Sunday, April 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

पोरगी पळवून आणू, तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आलीय? अजित पवारांचा घणाघात

पोरगी पळवून आणू, तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आलीय? अजित पवारांचा घणाघात

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/                 सरकार म्हणतंय बेटी बचाव आणि बेटी पढाव आणि यांचा एक निर्लज्ज आमदार म्हणतोय पोरगी पळवून आणू. तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आली? आणि हे भाजपचे प्रवक्ते म्हणून मिरवतात. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे, असा घणाघात अजित पवार यांनी केला.                 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार प्रदान समारंभात अजित पवारांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली.                 ते म्हणाले की पक्षाचा एक आमदार महिलांबाबत असे बोलतो. मात्र, पक्षाचे प्रमुख लोक काही बोलू शकत नाहीत हे घ...

देशाच्या प्रमुखाने खोटे बोलू नये – ऍड. आंबेडकर

राजकीय
गडचिरोली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कोणतेही आकडेवारी फुगवून सांगतात. जीएसटीमुळे शासनाच्या तिजोरीत किती पैसा आला, याचे उत्तर मोदींकडे नाही. मोदी आपली शैक्षणिक कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत. खोटे बोलण्याची प्रवृत्ती देशाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या माणसात नसावी.                 देशाचा  प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय, अशा शब्दात भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावला. येथील कात्रटवार भवनातआयोजित संवाद यात्रेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांच्या विमानात कोण बसले होते, याचा खुलासा त्यांनी करावा.               ...

भाजप श्रीमंत पक्ष कसा बनला?

राजकीय
नवी दिल्ली/दि/ कुठल्याही उद्योजकांची कॉंग्रेसने ‘चोर-लुटेरे’ अशी हेटाळणी केलेली नाही. उलट भाजपनेच कुडमुडया भांडवलदारांना हाताशी धरलेले आहे. याच भांडवलदारांकडून उभारलेल्या ट्रस्टचा बहुतांश पैसा भाजपकडे गेला आहे. चार वर्षांत भाजप सर्वात श्रीमंत पक्ष कसा बनला, असा सवाल कॉंग्रेस नेता आनंद शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परषिदेत केला.                 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखनौमधील सभेत कॉंग्रेसच्या दुटप्पीपणावर टीका केली होती. ‘उद्योजक म्हणजे कोणी चोर-लुटेरे नाहीत. त्यांच्याशेजारी उभे राहण्याची भीती कशाला बाळगायची?’ अशी टिप्पणी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना आनंद शर्मा म्हणाले की, उद्योगांना प्रोत्साहन देण्याचीच कॉंग्रेसची भूमिका राहिलेली आहे.          &nbs...