
विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा ,
पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट
सामाजिक सुरक्षा मधील 12 ए चे पुरस्कर्ते आता भारती विद्यापीठात.. तर विशेष शाखेच्या भरत जाधवांना सामाजिक सुरक्षेची जबाबदारी… बंडगार्डनचे मानकर खंडणी विरोधी पथकातहुश्यऽऽ… अखेर विश्रामबागला सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाले…
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट करण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यात बदलुन आलेल्या पोलीस निरीक्षकांना या बदल्यांत पदस्थापना देण्यात आली आहे. या शिवाय पोलीस आयुक्तालयातील तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. 3 सहाय्यक पोलीस आयुक्त व 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग या पदाला पुर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. तर राजेश पुराणिक यांच्यानंतर, सामाजिक सुरक्षा विभागाचा भार पेलणारे व 12 ए चे पुरस्कर्ते विजय कुंभार य...