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खुनाचे रहस्य उलगडले साडेतीन वर्षांनतर…पर्वती पोलीसांची कामगीरी

तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खुनाचे रहस्य उलगडले साडेतीन वर्षांनतर…पर्वती पोलीसांची कामगीरी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कानुन के हात बहोत लंबे होते असं आपण नेहमी ऐकतो. चित्रपटातही याचे डॉयलॉग असतात. दरम्यान पोलीस अधिकारी कणखर असतील तर कायदा आणखीन बळकट होतो. त्याचा प्रत्यय पर्वती पोलीस स्टेशन मध्ये आला आहे. पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराम पायगुडे यांच्यासह पो.नि. गुन्हे श्री.विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी साडेतीन वर्षापूर्वी झालेल्या खुनाचे रसह्य उलगडले आहे. अत्यंत किचकट व कोणताही पुरावा नसतांना, अतिशय पारंपारीक पद्धतीने पर्वती पोलीसांनी तपास करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. त्याबाबतची हकीकत अशी की,दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या...
Bharti Vidyapeeth Police-जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाही…..मग प्रश्न उरतो….भारती पोलीसात वरिष्ठ हाईत तरी कोण…व्हय… व्हय… कोण…?

Bharti Vidyapeeth Police-जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाही…..मग प्रश्न उरतो….भारती पोलीसात वरिष्ठ हाईत तरी कोण…व्हय… व्हय… कोण…?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/फरासखाना हद्दीतील कुंटणखान्याला 300 वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे आक्षेप हे निःशब्द होणे स्वाभाविक आहे. कोरेगाव पार्क पोलीस हद्दीत जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असल्याने सेक्स टुरिझम ही संकल्पना येथे रुजली गेली आहे. इथपर्यंत सगळं ठिक होत. परंतु मुंढवा पोलीस, विमानतळ पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील देहविक्रीच्या जंजाळाचे रहस्य अजुन उलगडत नाही. जागो जाग मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली उघडपणे देहविक्री सुरू आहे. यात देश विदेशातील मुली व महिलांसह स्थानिक मुलींचा वापर करण्यात येत आहे. कायदयाने कुठल्याही प्रकारची देहविक्री दंडनिय अपराध ठरविण्यात आलेला आहे. तरी देखील भारती विद्यापीठासह इतर पोलीस स्टेशन कारवाई का करीत नाहीत. दरम्यान आम्हाला जो पर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तो पर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही अशीही पंक्ती हल्ली जोडण्यात येत आह...
पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या...
कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीसांनी ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन केलं,कोयते, तलवारी, बंदूका पकडल्या, आता गुन्हे करण्यासाठीचे उत्तेजित ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांनी, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक, पुण्याच्या मुळा-मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे, संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवस असो की रात्र, हातात कोयते घेवून नागरीकांना धमकाविणे, हॉटलचालक, टपरीचालकांवर कोयता उगारणे, थांबलेल्या व जात असलेल्या वाहनांवर कोयते मारून वाहनांचे नुकसान करणे सारख्या घटना कधी नव्हे ते पुणे शहरात होत आहेत. पकडण्यात आलेले बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उत्तेजना नेमकी कशामुळे आली आहे…. कोयते उगारत असतांना त्यांची शारिरीक व मानसिक उत्तेजना याचा विचार करता, देशी विदेशी मदय तसेच गांजा, मे...