Friday, August 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: punemahangarpalika

PMC-PUNE- पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात एसआय (SI) व डीएसआय (DSI) हेच झाडणकामांच्या ठेकेदारांचे एजंट,

PMC-PUNE- पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात एसआय (SI) व डीएसआय (DSI) हेच झाडणकामांच्या ठेकेदारांचे एजंट,

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन बेरोजगार युवकांकडून लाखो रूपये उकळण्यात येत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असला तरी, या सर्व प्रकरणांत पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय असे धाडस कुणी करूच शकत नसल्याची बाब अनिरूद्ध चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे शहरात झाडणकामांचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला असून त्यात झाडणकामासाठी सुमारे 3/4 हजार कामगारांची भरती ठेकेदारांकडून केली जात असली तरी, 15 क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक हेच ठेकेदारांचे एजंट झाले असल्याची बाब सिंहगड रोड क्षेत्रिय कार्या...
PMC-PUNE- सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात झाडणकामांच्या 830 पदांची विक्री….. 70 हजार रुपये?

PMC-PUNE- सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात झाडणकामांच्या 830 पदांची विक्री….. 70 हजार रुपये?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील झाडणकाम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार उपआयुक्त घनकचरा, परिमंडळ उपआयुक्त, क्षेत्रिय कार्यालय व ठेकेदार यांचा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. दरम्यान या कामांसाठी सुमारे 15 क्षेत्रिय कार्यालयात 3/4 हजार कंत्राटी पद भरती प्रक्रिया सुरू केली असून, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयासाठी सुमारे 830 कंत्राटी पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. सिंहगड कार्यालय हद्दीतील झाडणकामांसाठी कायम सेवकांसह नियमित 530 कंत्राटी सेवक कार्यरत असतांना देखील आता 830 कंत्राटी पदांची भरती केली जात आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासूनच नवीन कंत्राटी भरती होणार म्हणून आधीच बेरोजगारांकडून कागदपत्रे व सुमारे 50 हजार ते 70 हजार रुपये घेण्याचे काम सुरू होते. 1 ऑगस्टपासुन प्रायोगिक प्रकल्...
पुणे महानगरपालिकेत (पांढरपेशी) गुन्हेगारी टोळ्या, महापालिकेलाही लुटायचे आणि सोसायटीवाल्यांना देखील लुटायचे…

पुणे महानगरपालिकेत (पांढरपेशी) गुन्हेगारी टोळ्या, महापालिकेलाही लुटायचे आणि सोसायटीवाल्यांना देखील लुटायचे…

सर्व साधारण
एका बाजुला बीडब्ल्युजी अनाधिकृत खाजगी संस्थाचे कामकाज बंद करा असा आदेश काढायचा, आणि दुसऱ्या बाजूला पुणे मनपाच्या वेबसाईटवरून अनाधिकृत खाजगी संस्थाची शिफारस करायची… ही पुणे महापालिका आहे की, ग्रामपंचायतीचे कार्यालय… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मुंबईतील गुन्हेगारी स्मगलिंग (तस्करी) तून उदयाला आली आणि फोफावली, पुण्यातील गुन्हेगारी जमीन (लँड माफिया) तून उदयाला आली आणि फोफावल्याचे अनेक दाखले समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. गुन्हेगार म्हणजे अशा व्यक्तीने व व्यक्तीच्या गटाने देशातील कायदयाचे उल्लंघन करून एखादा गुन्हा केला आहे त्याला गुन्हेगार असे संबोधले जाते. या गुन्ह्यात चोरी, फसवणूक, हिंसा किंवा खुन यांचा समोवश होतो. तसेच गुन्हा म्हणजे शिक्षापात्र असलेले बेकायदेशिर कृत्य असेही संबोधले जाते. गुन्हेगारी करण्याची वृत्ती आणि गुन्हेगारी कृत्य करण्याचा हेतू अशी कृत्ये कायदयाने निषिद्ध आणि शिक्षापात...
सिंहगड क्षेत्रिय कार्यालयासह पुणे शहरात दंडाच्या पावती पुस्तकात दरदिवशी लाखो रूपयांचा अपहार,लोण्याचा गोळा, बोक्यांच्या घश्यात… ?

सिंहगड क्षेत्रिय कार्यालयासह पुणे शहरात दंडाच्या पावती पुस्तकात दरदिवशी लाखो रूपयांचा अपहार,लोण्याचा गोळा, बोक्यांच्या घश्यात… ?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाहतुक पोलीसांनी कुठे चिरीमिरी घेतली किंवा पोलीसांनी एखाद्या प्रकरणांत पैशांची मागणी केली तर, त्याचा जगात डंका वाजतो. लगेच नेटकरीत पोलीसांवर तुटून पडतात. सगळ्या जगात पोलीसच कसे भ्रष्टाचारी आहेत याचे चित्र रंगविले जाते. परंतु पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात तर पोलीसांपेक्षाही सराईत दरोडेखोर आहेत, कचरा आणि दंडात्मक कारवाईच्या नावाखाली पुणेकरांकडून दरदिवशी लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेने दंडात्मक कारवाईसाठी दिलेल्या पावती पुस्तकांचा धाक व्यापारी, दुकानदार, पथारी व्यावसायिकांना दाखवुन लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात देखील दंडात्मक पावती पुस्तकांसह त्यातील रकमांचा अपहार झाल्याची तक्रार दीड वर्षापूर्वी दिलेली असतांना देखील पुणे महापालिकेचे आयुक्त, घनकचरा विभागाचे ...
PMC-PUNE पुणे महापालिकेतील क्रिमी पोस्टवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी, स्वतःच्या बदल्या कशा रद्द करून घ्यायच्या… लेसन नंबर वन

PMC-PUNE पुणे महापालिकेतील क्रिमी पोस्टवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी, स्वतःच्या बदल्या कशा रद्द करून घ्यायच्या… लेसन नंबर वन

सर्व साधारण
पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर दोन किंवा तीन वर्षांनी बदली होते, त्यात बांधकाम आणि टॅक्स विभाग म्हणजे मलईदार खाते. पथ, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा ही दुसऱ्या क्रमांकाची खाती, जिथं हात घालू तिथे पैसाच पैसा आहे. परंतु दोन 3 वर्षांनी बदलीची कट कट मागे लागलेली असते. त्यात आयुक्त,अति. आयुक्त आणि उपआयुक्त घेण्या-देण्यातील असतील तर काही चिंता नसते. त्यातल्या त्यात खातेप्रमुख आणि विभागप्रमुख मुठीतील असतील तर सोने पे सुहागा… परंतु जर बदल्या झाल्याच तर पुढे काय करावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. बदली कशी रद्द करावी व पुनः मूळ खात्यात कसे रिव्हर्ट व्हावे यांच्यासाठी ही खास बातमी. उदाहरण दुसऱ्याचे आहे, परंतु अभ्यास करण्यासारखे आहे. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील झाडण कामांची कंत्राटी बंद घरे, नवीन कंत्राटी नोकर भरती, कायम सेवकांची बंद घरे, बल्क वेस्ट...
PMC-PUNE- झाडणकामांच्या कंत्राटी कामगार भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, रूपाली चाकणकरांच्या तक्रार अर्जावर तीनही उपआयुक्तांनी सुपणारला कशी दिली क्लिनचिट….

PMC-PUNE- झाडणकामांच्या कंत्राटी कामगार भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, रूपाली चाकणकरांच्या तक्रार अर्जावर तीनही उपआयुक्तांनी सुपणारला कशी दिली क्लिनचिट….

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदलीचा अधिनियम लागु आहे. एका पदावर 3 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची समुपदेशनाने बदली केली जाते. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील आशिष सुपणार हे नियुक्तीपासून म्हणजे मागील 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. बदली नंतर तिथेही काम करायचे आणि बदलीच्या ठिकाणीही कामच करायचे असते. बदली झाल्यानंतर तिथेही नियमानुसार पगार मिळणारच आहे. काम तर प्रत्येक ठिकाणी करायचे आहे, परंतु आशिष सुपणार हे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय सोडून बाहेर जाण्यास तयार नाहीत. किंबहुना पुणे महापालिकेतील उपआयुक्त घनकचरा विभाग, उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 हे सुपणार यांची बदली करीत नाहीत. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी आशिष सुपणार याच...
येरवड्यातील जुन्या इमारतीवरील हॉर्डींगच्या सांगड्यामुळे नागरीकांच्या जिविताला धोका, आकाशचिन्ह विभागातील निरीक्षकांच्या बेफिकीरीचा नमूना

येरवड्यातील जुन्या इमारतीवरील हॉर्डींगच्या सांगड्यामुळे नागरीकांच्या जिविताला धोका, आकाशचिन्ह विभागातील निरीक्षकांच्या बेफिकीरीचा नमूना

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा येथील स.नं. 24 प्रफुल्ल निवास या अतिशय जिर्ण व जुन्या इमारतीवर टार्गेट ॲडव्हरटायझिंग यांचे होर्डींग असून मागील दोन वर्षांपासून त्याचे नुतनीकरण करण्यात आले नाही. जुन्या इमारतींमुळे त्याला परवानगी नाकारण्यात आली असली तरी त्यावरील कपड्याचे बॅनर काढण्यात आले असले तरी हजारो किलोचा लोखंडाचा सांगाडा जागेवरच ठेवण्यात आलेला आहे. यामुळे स्थानिक नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला असतांना देखील पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या निरीक्षकांनी कारवाईकडे साफ दुर्लक्ष केले असून त्यांच्या बेफिकीरीचा नमूना समोर आलेला आहे. येरवडा गावठातील प्रफुल्ल निवास या जुन्या इमारतीवरील होर्डींगला परवानगी नाकारल्यामुळे त्यावरील निव्वळ कापड काढण्यात आले असले तरी लोखंडी सांगाडा आहे तसाच ठेवण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते रामभाऊ फुगे यांनी 13 नोव्हेंबर 2023 र...
पुणे महापालिका बांधकाम विभागाच्या धानोरीतील अभियंत्यांचे अनाधिकृत बांधकामाकडे साफ दुर्लक्ष !

