Friday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे

मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे

राजकीय
जळगाव/दि/भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या खडसे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे. मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला म्हणून दिलं आहे. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले आहेत असं म्हणत खडसेंनी भाजपावर टिका केली आहे. ते मुक्ताईनगर येथे बोलत होते.मला फाशी घेण्याची वेळ आली होती. इतकं भाजपामधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशी खंत देखील एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविले. भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळ झालं. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आलं.मला अक्कल शिकवायला चालले होते. मी अख्खं आय...
मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा – वडेट्टीवार

मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा – वडेट्टीवार

राजकीय
नागपुर/दि/मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसीसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे. अशा वेळी ओबीसी मुलांनी बेरोजगार म्हणून फिरायचे काय, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.ओेबीसींसह इतर समाजातील मुलांना कदापी वेठीस धरायला नको. मराठा समाजावर अन्याय व्हायलाच नको. पण असे करतांना ओबीसी वरील अन्याय नको असे ते म्हणाले. नोकरभरतीसाठी ओबीसी तरूणांमध्ये असंतोष वाढत आहे. कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको अशा भावना वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत.या संदर्भात ऍडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेवून लवकरच निर्णय घेवू. मोठ्या समाजाने लहान समाजाला किती दाबत ठेवायचे असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकर्‍यांत १२ टक्के आरक्षण दिले आहे. याला कुणी कोर्टात आव्हान दे...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते; आंबेडकरांचा दावा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते; आंबेडकरांचा दावा

राजकीय
पुणे/दि/परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचं काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशारा बाळासाहेब आंबेडकरांना दिला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर चझडउ ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन बाळासाहेब आंबेडकरांनी टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या कायद्याकडे कानाडोळा करतो. शेतकरी कृषी बिलवर महाराष्ट्र सरकारने कायदा लागू होऊ देणार नाही असे म्हणतो. पण केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू ...
महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई:आंबेडकर

महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई:आंबेडकर

राजकीय
मुंबई/दि/शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी टीका केली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली. भाजपने सुरू केलेलं मंदिर आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक चकमक या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने अद्यापही मंदिरं सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरं उघडी न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत आहे. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.यावेळी...
शिवसेना मला बघून घेणार म्हणजे, माझा मर्डर करणार आहे का?’

शिवसेना मला बघून घेणार म्हणजे, माझा मर्डर करणार आहे का?’

राजकीय
मुंबई/दि/छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असे शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगितले जाते. मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? ते माझा खून करणार आहेत का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला.ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सामना’तून करण्यात आलेल्या टीकेवरुन सेनेवर पलटवार केला. मुळात ‘सामना’ या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेत आहे, तेच मला समजत नाही. मला सामनाला एवढंच विचारायचं आहे की, तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका. तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो, असे जाहीर आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेनेला दिले. तसेच बाळासाहेब आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याचे भाकीतही वर्तवले. सध्या केंद्र आणि राज...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात ओबीसींना डावलले, भुजबळांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात ओबीसींना डावलले, भुजबळांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राजकीय
मुंबई/दि/केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत इतरमागास प्रवर्गाचा (ओबीसी) समावेश सर्वसाधारण प्रवर्गात करण्यात आला आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक युवतींवर अन्याय होत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बदल करावा, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत काढलेल्या शासन निर्णयानुसार (शासन निर्णय क्र.योजना-२०१९/प्र.क्र.१२१ उदयोग-७, मंत्रालय, मुंबई दि.०१ ऑगस्ट, २०१९) केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती (पीएमईजीपी) या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक युवतीसाठी मुख्यमंत्री रोज...
मराठा आरक्षण प्रकरणी………… छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाची दिशाभूल करून दुटप्पीपणे वागत आहेत – प्रविण गायकवाड

मराठा आरक्षण प्रकरणी………… छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाची दिशाभूल करून दुटप्पीपणे वागत आहेत – प्रविण गायकवाड

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/संसदेत एक आणि बाहेर दुसरी भूमिका घेवून मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याची टिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.राज्यसभेत २०१८ मध्ये मंजूर झालेल्या १०२ व्या घटना दुरूस्तीमुळे मागासवर्ग आयोगाच्या कादयाने आरक्षणासाठी नवे प्रवर्ग तयार करण्याचे राज्यांचे अधिकार रद्दबातल ठरले. या घटना दुरूस्तीला भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांसमोर जाऊन आर्थिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी) मराठा आरक्षणाची मागणी करण्याचा दुटप्पीपणा करतात. संसदेत एक बोलतात आणि समाजासमोर त्याच्या विरोधी भूमिका म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल असल्याची टीका त्यांनी केली आहे. मराठा समाजाला राखीव जागा मिळाव्यात यासाठी सातार्‍याचे भाजपाचे खासदार छत्रपती उदयन राजे भोसले व कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज यांना मराठा मेळाव्यांतून बोलाविले जात आहे. या म...
बाबरी मशीद निकाल हा देश हिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल -आंबेडकर

बाबरी मशीद निकाल हा देश हिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल -आंबेडकर

राजकीय
बाबरी मशीद निकाल हा देश हिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरीलविश्वास उडेल -आंबेडकर पाटणा(बिहार)/दि/बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते, त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र, आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. आयोध्या, बाबरी मशीद प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. दरम्यान आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आले आहे. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहि...
युपीच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, आरोपींना अटक करा -आंबेडकर

युपीच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, आरोपींना अटक करा -आंबेडकर

राजकीय
पाटणा (बिहार) /दि/उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका आंबेडकरी युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काल या तरुणीने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. या घटनेवर युपी मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केल्याने, संतप्त झालेल्या बाळासाहेब आंबेडकर यांनी, संबंधित युवतीने गुन्हेगारांची नावे स्पष्ट केली असतांना, एसआयटीची पेक्षा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून यावरून अस स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.महिलांसो...
एक (श्रीमंत) मराठा = लाख (गरीब) मराठा, मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नको-  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

एक (श्रीमंत) मराठा = लाख (गरीब) मराठा, मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नको- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

राजकीय
कोल्हापुर/दि/आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूरातील मराठा समाजाचे मातब्बर नेते व राज्याचे माजी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील मोठ्या नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याचा घणाघात केला आहे. राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते. परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्किल होत आहेयाची जाणव त्यांना नाही. आपला समाज आपल्यामागे केवळ फरफटत यावा अशीच यातील अनेकांची इच्छा असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.ते पुढे म्हणाले की, गेल्या १५ वर्षात महाराष्ट्रात दोन्हीी कॉंग्रेसची सत्ता असतांना, त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते. मराठा समाज गरीब राहिला. तो बेरोजगार राहिला, तर यांच्यामागे तो फिरत राहील आणि हेच या मोठ्या नेत्यांना हवे आहे. गरीब मराठा समाजाचे प्र...