Thursday, July 9 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: pmcसॅनिटरी इन्सपेक्टर

PMC- PUNE- झाडणकामांच्या कंत्राटी कामगार भरतीमध्ये सुपणारकडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांच्या तक्रार अर्जावर तीनही उपआयुक्तांनी सुपणारला कशी दिली क्लिनचिट….?

PMC- PUNE- झाडणकामांच्या कंत्राटी कामगार भरतीमध्ये सुपणारकडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांच्या तक्रार अर्जावर तीनही उपआयुक्तांनी सुपणारला कशी दिली क्लिनचिट….?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मागील 15 दिवसात, पुणे महापालिकेची मुख्य इमारत आणि पुणे शहरातून प्रसारित होणाऱ्या सर्व मोठ्या वृत्तपत्रात एकच बातमी सतत फिरत आहे, आणि ती म्हणजे उरूळी देवाची येथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या 500 मेट्रीक टनाच्या प्रकल्पात 300 मे.टन ओला आणि 200 मे. टन सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्याची बातमी सतत फिरत आहे. तसेच पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाने देखील एकाच निविदेला आक्षेप घेतल्यानंतरही प्रशासनाकडून केवळ एकाच ठेकेदाराला डोळयासमोर ठेवून ही निविदा काढली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे, याशिवाय विविध पर्यावरणवादी संघटनांनी देखील एकाच निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तरी देखील एकाच ठेकेदारासाठी पुणे महापालिकेची यंत्रणा राबत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यातून झळकत आहे. सर्वसामान्य नागरीक घरातील,दुकानातील, इंडस्ट्रीमधील कचरा...
पुणे महापालिकेत बदलीचा अधिनियम केवळ काही कर्मचाऱ्यांना लागु होत नाही…आशिष सुपणार 15 वर्षात एकदाही बदली नाही…. डीएसआय माने व नाईक यांची 2 वर्षात 3 वेळा बदली

पुणे महापालिकेत बदलीचा अधिनियम केवळ काही कर्मचाऱ्यांना लागु होत नाही…आशिष सुपणार 15 वर्षात एकदाही बदली नाही…. डीएसआय माने व नाईक यांची 2 वर्षात 3 वेळा बदली

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात मागील 12 ते 15 वर्षात 20 हजार कोटींचा गार्बेज स्कॅम घडला व आजही घडत आहे. कचरा म्हंटल की, सगळेच नाक मुरडतात त्यामुळे कचराच असल्यामुळे सहज कुणाचेही लक्ष जात नाही. त्याच कचऱ्याने आता पेट घेतला असून, हा वणवा 20 हजार कोटीपर्यंत गेला आहे. तेलगी स्कॅम हा 30 हजार कोटींचा, तो देखील पुण्यात उघडकीस आला, तसाच पुण्यातही गार्बेज स्कॅम घडला आहे. बारामतीतील नेतृत्वाच्या छत्रछायेखाली असलेल्या नेत्यांनी कचऱ्याचे महत्व ओळखले आणि पटापट सगळे प्रकल्प गिळंकृत केले. (ज्यांनी धरणातील आणि कॅनॉलमधील गाळही सोडला नाही, ते कचरा तरी कसे सोडतील..) कचरा वाहतुकीत पुणे मनपाची वाहने कमी परंतु खाजगी कंत्राटदारांचीच जास्त वाहने अभिलेखावर आढळुन येतील. त्यांच्या कचऱ्याच्या फेऱ्याही पुणे मनपापेक्षा तीनपट अधिक असल्याचे अभिलेख्यावरून दिसून येते. गार्डन कटींग मध्ये त...
सिंहगड रोड वॉर्ड ऑफिसः बीडब्ल्युजी प्रकल्पांतील ओला कचरा उलण्यास मनाई केल्यामुळेच डीएसआय माने यांच्याकडील पदभार काढून घेतला

सिंहगड रोड वॉर्ड ऑफिसः बीडब्ल्युजी प्रकल्पांतील ओला कचरा उलण्यास मनाई केल्यामुळेच डीएसआय माने यांच्याकडील पदभार काढून घेतला

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीत ज्या सोसायट्यांमध्ये बीडब्ल्युजी प्रकल्प सुरू आहेत, तसेच ज्या सोसायट्यांनी कंपोस्ट खत व ओला कचरा जिरवित असल्याबाबत, शिफासर घेवून, पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून, त्यांच्या मिळकत करामध्ये 5 टक्के सवलत मिळविली आहे, त्यांचा ओला कचरा मोकादम व आरोग्य निरीक्षक यांना उचलण्यास प्रतिबंध केल्यामुळे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोतदार यांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (सिनिअर सॅनिटरी इन्सपेक्टर) श्री. मंगलदास माने यांच्याकडून कचरा वाहतुक व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा पदभार काढून घेण्यात आल्याचे कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. या आदेशात नमूद केले आहे की, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन कामकाजाशी संबंधित सर्व कचरा व...
पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या का…? आयुक्त व अति. आयुक्तांच्या बदली आदेशाला, आरोग्य निरीक्षकांसह क्षेत्रिय अधिकारी व उपआयुक्तांनी दाखविला कचऱ्याचा डंपर

पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या का…? आयुक्त व अति. आयुक्तांच्या बदली आदेशाला, आरोग्य निरीक्षकांसह क्षेत्रिय अधिकारी व उपआयुक्तांनी दाखविला कचऱ्याचा डंपर

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत मागील 10 ते 12 वर्षांपासून आरोग्य निरीक्षकांच्या बहुचर्चित बदल्यांचे आदेश 14 ऑगस्ट रोजी अति. आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी जारी केले. 15 ऑगस्ट व पुढे गणेशोत्सव असल्यामुळे, गणेश विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करून दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष बदली विभागात रूजु होण्याचे आदेश देवून, यासाठी स्वतंत्र कार्यमुक्ती आदेशाची (रिलिव्ह मेमो) ची आवश्यता नाही असेही आदेशात नमूद केले होते. तथापी कार्यमुक्त करण्यात येवून आज 10 दिवस झाले तरी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक बदलीच्या ठिकाणी रूजु झाले नाहीत. तसेच काही रुजु झाले तरी त्यांना आरोग्य कोठ्या देण्यात आलेल्या नाहीत. सर्व आरोग्य निरीक्षक यांना सांगण्यात येत आहे की, दोन दिवस थां...