पुणे महापालिका बांधकाम विभागाच्या धानोरीतील अभियंत्यांचे अनाधिकृत बांधकामाकडे साफ दुर्लक्ष !

शासन यंत्रणा
आधी बांधकाम पूर्ण होऊ दयायचे, मागाहून नोटीसा देऊन सेटलमेंट करण्याच्या धोरणामुळे पुणे शहरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील उपनगरांमध्ये अनाधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. जुनी बांधकामे पाडून त्यावर तीन/चार मजल्यांची बांधकामे सर्रास होत आहेत. तरी देखील बांधकाम विभागाचे अभियंता अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करीत नाहीत. थोडक्यात आधी अनाधिकृत बांधकाम पूर्ण होऊ दयायचे आणि मागाहून नोटीसा देवून सेटलमेंट करण्याच्या वृत्तीमुळे पुणे शहरात अनाधिकृत बांधकाम करणारांनी उच्छाद मांडला आहे. धानोरी अभियंत्याच्या कार्यक्षेत्रातील टिंगरे नगरमध्ये देखील अनेक अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत. काही व्यक्ती व संस्थांनी तक्रार अर्ज देवून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे, तरी देखील नोटीसा किंवा कारवाई केली जात नसल्याचे आजचे चित्र आहे. एअरपोर्ट रोडवरील टिंग...
मिळकत करात 5 टक्के सवलत फुकटात पदारात पाडून घेण्यासाठी, बोगस खाजगी संस्थांच्या बनावट पत्रांमुळे पुणे महापालिकेचे बुडाले कोट्यवधी रुपये

मिळकत करात 5 टक्के सवलत फुकटात पदारात पाडून घेण्यासाठी, बोगस खाजगी संस्थांच्या बनावट पत्रांमुळे पुणे महापालिकेचे बुडाले कोट्यवधी रुपये

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत घरे, बंगले, सोसायट्यांनी त्यांच्याच आवारात सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग व व्हर्मीकल्चर कंपोस्टींग प्रकल्प करणाऱ्यांना मिळकत करात सुट देण्यात येते. तीन पैकी दोन प्रकल्प राबविल्यास 10 टक्के व तीन पैकी एक प्रकल्प राबविल्यास सुमारे 5 टक्के सुट मिळकत करामध्ये दरवर्षी देण्यात येते. दरम्यान पुणे महापालिका हद्दीत काही बोगस खाजगी संस्था कम्युनिटी कंपोस्टींग करण्याच्या नावाखाली सोसायट्यांचा ओला कचरा गेट कलेक्शन करतात, तथापी पुढे हाच कचरा पुणे महापालिका यंत्रणेला देवून, पुणे महापालिकेची फसवणूक केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पुणे महापालिका हद्दीतील कचरा संकलन करणाऱ्या ज्या संस्था पॅनेलवर नाहीत व ज्या संस्थांकडून कम्युनिटी कंपोस्टींग करण्याच्या नावाखाली कचरा संकलन केले जाऊन, पुढे हाच कचरा पुणे महापालिका यंत्रणांना देऊन पुणे...
पुणे महापालिका शहर अभियंत्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी प्रत्येकी एक लाख रूपयांचे नियोजन, पण… दुर्देव… शासकीय दुखवटा असल्याने सेवानिवृत्ती कार्यक्रम बारगळा !

पुणे महापालिका शहर अभियंत्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी प्रत्येकी एक लाख रूपयांचे नियोजन, पण… दुर्देव… शासकीय दुखवटा असल्याने सेवानिवृत्ती कार्यक्रम बारगळा !

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे येत्या शनिवारी म्हणजे 31 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी, पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील काही अतिउत्साही अभियंत्यांनी, प्रत्येकी एक लाख रुपये वर्गणी काढावी असा सुर आळविण्याचे काम मागील काही दिवसात सुरू होते. दरम्यान हॉल व लॉन बुक झाले, जेवणावळीचा मेनूही ठरला होता. दरम्यान प्रत्येकी एक लाखाचे टारर्गेट काही पूर्ण झाले नव्हते. काहींनी बळजबरीने एक/एक लाख रुपये दिलेही होते. दरम्यान गुरूवार दि. 28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मित निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करून, कोणतेही शासकीय कार्यक्रम करण्यास बंदी आदेश जारी झाला. त्यामुळे पुणे महापालिकेतील कित्येक अभियंत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असल्याचे वृत्त आहे. क...