
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ANIRUDDHA SHALAN CHAVAN-
पुणे शहर पोलीस दलातील क्राईम ब्रॅंच ॲक्शन मोडवर आली असल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून आले आहे. युनिट एक, युनिट दोन व युनिट 4 ने फरार व पाहिजे आरोपीस जेरबंद केले आहे. दरम्यान पुणे शहरात कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांतील पाहिजे व फरार आरोपींचा रोजच्या रोज शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच टोळीतील सक्रिय व असक्रिय सदस्य आणखी गंभीर गुन्हे करण्याची दाट शक्यता असून पाहिजे व फरार आरोपी मिळून आल्यास त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच त्यांचेवर कडी निगराणी ठेवावी. त्यांचेकडुन कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे गुन्हे शाखेला आदेश दिल्याची माहिती क्राईम ब्रॅंच युनिट एकने प्रसिद्धीला दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे. दरम्यान युनिट एक ने आंदेकर टोळीतील व 8 महिन्यांपासून फरार आरोपीस अटक केली आहे, तर सहकारनगर व आंबेगाव पोलीस स्टेशन कडील एक वर्षांपासून फरार आरोपीस युनिट दोनने जेरबंद केले आहे व युनिट चारने एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्यातील आरोपीस जेरबंद केले आहे.

आंदेकर टोळीतील रेकॉर्डवरील आरोपीला लोखंडी कोयत्यासह युनिट 1 ने केले जेरबंद, 8 महिन्यांपासून होता फरार
बंडु आंदेकर टोळीतील रेकॉर्डवरील सक्रिय आरोपी ओम गणेश नगरकर, (वय 24 वर्ष, रा. 32 म.न.पा.शाळेजवळ, यश रेसिडन्सीचे टेरेसवर, हडपसर गांव, पुणे. पुर्वी रा.401 प्रतिभा कॉम्प्लेक्स, पॉवर हाऊस चौक, पुणे ) पुणे याला एका लोखंडी कोयत्यासह सोलापूर बाजारात अटक करण्यात आली आहे.
गुन्हे युनिट 01 कडील पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव, पो.उप-नि. राहुल मखरे व पोलीस अंमलदार असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व हेमंत पेरणे यांना त्यांचे बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, ओम नगरकर हा सोलापुर बाजार पीएमपीएमएल बस स्टॉप समोरील कॅनॉल लगत असलेल्या परिसरात आला असुन तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करणेची दाट शक्यता असुन त्याचेकडे घातक शस्त्रे आहे, अशी खात्रिशीर बातमी मिळाल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन ओम गणेश नगरकर यास ताब्यात घेतले.
दरम्यान त्याच्या ताब्यातील एक 500/-रुपये किंमतीचा लोखंडी कोयता व एक पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदरचा आरोपी हा समर्थ पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हयामध्ये 08 महिन्यापासुन पाहिजे आरोपी असल्याचे माहिती मिळाली आहे. पुढील आधिक तपास लष्कर पोलीस स्टेशन हे करीत आहेत
सदरची कामगिरी ही युनिट 01 कडील श्री अजित जाधव, पोलीस निरीक्षक यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक, श्री. राहुल गखरे पोलीस अंमलदार विनोद शिंदे, निलेश साबळे, हेमंत पेरणे, सिध्देश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, संदेश काकडे, अमित जमदाडे, मयुर भोसले, अविनाश दळवी, यांनी केली.

