
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीतांनी सहकारनगर, भारती विद्यापीठ व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गंभिर स्वरूपाचे गुन्हे करून मागील एक वर्षांपासून फरारी होता. त्यातच सहकारनगर पोलीस स्टेशन यांनी सबंधित आरोपींवर एमपीडीए कायदयानुसार कारवाई केल्यानंतर देखील मागील एक वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत होता. अखेर युनिट दोन कडील पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर यांनी अतिशय शिताफिने आरोपीचा माग काढत, आरोपीला ता. म्हसवड जि. सातारा येथुन ताब्यात घेतले आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
पुणे शहरात विशेष मोहिमेअंतर्गत पाहिजे , फरारी आरोपीताचा शोध घेत असताना दि. 29 ऑक्टोंबर रोजी युनिट 2 कडील पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर यांना गोपनीय बातमी मिळाली की, सहकारनगर पोलीस स्टेशन एम.पी.डी.ए. कारवाई अनुषंगाने दि.03/10/2026 रोजी झालेल्या आदेशापासून पाहिजे असलेला आरोपी
अजित सागर कसबे (वय 21 वर्ष रा. सन 15 विघ्नहर्ता सोसायटी प्लॅट वी 504 आंबेगाव पठार पुणे) , तसेच सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक 423/2025 भा.न्या.सं. कलम 118(2).3 (5), म.पो.का. क 37 (1) (3) सह 135 या गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यामधील 01 वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी-
ओंकार महेश थोरात (वय 25 रा. माऊली हाईटस जांभुळवाडी आंबेगाव पठार पुणे ) हा ता. म्हसवड जि. सातारा भागात फिरत आहेत.
अशी बातमी मिळालेने युनिट 2 कडील स्टाफ यांनी ता म्हसवड जि. सातारा येथे जावून म्हसवड पोलीस स्टेशनची मदत घेवुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने, आरोपीतांना पुढील कारवाईकामी सहकारनगर पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी हे पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून त्यांचेवर सहकारनगर, भारती विद्यापीठ, पर्वती पो.स्टे. येथे यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे, तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री गौहर हसन सहा. पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहा. पो. निरी स्वप्निल लोहार मपोउपनिरी तेजश्री पवार, सपोउपनि शंकर नेवसे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, शंकर कुंभार, सर्जेराव सरगर, कुंदन शिंदे, ओमकार कुंभार, योगेश मांढरे, शिवानंद कायगुडे, विद्या शिंदे, आशिष यादव, विनायक वगारे व
म्हसवड पोलीस स्टेशनकडील सहा पो. निरी. संदिप पोमन, पोलीस अंमलदार शहाजी वाघमारे, प्रकाश इंदलकर अनिल वाघमोडे, सतिश जाधव यांनी केली आहे.
