Friday, September 11 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: pune city police

परराज्यातून अंमली पदार्थांची पुण्यात तस्करी, पाहिजे आरोपी दिपक तुपे याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले जेरबंद!

परराज्यातून अंमली पदार्थांची पुण्यात तस्करी, पाहिजे आरोपी दिपक तुपे याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले जेरबंद!

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/आंध्र प्रदेश, ओडीसा राज्यातून गांजा अंमली पदार्थाची विक्री पुण्यात करणाऱ्या पाहिजे आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. दोन यांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरामध्ये परराज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या संघटित टोळी विरोधात प्रभावी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पुणे शहर पोलीसांनी दिली आहे. वानवडी पोलीस स्टेशन, मध्ये गु.र.नं. 364/2026 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 20(ब) व 29 प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी दिपक आबाजी तुपे, (वय 39 वर्षे, रा. लेन नं. 01, राजस सोसायटी, गणपती मंदिराजवळ, विद्यानगर कात्रज, पुणे) यास अंमली पदार्थ विरोधी पथक 02. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे सोलापुर महामार्गावर पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले असुन दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आलेली आहे. आरोपी विरुद्ध यापुर्वी आंध्र प्र...
एक लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री तुड्येकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक

एक लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री तुड्येकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर हद्दीत रॉयल फॉरेक्स ट्रेडींग या नावाने कंपनीचे कार्यालय चालू करून रॉयल ट्रेडिंग कंपनीमध्ये 01 लाखापासून पुढे 100 कोटी पर्यंतच्या गुंतवणुक स्विकारल्या जातात तसेच दिलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतविली जाते व उरलेली 70 टक्के रक्कम सुरक्षीत ठेवली जाते, त्यामुळे गुंतवणुकदारास त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर चांगला परतावा दिला जातो… असे सांगून अनेक गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे खोटे आमिष दाखवुन फसवणुक करणारी महिला राजश्री राजेश तुडयेकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली आहे. रॉयल फॉरेक्स ट्रेडींगच्या राजश्री राजेश तुडयेकर हीच्या विरोधात शिवाजीनगर येथे भादवि कलम 406,409,420, सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 (एमपीआयडी) कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हयाच्य...
PUNE Police-पुण्यातील क्राईम ब्रँच ॲक्शन मोडवर?  युनिट 1, युनिट 2 व युनिट 4 ने आंदेकर टोळीसह वेगवेगळ्या टोळ्या व गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपीस केले जेरबंद

PUNE Police-पुण्यातील क्राईम ब्रँच ॲक्शन मोडवर? युनिट 1, युनिट 2 व युनिट 4 ने आंदेकर टोळीसह वेगवेगळ्या टोळ्या व गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपीस केले जेरबंद

पोलीस क्राइम
  नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ANIRUDDHA SHALAN CHAVAN-पुणे शहर पोलीस दलातील क्राईम ब्रॅंच ॲक्शन मोडवर आली असल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून आले आहे. युनिट एक, युनिट दोन व युनिट 4 ने फरार व पाहिजे आरोपीस जेरबंद केले आहे. दरम्यान पुणे शहरात कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांतील पाहिजे व फरार आरोपींचा रोजच्या रोज शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच टोळीतील सक्रिय व असक्रिय सदस्य आणखी गंभीर गुन्हे करण्याची दाट शक्यता असून पाहिजे व फरार आरोपी मिळून आल्यास त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच त्यांचेवर कडी निगराणी ठेवावी. त्यांचेकडुन कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे गुन्हे शाखेला आदेश दिल्याची माहिती क्राईम ब्रॅंच युनिट एकने प्रसिद्धीला दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे. दरम्यान युनिट एक ने आंदेकर टोळीतील व 8 महिन्यांपासून फरार आरो...
दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणाऱ्या सराईत आरोपीस पर्वती पोलीसांनी केले जेरबंद

दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणाऱ्या सराईत आरोपीस पर्वती पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तुल बाळगणाऱ्या व धनकवडी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या अजित कसबे याला जेरबंद करण्यात पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांच्यासह तपास पथकाचे किरण पवार व महेश मंडलिक यांना यश आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी किरण पवार व पोलीस अंमलदारासह गस्त घालत असतांना, पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना गोपनिय माहिती मिळाली की, एक इसम दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीचे बंदुक जवळ बाळगत आहे. लागलीच पर्वती पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रमुख किरण पवार यांनी सापळा रचुन आरोपी अजित सागर कसबे वय 21 वर्ष (रा. स.नं. 15. विघ्नहर्ता सोसायटी, फ्लॅट नं. 504, आंबेगाव पठार धनकवडी पुणे ) यास अत्यंत शिता...
पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीसांनी अखेर सुतावरून स्वर्ग गाठलाच, मैफिल पान हाऊसच्या धाग्यादोऱ्यातून अंमली पदार्थाच्या कारखान्यावर छापा, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीसांनी अखेर सुतावरून स्वर्ग गाठलाच, मैफिल पान हाऊसच्या धाग्यादोऱ्यातून अंमली पदार्थाच्या कारखान्यावर छापा, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीसांनी मनांत आणल तर पाताळात लपलेल्या गुन्हेगाराला देखील जमीनीवर आणू शकतात.मेरी आवाज सुनो हे पृथ्वीवरील पडलेल्या प्रश्नांचे उत्तर असले तरी, तिन्ही लोकांत ( आकाश,जमीन व पाताळ) भ्रमंती करण्याचे कसब हे पुण्यातील पोलीसांकडे आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील मैफिल पान हाऊस मध्ये सापडलेल्या धाग्या-दोऱ्यातून थेट स्वर्गात प्रवेश करून आरोपींना बेड्या ठोकण्यात पुणे व पिंपरी चिंचवडच्या पोलीसांना यश आले आहे. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की,लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत दि. 13 मार्च रोजी मैफिल पान हाऊसवर छापा कारवाई करण्यात आली. त्याच्यावर एनडीपीएस नुसार गुन्हेही दाखल केले. परंतु या गुन्ह्याचा तपास करता त्याचे धागेदोरे पिंपरी चिंचवड हद्दीपर्यंत येऊन पोहोचले. दरम्यान दि. 14 मार्च रोजी पिंपरी चिंचवड भागात गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 2 अधिक तपास करत...
पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्याकडून, चेन स्नॅचींग- घरफोडी- वाहन चोरीचे राज्यभर गुन्हे?

पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्याकडून, चेन स्नॅचींग- घरफोडी- वाहन चोरीचे राज्यभर गुन्हे?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीस असल्याची बतावणी करून संपूर्ण राज्यात चेन स्नॅचींग, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस खंडणी विरोधी पथक क्र. 2 ने शिताफीने अटक केली आहे. मागील 8 महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देवून पळत होता. परंतु अखेर पोलीसांनी जमावातून देखील त्याला ओळखुन पकडण्यात यश आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,पुणे शहर खंडणी विरोधी पथक दोन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग कामी व गोपनीय माहिती काढून गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले यांना गोपनिय बातमी मिळाली की, वाघोली स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मुसली मनासीर बेग (इराणी) वय 37 (रा. पठारे वस्ती लोणीकाळभोर पुणे) येथे राहते घरासमोर बसल्याची गोपणीय माहिती मिळाली. त्यानुस...
माझ्या मित्राला शिवी का दिली….., उसने घेतलेले पैसे का मागता म्हणत उत्तमनगर व वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत हत्यारे उपसली, पुण्यात चिल्लर कारणांवरून, लोक हत्यारे का काढत आहेत…

माझ्या मित्राला शिवी का दिली….., उसने घेतलेले पैसे का मागता म्हणत उत्तमनगर व वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत हत्यारे उपसली, पुण्यात चिल्लर कारणांवरून, लोक हत्यारे का काढत आहेत…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हा करण्यास किंवा गुन्हा घडण्यास काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय, गुन्हा घडत नाही ही गुन्ह्याची व्याख्या असली तरी, आता मूळ गुन्ह्याची व्याख्याच बदलण्याची वेळ आली आहे. काहीतरी चिल्लर आणि थिल्लर कारणांवरून लोक गुन्हा करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशाच काही घटना आज पुणे शहरात घडल्या आहेत. वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत माझ्या मित्राला शिवी का दिली म्हणून हत्यारे काढण्यात आली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली तर उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत तर तिसऱ्याने उधार घेतलेले पैसे का मागतो म्हणून तिथेही दुसऱ्याने हत्यारे काढुन दहशत निर्माण करण्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांच्या मनांत कायदयाचा धाकच राहिला नसल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. मित्रास शिवी का दिली-वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील रायसोनी कॉलेज गेट समोर येथे एक 22 वर्षीय इसम वय 22 वर्ष (रा. आव्हाळवाडी र...
फरासखाना व खडक पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी करणाऱ्यास दरोडा-वाहनचोरी पथकाने केले जेरबंद

