Wednesday, June 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Market Yard Police Station

बिर्याणी चांगली झाली नाही तर तुला किडनॅप करीन- धमकी देवून विनयभंगही केला, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

बिर्याणी चांगली झाली नाही तर तुला किडनॅप करीन- धमकी देवून विनयभंगही केला, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/माकेटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेल मध्ये आरोपीनी प्रवेश करून महिलेसोबत अश्लील गैरकृत्य केले. तसेच बिर्याणी चांगली झाली नाही तर किडनॅप करण्याचीही धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिलेचे मार्केटयार्ड येथे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी लक्ष्मण घाडगे हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आला होता. त्याने फिर्यादी यांच्या पतीकडे बिर्याणीची मागणी केली असता त्यांनी अर्धातास लागेल असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांचे पती कंस्ट्रक्शन साईवर गेले. दरम्यान, फिर्यादी हॉटेलच्या किचनमध्ये बिर्याणी तयार करत होत्या. त्यावेळी आरोपी किचनमध्ये आला. त्याने फिर्यादी यांच्या लागावर हात फिरवून गैरवर्तन केले. तसेच बिर्याणी चांगली बनवण्यास सांगून बिर्याणी चांगली झाली नाहीतर तुला किडनॅप करेन अशी ध...
पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या...
पुण्यातील स्वारगेट आणि मार्केटयार्ड पोलीसी कारभारामुळे… तुझ्या गळा, माझ्या गळा, बांधु मटक्यांच्या माळा…

पुण्यातील स्वारगेट आणि मार्केटयार्ड पोलीसी कारभारामुळे… तुझ्या गळा, माझ्या गळा, बांधु मटक्यांच्या माळा…

पोलीस क्राइम
तुझा 1 क्लब, माझे दोन क्लब…चौथा आला नटराजवर…स्वारगेट व मार्केटयार्डात कायदयापेक्षा मोठा हात नेमका कुणाचा आहे….नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्याचे तत्कालिन गृहमंत्री कै. आर.आर पाटील यांनी महाराष्ट्रात डान्सबार वर बंदी आणली. केवळ घोषणा न करता, डान्सबार बंदीचा कायदा आणला. तसेच राज्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास, संपूर्ण पोलीस स्टेशनचे अधिकारी निलंबित केले जातील अशी घोषणा केली होती. नंतर अनेक वर्षानंतर, पुण्यातही तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी देखील ज्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व गैरकायदयाचे धंदे आढळुन येतील त्यांच्या विरूद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी तंबी दिली होती. तंबी दिली खरी परंतु कारवाई कधीच केली नाही. परंतु कारवाईच्या भीतीने पोलीस स्टेशन हद्दीत नवीन अवैध धंदे सुरू होऊ दिले जात नव्हते. आता मात्र रान मोकळे झाले आहे. ना तंबी, ना कारवाईची भीती, सगळे अलबेल सुरू ...
उस्मानाबाद येथून पळून आलेल्या गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीसांनी केले जेरबंद

उस्मानाबाद येथून पळून आलेल्या गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोन पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करून पुण्यात पळुन आलेल्या गुन्हेगाराला पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी जेरबंद केले आहे. शिराढोन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302, 364, 324, 323, 504, 506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार वय 26 वर्ष, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद यास गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी करता त्याने उस्मानाबद येथे गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद यांचे ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्निक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 05 श्री. विक्रांत देशमुख, सहाय्यक पो...
मार्केटयार्ड, सिंहगड रोड व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सहा लाखापेक्षा अधिक रकमेची चोरी दरोडा

मार्केटयार्ड, सिंहगड रोड व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सहा लाखापेक्षा अधिक रकमेची चोरी दरोडा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 6 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची घरफोडी व दरोड्याचे प्रकार समोर आले आहेत. गुन्ह्यांची हकीकत अशी की मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी या गाळ्यासमोरील सार्वजनिक शौचालया बाहेर फिर्यादी व त्यांचा भाऊ मार्केट यार्ड मध्ये मध्ये माल विक्री करण्याकरिता आले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर लघुशंका करीत असताना जवळच झाडाखाली असलेल्या एका आरोपी इसमाने ही लघवी करण्याची जागा आहे का... येथून बाहेर जा... म्हणून मार्केटयार्ड मध्ये माल विक्री करण्याकरिता आलेल्या फिर्यादी यांना शिवीगाळ करून, हाताने मारहाण करून, त्यांच्या...
आंबेडकरनगरात गोळीबार, मार्केटयार्ड पोलीसांनी 24 तासाच्या आत आरोपी संतोष कांबळेच्या मुसक्या आवळल्या

आंबेडकरनगरात गोळीबार, मार्केटयार्ड पोलीसांनी 24 तासाच्या आत आरोपी संतोष कांबळेच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
marketyard police पुणे/दि/ नॅशनल फोरम/छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गुलटेकडी येथील आंबेडकरनगर वसाहत ही मुळातच गोरगरीब, कष्टकरी, हमाल व मजुरीवर काम करणाऱ्यांची वसाहत म्हणून ओळखली जाते. याच वसाहतीत संतोष वामन कांबळे, वय 35 वर्षे, रा. आंबेडकरनगर, गल्ली नं. 11, मार्केटयार्ड पुणे याने आंबेडकरनगर परीसरात पिस्तुलाने गोळीबार करुन फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झाला होता. याबाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असल्याने, पुणे शहर पोलीसांकडील गुन्हे शाखेच्या यंत्रणांनी जंगजंग पछाडले असता, आरोपीचा शोध लागत नव्हता. दरम्यान वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनघा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम गायकवाड व त्यांच्या टिमने अतिशय शिताफीने आरोपीला अटक केले आहे. अवघ्या 24 तासात मार्केटयार्ड पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आंबेडकरनगरात गोळीबार करून फरार झालेल्या ...
मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे आणि गुन्हेगारांचा अड्डा आहे काय…पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलीसांनी केले जेरबंद

मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे आणि गुन्हेगारांचा अड्डा आहे काय…पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
पुणे/दि/national forum/आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड पुण्याचा नावलौकिक आहे. त्याच मार्केटयार्डात चाकू, सुऱ्या, कोयते पकडण्यात आले होते. आता त्याच मार्केटयार्डात अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे, मार्केटयार्ड म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा असे काहीसे चित्र सध्या दिसत आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष यादव यांना खबर मिळाली की, मार्केटयार्डातील गोल बिल्डींग जवळ एक इसम उभा असून त्याच्याकडे अवैधरित्या पिस्तुल आहे. त्याच्या हातातून कोणतातरी गंभिर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ए.व्ही. देशपांडे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती सवित ढमढेरे यांना ही बाब सांगुन कारवाईबाबतच्या सुचना मिळाल...