Saturday, October 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुण्यातील गणेश उत्सवा दरम्यान भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलीसांनी केला पर्दाफाश !

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेवून, गणेश भक्तांना सर्व बाजुने घेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कटरच्या साहाय्याने कापुन, खिशातील मोबाईल, पैसे लुटण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी पोलीसात दाखल आहेत. दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी पुण्यात गणेश उत्सवा दरम्यान घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्याच्या सुचना पोलीसांना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, फरासखाना पोलीसांनी उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून 21 लाख 21 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सुमारे मंगळसुत्र चोरीचे 13 गुन्हे उघड केले आहेत. गुन्ह्याचा तपास पुण्यासह थेट परराज्यात जावून, आरोपींचा शोध घेवून, मुद्देमालासह त्यांच्या मुसक्या आवळण्यात व आरोपीतांना पकडुन थेट आणण्यात फरासखाना पोलीसांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री पावणे अकाराच्या सुमारास, यातील फिर्यादी सागर प्रकाश कोमटी व त्यांचा मित्र विक्रांत शिंदे असे छत्रपती शिवाजी महाराज रोड, बेलबाग चौकाजवळ, बुधवार चौक पुणे येथे गर्दीमध्ये उभे राहुन गणेश विसर्जन मिरवणुक पाहत असताना, अनोळखी सहा इसमांपैकी एकाने फिर्यादी सागर कोमटी यांच्या पॅन्टचे खिशात ठेवलेला निळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व इतर पाच अनोळखी इसमांनी त्यांना पकडुन, हाताने मारहाण करुन, चाकुचा धाक दाखवुन, आरोपीतांनी त्यांच्याकडील लोखंडी कटरने, फिर्यादीच्या गळ्यातील 1 लाख 21 हजार 476 रुपये किंमतीची सोन्याची चैन व पंचवीस हजार रुपये किंमतीचा एक सॅमसग कंपनीचा मोबाईल असा एकुण 1 लाख 46 हजार 476 रुपये किंमतीचा मुद्देमाल सहा अनोळखी इसमानी जबरदस्तीने हिसकावुन चोरी करुन घेवुन गेल्याची फिर्याद दाखल होवून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस हवालदार गजानन सोनावणे व पोलीस अंमलदार चेतन होळकर हे अधिक तपास करीत असतांना, त्यांना एका गोपनिय बातमीवरुन, सदरचा गुन्हा जिल्हा शामली, राज्य उत्तर प्रदेश येथील सहा लोकांच्या टोळीने केला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार विजयपाल कवर सैन, (वय 34 वर्षे, रा. मु.पो. इस्लामपुर घसौली, जिल्हा शामली, राज्य-उत्तर प्रदेश 247775)  यास ताब्यात घेवुन वपोनि फरासखाना यांचे मार्गदर्शनाखाली अनिल सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी सखोल तपास केला.

फरासखाना पोलीसांचा तपास-
फरासखाना पोलीसांनी केलेल्या तपासात, आरोपीने त्याचे इतर आणखी 5 साथीदार असे 6 इसमांनी सदरचा गुन्हा तसेच इतर गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यानंतर अनिल सुरवसे, (सहा. पोलीस निरीक्षक) व नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल अवाड, गजानन सोनावळे, चेतन होळकर यांनी उत्तर प्रदेश येथे जावुन आरोपीचा शोध घेवुन, आरोपीकडुन चोरी केलेले 139.720 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, फिर्यादी यांचा चोरीस गेलेला मोबाईल फोन, एक धारदार चाकु व एक लोखंडी कटर असा एकुण 21 लाख 21 हजार 100 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान दाखल गुन्हयासह इतर 12 गुन्हे असे एकुण चैन चोरी व मंगळसुत्र चोरीचे 13 गुन्हे उघडकीस आणण्यात फरासखाना तपास पथकातील पोलीसांना यश आलेले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक, हे करीत आहेत.

फरासखाना पोलीसांनी तपासादरम्यान आरोपीतांची गुन्हे करण्याची पध्दत उघड केली आहे,
यात नमुद गुन्हयातील निष्पन्न आरोपी हे ग्राम इस्लामपुर घसौली, जिल्हा शामली, राज्य उत्तर प्रदेश येथील असुन, संबंधितम आरोपी हे देशातील ज्या ठिकाणी गर्दी, उत्सव, यात्रा असेल अशा ठिकाणी जावुन, गर्दीचा फायदा घेवुन, भाविकाला सर्व बाजुने घेरुन, त्यांचे गळ्यातील सोन्याचे दागिने कटरच्या सहाय्याने कट करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त) श्री. संजय दराडे, (पोलीस सह आयुक्त)  श्री. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त),  श्री. कृषिकेश रावले पोलीस (उप-आयुक्त, परि -1 पुणे) व  श्री सचिन हिरे, (सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली,  
श्री. संदिप देशमाने, (वरीष्ठ पोलीस निरीक्षक), श्री. शिवप्रकाश मुळे, (पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री राजेश महाला, (पोलीस निरीक्षक (गुन्हे), अनिल सुरवसे (सहा. पोलीस निरीक्षक), राजेंद्र पाटोळे (उप-निरीक्षक), पोलीस अंमलदार गजानन सोनावणे, नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल आवाड, नितीन जाधव, चेतन होळकर, श्रीकांत वाघवले, अजिम शेख, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश राठोड, सुमित खुट्टे, ज्ञानेश्वर पांचाळ, प्रशांत पालांडे, महेश पवार, रजत राजेशिर्के, अविनाश दरवडे यांनी केली आहे.