Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं; बाळासाहेब आंबेडकर

पुणे/अकोला/दि/
विजय वडेट्टीवारांनी अनलॉक जाहीर केल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यात लॉकडाऊन कायम असल्याचं प्रसिद्धीपत्रक काढलं. त्यामुळे ठाकरे सरकारमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आलीय. भाजपनं हा मुद्दा उचलून धरत रान पेटवलंय, तर सत्ताधार्‍यांमध्येही एकमेकांना चलबिचल पाहायला मिळत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनीही या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय.


एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची अन् भाजपवर टीका करायची
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसला मोलाचा सल्ला दिलाय. एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं, असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाही, असंही त्यांनी सुनावलंय.
आपत्ती व्यवस्थापनाचे निर्णय लागू झाले पाहिजेत
आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्याचा वापर करून कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केलं, मात्र मुख्यमंत्र्यांनी ते रद्द केलं, हे चुकीचं असून आपत्ती व्यवस्थापनाचे निर्णय लागू झाले पाहिजेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे आणि हे महाराष्ट्र संस्कृतीला न पटणारं आहे. कारण सध्या आपत्ती व्यवस्थापनाचा हाच निर्णय लागू झाला तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की आहे. यांच्या खेळामध्ये सामान्य भरडला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी केलाय.
वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केलं, तर मुख्यमंत्र्यांचा अपमान
यावेळी बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, एका मंत्र्यांचा अपमान होत असेल तर कॉंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं. दरम्यान एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाहीत. टीका करायची टीका करा आणि सत्तेत राहायचं असेल तर सतेत राहा,
वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केलं, तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा निर्णय बदल करून लागू केला, तर हा मंत्र्यांचा अपमान आहे. म्हणून दोघांपैकी एकाने राजीनामा द्यावा, असा सल्लासुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलाय.
बाळासाहेब आंबेडकर हे एका महत्त्वाच्या विषयासाठी जिल्हाधिकारी यांना भेटायला गेले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना यावर भाष्य केलंय.