Tuesday, March 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: balasaheb ambedkar

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

राजकीय
काँग्रेसची अवस्था आजही जुन्या जमिनदारासारखी आहे पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसनेच अधिक काळ देशात व महाराष्ट्रात सत्ता उपभोगली आहे. देशातील व राज्यातील बहुजन समाजाला सत्तेत येऊ दिले नाही. यांनीच राज्य केलं. त्यामुळेच राज्यात 3/4 वेळेस काँग्रेसला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता देखील बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आंबेडकरी समुह व बहुजन समाजाची या पक्षांना मते हवीत परंतु या समाजांना सत्तेत वाटा दयायचा नाहीये. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गळयात आणि गाडीवर निळे झेंडे लावुन फिरत आहेत. दोन्ही काँग्रेसवाले कुणाला विचारून निळे झेंडे वापरत आहेत असा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ...
कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

राजकीय
नाशिक/दि/पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपासहित प्रस्थापित पक्षांनी, प्रत्येक निवडणूकीत आंबेडकरी चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांना ब्लॅकमेल केले

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपासहित प्रस्थापित पक्षांनी, प्रत्येक निवडणूकीत आंबेडकरी चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांना ब्लॅकमेल केले

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणवंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांची युती झाल्यानंतर, सर्वाधिक मळमळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळुन आली असल्याचे खाजगी वृत्तवाहिनीवरील अनेक बातम्यांमधुन दिसून येत आहे. वृत्तपत्र व टिव्ही चॅनेल्सच्या काही पत्रकारांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री. नाना पटोले यांना मविआ युतीबाबत विचारले असता, बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागण्या काय आहेत हे माहिती नसल्याचे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांसमोर रागजळफाट व्यक्त केला असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील बुडाला आग लागल्यासारखे सगळीकडे आरोळ्या ठोकत सुटले असल्याचे वृत्तवाहिनीवरून दिसत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते राष्ट्रवादीची बाजु सावरतांना दिसत आहेत. दरम्यान मागील 40/50 वर्षात सत्ताधारी व विरोधी पक्षातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरी चळवळ व बाळासाहेब आंबेडकर यांना ...
नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/नोटबंदीचा निर्णय वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून आता बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असाही सवाल उपस्थित केला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 10 मार्च 2017 रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने 2016 च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात आणणे किंवा नोटबंदी करणे यामध्ये केंद्र सरकारने काय भूमिका घ्यावी याविषयीच्या संवैधानिक मुद्यावर अ...