पुण्यातील गणेश उत्सवा दरम्यान भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलीसांनी केला पर्दाफाश !
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेवून, गणेश भक्तांना सर्व बाजुने घेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कटरच्या साहाय्याने कापुन, खिशातील मोबाईल, पैसे लुटण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी पोलीसात दाखल आहेत. दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी पुण्यात गणेश उत्सवा दरम्यान घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्याच्या सुचना पोलीसांना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, फरासखाना पोलीसांनी उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून 21 लाख 21 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सुमारे मंगळसुत्र चोरीचे 13 गुन्हे उघड केले आहेत. गुन्ह्याचा तपास पुण्यासह थेट परराज्यात जावून, आरोपींचा शोध घेवून, मुद्देमालासह त्यांच्या मुसक्या आवळण्यात व आरोपीतांना पकडुन थेट आणण्यात फरासखाना पोलीसांचे ...








