Sunday, November 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात आरोपी, फिर्यादींसह नातेवाईकांचा राडा, पोलीसांना धक्काबुक्की,

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 येथे समर्थ पोलीस ठाण्याकडील आरसीसी प्रकरण बोर्डावर असतांना, न्यायालयाकडून आदेश पारित करतांना, फिर्यादी व आरोपींमध्ये वाद होवून एकमेकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. मध्यस्थी करणाऱ्या पोलसांना शिवीगाळ करून पोलीस व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना एक हजार रूपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 येथे शुक्रवार दि. 30 ऑक्टोंबर रोजी समर्थ पोलीस ठाण्याकडील ( महाराष्ट्र शासन विरूद्ध प्रशांत नामदेव पवार व इतर ) आरसीसी प्रकरण बोर्डावर होते. न्यायालयाचे कामकाज साधारण 11.50 वाजण्याच्या सुमारास सुरू असतांना (म्हणजे पी.डब्ल्यु.डी. व्हि. 127/2023 ) ह्या खटल्याचा न्यायालय आदेश पारित करीत असतांना, आरोपी -फिर्यादी व त्यांचे नातेवाईक न्यायालयात आले होते. त्यातील

फिर्यादी, आरोपी व त्यांचे नातेवाई नामे
1) नामदेव उमाजी पवार वय-59 वर्ष
2) प्रशांत नामदेव पवार वय 32 वर्ष
3) शांता नामदेव पवार वय-52 वर्ष
4) सोपान विठ्ठल चव्हाण वय 33 वर्षे सर्व राहणार 197 सर्वे नंबर 14/120, मोरे वस्ती चिखली पुणे
5) अमित विलास पवार वय 32 वर्षे
6) आशा गोरखनाथ चव्हाण वय 21 वर्ष रा. महात्मा फुले नगर, माळी मळा, लोणीकाळभेर व
7) सविता लहु चव्हाण यय-38 वर्षे धंदा-शेत मजूरी
8) लहू नारायण चव्हाण वय 44 वर्षे धंदा शेती
9) प्रांजल लहू चव्हाण वय 23 वर्षे
सर्व राहणार रामनगर तांडा ता. माजलगाव जि. बीड. यांनी एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ करुन पोलीसांना व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.

न्यायालयात झाल्या प्रकाराबाबत न्यायालयाने आरोपीतांना दोषी धरून 1000/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधा कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच नमुद सर्व इसमा विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 132, 267, 189(2), 190, 191(1) (2), 194 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.