फरासखाना व खडक पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी करणाऱ्यास दरोडा-वाहनचोरी पथकाने केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना व खडक पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरीच्या घटना घडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वाहन चोरी प्रकरणी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 कडील पोलीस अंमलदार तपास करीत होते. दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीबाबत आरोपींचा शोध घेत असतांना, गोकुळ नगर कात्रज येथील वाहन चोरटयाचा तपास लागला. गुन्ह्याची हकीकत अशी की,फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचा शोध दरोडा-वाहनचोरी पथक, संबंधित गुन्हा दाखल झालेपासून सीसीटीव्ही फुटेज चेक करीत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्ह्यातील वाहनचोरी करणारा संशयित इसम हा गोकुळनगर, कात्रज या परीसरात फिरत आहे. सदरची माहीती पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 वर्षा देशमुख यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य त...
30 लाखाच्या फॉर्च्युनर गाडीतून 10 लाख 60 हजाराचा गांजा जप्त

30 लाखाच्या फॉर्च्युनर गाडीतून 10 लाख 60 हजाराचा गांजा जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/थेऊर येथील धुमाळ मळा येथून 30 लाख रुपयांच्या फॉर्च्युनर गाडीतून सुमारे 10 लाख 60 हजार रुपये किंमतीचा एकुण 53 किलो 14 ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 ने पकडण्यात यश आले आहे. मध्यरात्रौ 11 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत थेऊर येथे सापळा लावण्यात आला होता. गुन्ह्याची हकीकत अशी की,पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-1. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांचेकडील पोलीस अधिकारी व पथक असे पुणे शहर हद्दीत दि. 11 मार्च रोजी गस्त करीत असताना स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,एक इसम पांढऱ्या रंगाच्या अलिशान फॉर्च्युनर गाडीमधून गांजाचा मोठा साठा विक्री करीता थेऊर परीसरात घेवून येणार आहे अशी बातमी प्राप्त झाली. लगेचच मध्यरात्रौ 11 वाजण्याच्या सुमारास अंमली विरोधी ...
स्पोर्ट बाईकवर भरधाव येवून मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतिय टोळीचा पर्वती पोलीसांनी केला पर्दाफाश, चोरांचा पाठलाग, 8 मोबाईल व 1 मोटारसायकल जप्त

स्पोर्ट बाईकवर भरधाव येवून मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतिय टोळीचा पर्वती पोलीसांनी केला पर्दाफाश, चोरांचा पाठलाग, 8 मोबाईल व 1 मोटारसायकल जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात रस्त्याने एकटे मोबाईलवर बोलत चालणाऱ्या इसमांचे फोन स्पोर्ट बाईकवर भरधाव वेगात येवुन, अचानक हिसकावून घेवून, चोरी झाल्या दोन घटना पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या. पर्वती पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांनी सी.सी.टी.व्ही. च्या आधारे शोध घेत असतांना, नवी मुंबई पासिंग असलेल्या वाहनावर पुण्यात चलन पडले होते. यमाहा आर-15 या वाहनावर पुणे शहरात वाहतुक पोलीसांकडून चलन करण्यात आल्याने पोलीस वाहनाच्या मालकाचा शोध घेत असतांना, नवी मुंबई येथून संबंधित वाहन चोरी झाल्याची नोंद आढळुन आली. सदरील वाहन चोरीचे असल्याचे व ते पुण्यामध्ये वापरात असल्याचे धागेदारे मिळाल्यानंतर, पुण्यामध्ये संबधित बाईक चालविणाऱ्या चोरट्यांचा शोध घेवून त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने पकडले असता त्यांच्याकडुन सुमारे 8 मोबाईल फोन व चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली....