Thursday, December 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: vbapune

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण -राज्यात विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सगळीकडे निवडणूकीचा ज्वर चढला आहे. राज्यात कायम सत्तेत असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आहेत. याच पक्षात सर्वाधिक सधन मराठा समाज आहे. त्यांना त्यांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. प्रत्येक निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करतात. मतदार आणि कार्यकर्ते विकत घेण्याची त्यांची खुमखुमी आजही आहे. जाती जातीत भांडण लावणे, धर्माधर्मात भांडण लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. विकासाच्या मुद्यावर यांची निवडणूक कधीच नसते. कारण तेच आमदार, तेच खासदार असल्याने त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले आहेत, ते मतदारांना माहिती असते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढविता ते थेट जाती आणि धर्मावर वाता...
विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : बाळासाहेब आंबेडकर

विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या यामधील आरक्षण थांबवले जाईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. हे आपल्याला मान्य आहे का? मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसींचे, एससी, एसटी आणि मुस्लीम उमेदवार की ज्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे त्यांना डोळे झाकून मतदान करा, असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. मराठा आमदार कसे निवडूण येतील याचीच रचना आखली आहे-मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची जी घोषणा आहे की, 200 आमदार विधानसभेत असतील, या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा असे म्हणून सर्वांना अर्ज भरायला लावले. निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. निजामी मरा...
पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी

राजकीय
सन 1988 ते 1991, शरद पवार - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भेट … कशासाठी? नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर छोट्या पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होतानाही दिसत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांनी दुबईतील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, 1988 ते 1991 साली शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका दौऱ्यासाठी परदेशात गेले होते. शरद पवार भारतातून लंडनला गेले होते आणि तिथून कॅलिफोर्नियाला जाऊन 2 दिवस थांब...
भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/अमरावती-अकोला/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 41 जागांवर भाजप-शिवसेना युतीने विजय मिळवला होता. राज्यात 48 पैकी 41 खासदार भाजप-शिवसेना युतीचे होते. या खासदारांनी केंद्रातून त्यांच्या मतदारसंघाकरता किती विकास निधी आणला? खासदारांना मिळणाऱ्या दरवर्षीचा पाच कोटी रुपयांचा निधी कोणत्या कामांवर खर्च केला? किती टक्के खर्च केला? जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तो निधी कसा खर्च केला? त्यांच्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये किती नवीन शाळा, कॉलेज उभे केले? किती नवीन हॉस्पिटल उभे केले? किती शासकीय जुन्या हॉस्पिटलला आरोग्य सुविधा पुरवल्या? किती प्राथमिक आणि माध्यमिक जुन्या शाळांच्या नूतनीकरणावर भर दिला? सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण व आरोग्याच्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या? बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळवून देण्यासा...
प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

राजकीय, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/राज्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. देशात 10 वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाची उणीदुणी काढण्यापेक्षा, हे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडी विरूद्ध गरळ ओकत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही. त्यांची देशात व राज्यात कुठेही सत्ता नव्हती, तरी देखील वंचित बहुजन आघाडीविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे चार पक्ष का तुटून पडले आहेत याचा विचार होणे गरजेचे ठरत आहेत. महायुती व महाविकास आघाडीने राज्यात एकाही मुस्लिम समाजातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. आंबेडकरी समुहातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. भटके, विमुक्त, आलुतेदार- बलुतेदारांना उमेदवारी दिली नाही. या समाजाने केवळ महायुती व महाविकास आघाडीला मतदान करायचे, परंतु सत्तेत वाटा मागायचा नाही असेच धोरण आजपर्यंत ठ...
लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपा महायुती, काँग्रेस महाविकास आघाडीतील रूसवे फुगवे..बदनामी मात्र वंचितची

लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपा महायुती, काँग्रेस महाविकास आघाडीतील रूसवे फुगवे..बदनामी मात्र वंचितची

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/भाजप प्रणित महायुती आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरलेला नाही. महायुतीत खटके उडणे सुरूच आहे. महाविकास आघाडीतही तणाव आहे. मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला असल्याची बातमी लोकमतच्या पहिल्या पानावर यदु जोशी यांच्या नावाने बातमी प्रसिद्ध केली आहे. बातमीमध्ये काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये तणाव आहे, खटके उडत आहेत. तसेच भाजप प्रणित महायुतीमध्ये देखील तणाव असल्याचे नमूद केलं आहे. दरम्यान या दोन प्रस्थापितांच्या महायुती व महाआघाडीच्या सत्तास्पर्धेच्या वादात बदनामी मात्र वंचित बहुजन आघाडीची केली जात आहे. काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत प्रथम काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या बैठका म्हणजे सत्यनारायणाची पूजा नाही असं खोचक विधान काँग...
वंचितच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीय-समलैंगिक व्यक्तीस मोफत उच्च शिक्षणासह, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप, घरकुल योजनेतही तरतुद

वंचितच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीय-समलैंगिक व्यक्तीस मोफत उच्च शिक्षणासह, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप, घरकुल योजनेतही तरतुद

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तृतीयपंथी समाज, जोगती, आराधी या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुषित आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारच्या संधी मिळत नाहीत. शासनस्तरावरून देखील कोणत्याही तरतुदी केल्या जात नाहीत. तत्कालिन काँग्रेस राजवटीत तर ट्रान्सजेंड अर्थात तृतीयपंथीयांना दिल्लीत जबरी मारहाणीच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. आज भाजप देखील काँग्रेसचाच कित्ता गिरवित आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी मात्र कायम तृतीयपंथी, जोगती, आराधी या समाज घटनांना, मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत होता. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या कार्यकाळात त्यांनी किमान समान कार्यक्रम तयार करून महाविकास आघाडीकडे पाठविला आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने तयार केलेल्या 39 कलमी किमान समान कार्यक्रमात मुद्दा क्र. 31 वर तृतीयपंथी समाज घटकांना, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरतुद केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्...
दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशातचे पहिले पंतप्रधन जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर व पुढे 1977 पर्यंत देशात काँग्रेसच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणांमुळे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि काँग्रेस हटावची चळवळ सुरू झाली. इंदिरा हटाव मोहिम सुरू झाली. पुढे कालांतराने आता भाजपाने देखील काँग्रेसचाच भांडवलदार धार्जिणा कार्यक्रम पुढे रेटल्याने, देशात मोदी हटाव, भाजपा हटाव म्हणून विरोधी पक्ष एक होत आहेत. कुणाला तरी विरोध म्हणून किंवा सत्तेसाठी विरोधी पक्ष एकवटत असला तरी यातून जनतेचे कोणतेही हीत होत नाही. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमावर आधारित सर्व राजकीय पक्षांनी एक होवून देशातील निवडणूकांना सामोरे जावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने मागील दोन ते अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व जिल्ह्यात 8 ते 10 लाखांच्या सभा पार पडत आहेत. दरम्यान वंचित व शिवसेना उबाठ...
1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशात मोदी हटाव, लोकशाही वाचवा म्हणून सर्व विरोधी पक्ष टाहो फोडत आहेत. लहान मोठ्या प्रसार माध्यमांतुन देखील मोदी हटाव ची घोषणा होत आहे. परंतु देशात हे पहिल्यांदाच होत नाहीये. तर यापूर्वी देखील इंदिरा गांधीच्या आणीबाणीनंतर, देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी देखील इंदिरा हटाव, लोकशाही बचाव म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सर्व विरोधी पक्ष एक झाले होते. परंतु किमान समान कार्यक्रम नसल्यामुळे व वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. त्यामुळे जनता पार्टीचे विघटन झाले. चौधरी चरणसिंग देशाचे काही काळ पंतप्रधान राहिले. परंतु पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. पुढे राजीव गांधी व काँग्रेस विरूद्ध देशात वातावरण निर्माण झाल्यानंतर, पुन्हा देशात विरोधी पक्ष एक झाले व त्यांनी राजीव ...
बाळासाहेब आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

बाळासाहेब आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर जाणार नसल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप-आरएसएसने आपल्या निवडणूक फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतावणी दिली होती की, “जर पक्षांनी देशापेक्षा महत्वाचा पंथ ठेवला तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल.” माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. “देशा पेक्षा जास्त पंथा ला महत्वाचं मानणाऱ्या ” भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्री माई, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांनी पत्रावर सही केली....