एक वर्षापासुन पाहिजे असलेल्या रेकार्डवरील सराईत आरोपीस युनिट 2 ने केले जेरंबद
सहकारनगर व आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पाहिजे आरोपी शुभम भास्कर लोखंडे (वय 23 रा. तळजाई पठार स नं 3 मल्हार जिम शेजारी धनकवडी) याला क्राईम ब्रॅंच दोन ने जेरबंद केले आहे.
गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे परिमंडळ 02 हद्दीत गुन्हे प्रतिबंध गस्त व रेकार्डवरील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शंकर कुंभार व सर्जेराव सरगर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की, सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पाहिजे आरोपी शुभम भास्कर लोखंडे हा तळजाई वसाहत पुणे या भागात फिरत आहे.
सदरची बातमी युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. युनिट 2 पथकाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने तळजाई वसाहत सहकानगर पुणे येथे जावुन पाहिजे आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम भारकर लोखंडे (वय 23 रा. तळजाई पठार स नं 3 मल्हार जिम शेजारी धनकवडी पुणे) असे सांगीतले. सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तो आंबेगाव पोलीस स्टेशन कडील आर्म ॲक्ट व महाराष्ट्र पोलीस अधिनियम मध्ये पाहिजे आरोपी असलेबाबत निष्पन्न झाले. सदर आरोपीस आंबेगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी हा अभिलेखावरील रेकार्डवरील गुन्हेगार आहे.
पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरी. ज्ञानेश्वर दवळी, पोलीस अंमलदार शंकर कुंभार, सर्जेराव सरगर, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय टकले, योगेश गांढरे, नागनाथ राख, विजयकुमार पवार, शिवानंद कायगुडे, सद्दाम तांबोळी, अजीम शेख, साधना ताम्हाणे, विदया शिंदे, योगेश गांढरे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, विशाल दळवी, संदिप शिर्के, ओमकार कुंभार, रुषिकेश व्यवहारे व विनायक पगारे यांनी केली आहे.

एक वर्षापासुन फरार असलेला मोक्यातील आरोपीस युनिट 4 ने केले जेरबंद
येरवडा पोलीस स्टेशन कडील फरार आरोपींचा समांतर तपास केला जात असतांनाच, गुन्हे शाखा युनिट चार ने कुणाल उर्फ सोन्या संजय चांदणे (वय 23 वर्षे, रा. भिमज्योत मित्र मंडळाजवळ येरवडा पुणे सध्या रा.ग्रीन ॲव्हेन्यु गोंधळेनगर हडपसर पुणे ) याला जेरबंद केले आहे.
युनिट-4. गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.436/2026 भा.न्या.सं.क.118 (2),181 (3),181 (4),199(3), 190 आर्म ॲक्ट क.4 (25) मोक्का 3(1) (2).3 (2).3(4) या गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने युनिट 4 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अमजद खान व तुषार खराडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराव्दारे माहिती मिळाली की, मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपी कुणाल चांदणे हा गोंधळेनगर, कॅनॉलजवळ हडपसर पुणे येथे नवीन पत्त्यावर राहत आहे.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांना कळवली असता त्यांनी नमुद ठिकाणी जावुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले. या अनुषंगाने गोंधळेनगर, कॅनॉलजवळ हडपसर पुणे येथे जावुन चौकशी केली असता, गोंधळेनगर कॅनॉलजवळ ग्रीन ॲव्हेन्यु फ्लॅट नं 106 येथे सदर आरोपीचे घर मिळुन आले. त्याचे घरामध्ये पाहणी केली असता कुणाल चांदणे घरामध्ये मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव कुणाल उर्फ सोन्या संजय चांदणे वय 23 वर्षे रा. भिमज्योत मित्र मंडळाजवळ येरवडा पुणे सध्या रा.ग्रीन ॲव्हेन्यु गोंधळेनगर हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता त्याचा सदर गुन्हयामध्ये सहभाग असल्याबाबत त्याने कबुल केले. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी युनिट 4 पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरी. वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरीष गोरे, एकनाथ जोशी, अमदखान शेख, तुषार खराडे, सुभाष आव्हाड, किशोर दुशिंग, नितीन साबळे, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, अजय गायकवाड, वैभव रणपिसे, विशाल इथापे, शरद झांजरे, रोहिणी पांढरकर व मयुरी नलावडे यांनी केली आहे.
