Wednesday, December 6 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: vba

“वंचितने इंडिया विरोधात उमेदवार देऊ नये”, रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर म्हणाले, “त्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने”

“वंचितने इंडिया विरोधात उमेदवार देऊ नये”, रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर म्हणाले, “त्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने”

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भाजपाप्रणित एनडीएविरोधात देशातले 28 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात तयार केलेल्या आघाडीला ….. (इंडिया) असं नाव दिलं आहे. या आघाडीत महााष्ट्रातले दोन पक्ष सहभागी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या आघाडीचे सदस्य आहेत. परंतु, देशात काही पक्ष असे आहेत जे एनडीएचे सदस्य नाहीत त्याचबरोबर इंडिया आघाडीचेही सदस्य नाहीत. यापैकी काही पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. परंतु, इंडिया आघाडीने त्यांना आघाडीचं निमंत्रण दिलेलं नाही. एमआयएम आणि वंचितच्या काही नेत्यांनी इंडिया आघाडीने त्यांना सामावून घ्यावं अशी इच्छा अनेकदा ...
‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/इंडीया आघाडीची बहुचर्चित बैठक मुंबईत पार पडली. भाजप विरोधात एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रणच दिलेले नाहीत. वंचित सोबत नसेल तर महाराष्ट्रात इंडीया आघाडीचे भविष्य काय असेल? आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या बैठकीमध्ये 2024 ला भाजपला घेरण्याचे मनसुभे आखले गेले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने महाराष्ट्रातील राजकारणात प्रबळ असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रणच दिले नसल्याची बाब वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्पष्ट केलीय. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचितचा झंझावात निर्माण झाला होता. युतीची बोलणी फिस्कटल्याने वंचितने एम आय एम सोबत निवडणुका लढवल्या होत...
वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारताच्या निवडणूक इतिहासातील 2024 ची लोकसभा निवडणूक अगदी वेगळी असणार आहे, अगदी घनघोर राजकीय युद्धच असेल. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडीच्या दृष्टीनेही उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्र महत्त्वाचे ठरणार आहे. देशात राजकीय परिवर्तन घडवून आणायचे असेल तर विरोधकांना, विशेतः काँग्रेसला महाराष्ट्र सर करावा लागेल. मात्र त्यासाठी केवळ राजकीय आघाडी करून चालणार नाही. राज्यात निवडणुकीवर प्रभाव टाकणारे विविध सामाजिक घटक आहेत, त्या राजकीय शक्ती आहेत. ज्यांच्या बाजूने त्या जातील त्यांचा विजय निश्चित आहे, असे आजवरचे निवडणूक निकाल सांगतात. अशांपैकी महाराष्ट्रात वंचित बहुजन समाजाची राजकीय शक्तीचा निवडणुकीवर कायम प्रभाव राहिला आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही तिची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सु...
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

राजकीय
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाईपुणे/ प्रबुद्ध भारत/दि./प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटद्वारे जोरदार टीका केली आहे. हरयाणा दंगलीच्या संदर्भातील एक बातमी आणि धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत त्यांनी 2014 मध्ये केंद्रात भाजप-आरएसएसचे सरकार आल्यानंतर दलित-आदिवासी आणि मुस्लिमविरोधी आणि ओबीसी-विरोधी हिंसाचारात झपाट्याने वाढ झाल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ट्विट मध्ये पुढे ते म्हणाले आहेत की, ‘द्व्‌ेष, जातिवाद आणि मृत्यूच्या व्यापाराचा ठेकेदार आणि त्याचे गुंड निवडणुकीतील फायदा मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी दंगली भडकावण्यावर, ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक आणि जातीय ...
2018 मधील हिंसाचार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी घ्या- बाळासाहेब आंबेडकर

2018 मधील हिंसाचार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी घ्या- बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारतीय जनता पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमित मलिक आणि सुवेझ हक यांची उलट तपासणी घेण्याची मागणी झाली आहे. 2018 रोजी हिंसाचार प्रकरणात ही तपासणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ही मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर आता देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी होणार का? याचा निर्णय आयोग घेणार आहे.काय आहे प्रकरण-पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या दिवशी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. तसेच दहा पोलिस सुद्धा जखमी झाले होते. त्यावेळी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषद अन्‌‍? त्या परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी आयोग नेमला आहे. न्याय...
गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 20 जुलैला विधानभवनावर मोर्चा

गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 20 जुलैला विधानभवनावर मोर्चा

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumराज्यातील गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात येत्या 20 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातील वंचितनं मोठी तयारी सुरु केली आहे. याच मोर्चाच्या तयारीसाठी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर मोठी मेहनत घेत आहेत. गुरूवार दि.20 जुलैच्या विधानभवनावरील मोर्चाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळेल. या मोर्चाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्यभरातील गायरानधारकांशी या मोर्चाच्या अनुषंगाने बोलणं सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. गायरानधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बाळासाहेब आंबेडक यांचे भावनिक नातं आहे. हा प्रश्न गायरानधारकांसाठी जीवन-मरणाचा असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले. हंगाम सुरु...
उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?

उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?

राजकीय
अकोला/दि/ प्रतिनिधी/सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. यावेळी त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली. या निरीक्षणांवरून आमच्या बाजूने निकाल लागल्याच्या प्रतिक्रिया दोन्ही गटांकडून व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले. काल त्यांनी निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर आता वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. आक्रमक भूमिका घ्या -न्यायालयाच्या निर्णयातून आज उद्धव ठाकरे यांना मोठं हत्यार मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. तरचं ते आमदार अपात्र होतील असा जाहीर सल्ला वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषद बोलत होते. हा जाहीर सल्ला देतोय. कारण ज्यावेळी गोंधळला माणूस असतो, त्यावेळी खरी सल्ल्याची गरज असत...
अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहनसोशल मीडियाचा वापर करत दंगल भडकवण्याचा काम सुरू अकोला/दि/ प्रतिनिधी/अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.आज झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मी स्वतः दोन्ही समाज घटकांशी बोलण्याचा मी दिवसभर प्रयत्न करीत होतो. शहरात शांतता राहिली पाहिजे. दरम्यान अकोला शहरात शांतता आली आहे असे दिसत असले तरीही वातावरण तापते आहे असे मला दिसत आहे.हिंदू व मुस्लिम या दोन्ही समुदयांना मी शांततेचे आवाहन करीत आहे. शेवटी या दंगलीतून काहीही निष्पन्न होत नाही, नुकसान हेोते. त्याच्यामुळे यापुढे दंगल होणार नाही याचे दक्षता दोन्ही समाजाने घ्यावी असे आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा फॅक्टर, आता सुजात आंबेडकर यांची एन्ट्री

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum/पर्यायी राजकारण देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला आता नवा चेहरा मिळणार आहे. परदेशात शिक्षण घेऊन परत आलेल्या सुजात आंबेडकर यांनी पुन्हा सक्रीय होत बहुजन कार्यकर्त्यांवर असलेल्या राजकीय गुन्ह्यांचा प्रश्न हातात घेऊन सर्वपक्षीय युवकांना साद घातली आहे. सुजात आंबेडकर यांनी ‘सतरंजी उचल्या' अशी भूमिका असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांवर असलेल्या केसेस चा मुद्दा हातात घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे. राजकीय आंदोलनं असोत, सण असोत किंवा रस्स्त्यावरचा संघर्ष, सामान्य कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असतात. नवरात्र मंडळ, गणपती मंडळ, दहीहंडी मंडळ असो नाही तर मोर्चे आंदोलनं, गुन्हे दाखल होणाऱ्यांमध्ये बहुजन युवक, युवतींचा भरणा जास्त असतो. राजकीय पक्ष ही अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. कोर्टकचेऱ्या आणि पोलिस...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

राजकीय
काँग्रेसची अवस्था आजही जुन्या जमिनदारासारखी आहे पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसनेच अधिक काळ देशात व महाराष्ट्रात सत्ता उपभोगली आहे. देशातील व राज्यातील बहुजन समाजाला सत्तेत येऊ दिले नाही. यांनीच राज्य केलं. त्यामुळेच राज्यात 3/4 वेळेस काँग्रेसला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता देखील बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आंबेडकरी समुह व बहुजन समाजाची या पक्षांना मते हवीत परंतु या समाजांना सत्तेत वाटा दयायचा नाहीये. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गळयात आणि गाडीवर निळे झेंडे लावुन फिरत आहेत. दोन्ही काँग्रेसवाले कुणाला विचारून निळे झेंडे वापरत आहेत असा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ...