Thursday, September 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम, चलो मुंबईचा दिला नारा

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
गेले काही महिन्यापासून मनोज रंगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान मनोज रंगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी अन्न, पाणी त्याग करत उपोषणासाठी बसले होते. दरम्यान त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठी चार्ज ही करण्यात आला होता. यांनतर सरकारकडून आरक्षण देण्यासाठी वेळ मागीतला होता परंतू अध्याप आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलं आहे.

राज्यातील मराठा समाजांनी एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही मागणी लावून धरली यावेळी राज्यात अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर सभा घेण्यात आल्या, या सभेला लाखोंचा जनसमुदाय होता. आज बीड येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय जमला होता. मात्र, “सरकार अनेक वेळा तारीख पे तारीख देत आहे. वेळ काढून पणा करत आहे यामुळे आता आम्ही थेट मुंबईला जाणार आणि मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार त्या ठिकाणी मी कसलाही अन्न, पाणी घेणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच असणार आहे. 

येत्या 20 जानेवारीला आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार“ असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडच्या सभेमध्ये घोषणा केली आहे, त्यामुळे सरकार मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा कशा पद्धतीने मार्गी लावणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलं आहे.