
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
आरोपीतांची चोरटी नजर ओळखायची कला फक्त पोलीसांकडेच आहे. थोडादेखील वहीम बळावला तरी आरोपी पोलीसांच्या ताब्यात अलगद आलाच म्हणून समजा. अगदी असाच प्रकार स्वारगेट बस स्टँन्ड जवळ घडला. स्वारगेट बस स्टँन्डच्या बाजुस असलेल्या पार्कींग मध्ये दोन इसम संशायास्परित्या थांबले होते. जेंव्हा त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळ सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा 6 किलो गांजा आढळुन आला.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
स्वारगेट पोलीस स्टेशन परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या अनुषंगाने कारवाई करणे बाबत वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सुचनांनुसार दि. 28 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 02 कडील पोलीस निरीक्षक श्री. जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व स्टाफ असे अंमली पदार्थ विरोधी पेट्रोलिंग व कारवाई करण्याच्या उद्देशाने पुणे शहर हद्दीमध्ये स्वारगेट बस स्टॅण्ड, पुणे शहर येथे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी बस स्थानकाचे बाजुस असणाऱ्या पार्कीगमध्ये संशयित इसम नामे
1) आशिष रमेश शिंदे (वय 21 वर्षे रा. पी.एम.टी. कॉलणी, दत्तकृपा बिल्डींग, अप्पर, बिबवेवाडी)
2) आशितोष उर्फ स्वप्निल सोमनाथ कांबळे (वय 27 वर्षे रा. स.नं. 649, साई मंदिराजवळ, शिवतेजनगर, बिबवेवाडी, पुणे ) हे दिसुन आल्याने त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातुन एकुण 4 लाख 26 हजार 305 रुपये किंमतीचा मुद्देमाल यात तीन लाखाचा 6 किलो गांजा, 155/-रोख व 25,000 रुपये किंतीचा मोबाईल फोन असे अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता स्वतःचे कब्जात बाळगताना मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द स्वारगेट पो. ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे. श्री. गौहर हसन, सहा पोलीस आयुक्त गुन्हे 3. श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जीवन माने, सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, पोलीस अंमलदार योगेश कुंभार, संदिप देवकाते, सतीश चव्हाण, सुमित यादव, शरद धांडे, विनोद निभोरे, प्रशात कळसकर, म. पोलीस अंमलदार सुरेखा साबळे, तसेच पोलीस अंमलदार अजिक्य जोजारे, देविदास वाढरे व दिनेश बास्टेवाड अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.
