Saturday, September 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अमरावतीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने बळबळ उभा केलेला बळवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडाऱ्याच्या निवडणूकीत पाडणाऱ्या काँग्रेसचा बदला घेण्याची अमरावतीकरांना सुवर्ण संधी…

NATIONAL FORUM/ PUNE/ काँग्रेसने 25 वर्षात अमरावती लोकसभेची निवडणूक लढविली नाही. रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर अमरावतीमध्ये राखीवज जागेवर उमेदवार असल्याने काँग्रेस-भाजपाने ठरवुन काँग्रेसी आमदार बळवंत वानखेडे यांना उभे केले आहे. अमरावतीतत सर्वांना ठाऊक आहे की, बळवंत वानखेडे हे मंत्री यशोमती ठाकुर यांच्या चपला उचलतात, एवढच नाही तर यशोमती ठाकुर यांना विचारल्याशिवाय तोंडही उघडत नाहीत. त्यामुळेच अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडली तरी वानखेडे तिकडे फिरकले देखील नाहीत. त्यामुळे काँग्रेस-भाजपा यांनी गुप्त समझोता केला असून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना लोकसभा निवडणूकीत पाडण्यासाठीच 48 पैकी 1 जागेवर बौद्ध उमेदवार उभा केला आहे. काँग्रेस आघाडीने 48 पैकी एकही जागेवर मुस्लिम उमेदवार दिला नाही. एकही बौद्ध उमेदवार दिला नाही. केवळ आनंदराज आंबेडकर अमरावतीत निवडणूक लढवित असल्यानेच त्यांच्या विरूद्ध ऐनवेळी बौद्ध उमेदवार उभा केला आहे. केवळ आंबेडकरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने विखारी प्रचार सुरू आहे.

आंबेडकरांच्या विरुद्ध आंबेडकरी समाजातील उमेदवार उभा करून आंबेडकरांना निवडणुकीतून पाडण्याचा काँग्रेसचा 75 वर्षाचा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1952 च्या पोटनिवडणुकीमध्ये तसेच पुढे देखील दोन वेळा काँग्रेसने मोठी ताकद लावून भंडारा लोकसभा मतदारसंघातून पाडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसवाल्यांनी भाजपबरोबर हात मिळवणी करून सुमारे सहा वेळा निवडणुकीतून पाडले आहे. आता देखील आंबेडकरांविरुद्ध तसेच आंबेडकरांच्या सोशल इंजीनियरिंग अर्थात लोकशाहीच्या सामाजिकरणाविरूद्ध काँग्रेसने मागील 75 वर्षांमध्ये केलेला भ्रष्टाचार, गैरव्यवहारांच्या गुप्त फाईल्स भाजपने तयार करून काँग्रेसलाच स्वतःची टीम म्हणून काम करण्यास भाग पाडले आहे. इन्कमटॅक्स, सीबीआय व ईडीच्या भीतीने काँग्रेसने देखील भाजपबरोबर अनेक मतदारसंघांमध्ये हात मिळवणी केली असल्याचे अनेक ठिकाणावरून दिसून येत आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात देखील ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरूद्ध आरएसएस विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आता अमरावती लोकसभा मतदारसंघात देखील आनंदराज आंबेडकर यांच्या विरुद्ध काँग्रेसने बौद्ध समाजातीलच उमेदवार बळबळ उभा केला आहे. काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 48 जागांवर केवळ प्रस्थापितांना उमेदवारी दिली आहे. सहकारी साखर कारखानदार, सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दूध डेअरी, सहकारी खरेदी विक्री संघ यांच्यासह ज्याच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत आणि ज्यांनी वर्षानुवर्ष या सहकारी उद्योगांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हक्क हिरावून घेतले, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित समाजाचा न्यायिक हक्क हिरावून घेतला आहे अशा गब्बर प्रस्थापित घराण्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 48 पैकी एकाही जागेवर काँग्रेसने मुस्लिम समाजाला निवडणूकीत उमेदवारी दिली नाही, 48 पैकी केवळ एका जागेवर ते देखील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या तसेच केवळ आंबेडकर घराण्यातील उमेदवार उभा असल्याने त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना बळबळ उभे केले आहे. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांनी स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या व लहान मोठ्या आंबेडकरी चळवळील संघटनांवर दबाव आणला गेला आहे.

अमरावतीत तर वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी अचानकपणे वानखडे यांना समर्थन देण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु सत्ताधारी भाजपाने पोलीस व शासकीय यंत्रणेला हाताशी धरून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व कार्यर्त्यांच्या घरी पोलीस पाठवुन दबाव आणला जात आहे. जे मोठे भांडवलदार आहेत, जे प्रायव्हेट कंपनी चालवणारे आहेत, उद्योगपती आहेत, त्यांची शासकीय कागदपत्रांमधुन आर्थिक नाकाबंदी करता येणे शक्य आहे. परंतु आंबेडकरी चळवळीतील संघटनांवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या घरातील सदस्यांना काही प्रसंगी जीवे मारण्याचे धमकी देण्यात येत आहे. त्यांच्याविरुद्ध नाहकपणे पोलीसांमध्ये गुन्हे दाखल करण्याची व कोर्टात खटले दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. आंबेडकरी चळवळीत पूर्वी झालेली आंदोलने, मोर्च यामध्ये पोलीसांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांविरूद्ध नाहक गुन्हे दाखल केले आहेत, त्याच्याही जुन्या फाईल्स व कोर्ट फोईल्स काढल्या जात आहेत. पोलिसांकडून आंबेडकरी जनता व कार्यकत्यांवर प्रचंड दबाव वाढत आहे.

आंबेडकरी चळवळीतील एकन्‌‍ एक कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर पोलिसांचा प्रचंड दबाव आहे. सत्ताधारी भाजप त्यांच्याकडील असलेल्या ताकदीचा वापर करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे दमन करीत आहे. हे सर्वच्या सर्व काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन यांना केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना निवडणुकीतून पाडायचे असल्याकारणामुळे काँग्रेस आणि भाजप अमरावतीमध्ये एक झाली आहे. अकोल्यामध्ये देखील ह्याच स्वरूपाची परिस्थिती आहे.


महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचे सामाजीकरण होऊ द्यायचं नाही, इथल्या बहुजन समाजाला, इथल्या मुस्लिम समाजाला, सत्तेमध्ये… संसदेमध्ये… विधानमंडळामध्ये पोहोचू द्यायचं नाही. तसेच वंचित बहुजन समाजातील, रिपब्लिकन चळवळीतील समाज व कार्यकर्ते संसदेत व विधिमंडळात गेले तर या प्रस्थापित घराण्यांनी सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दूध डेअरी, सहकारी बँकांमध्ये केलेले करोडो रुपयांचे भ्रष्टाचार…. गैरव्यवहार… तसेच सहकारी खरेदी विक्री संघामधील करोडो रुपयांचे भ्रष्टाचार हीच आंबेडकरी जनता बाहेर काढेल, आनंदराज आंबेडकर संसदेमध्ये गेले तर या सर्वच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी ते करतील या भीतीपायी काँग्रेस आणि भाजप आंबेडकरी जनतेविरुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाविरुद्ध हातात हात घालून त्यांना निवडणुकीतून पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.

बौद्ध समाजामध्ये, आंबेडकरी जनतेमध्ये गैरसमज, संभ्रम पसरवण्याचा मागील पंधरा-वीस दिवसांपासून अथक प्रयत्न सुरू आहेत. शासनाची संपूर्ण शासकीय यंत्रणा पोलीस त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीमधील काँग्रेस धार्जिणे दलाल, एजंटाला हाताशी धरून केवळ आंबेडकरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. याच बरोबरीने भांडवलदारी वृत्तपत्रे, खाजगी टीव्ही चॅनल, काही तथाकथित यु टूब चॅनलच्या माध्यमातून केवळ अन्‌‍ केवळ आनंदराज आंबेडकर यांची नाहक बदनामी केली जात आहे. काही तथाकथित मंडळी…. काही काँग्रेस धार्जिणे आणि काही सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाखाली असलेले दलाल भडवे, काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जाणीवपूर्वक आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. आनंदराज आंबेडकर हे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असले तरी ते उच्चविद्याविभुषित आहेत. इंजिनिअर आहेत. त्यांनी मनांत आणले तर ते मुंबईत एैषोआरामाची जीवन जगु शकतात. परंतु ेकेवळ आंबेडकरी जनतेसाठी विदर्भाच्या रणरणत्या उन्हात काँग्रेस-भाजपाविरूद्ध उभे ठाकले आहेत.

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 1952 सालच्या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीतून पाडण्याचं कटकारस्थान त्या काळात काँग्रेस आणि नेहरूने केले आहे. आता देखील स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर केवळ आंबेडकरांना विरोध म्हणून काँग्रेस सुडाने पेटलेली आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेने सावध होण्याची गरज आहे. आपल्यामध्ये घुसून, आपल्या विरुद्ध कोण आपला प्रचार करतोय, आपल्यामध्ये कोण संभ्रम निर्माण करतोय, त्याला झोडपून काढण्याची ही योग्य वेळ आहे आणि ज्या काँग्रेसने आंबेडकरांच्या विरुद्ध बळबळ उभा केलेल्या काँग्रेसी बदमाश्याला खडे चारण्याची वेळ व संधी आज आलेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस आणि नेहरूने निवडणुकीतून पाडलं. त्यावेळचे लाखो रूपये खर्च केले, आंबेडकरी समाजात त्या काळी देखील बदनामी केली, त्या काळात देखील आंबेडकरी समाजातील उमेदवार उभा करण्याचे पाप काँग्रेसने केले होते. आज त्याचा बदला घेण्याची संधी अमरावतीमधील आंबेडकरी जनतेला मिळालेली आहे. त्यामुळे कुठल्याही वृत्तपत्रातून…. प्रसार माध्यमातून किंवा दलाल भडव्या कार्यकर्त्यांकडून…. कुठलाही अपप्रचार… संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास, तो आंबेडकरी जनतेने हाणून पडावा. काँग्रेसचा बदला घेण्याची हीच खरी वेळ अमरावतीकरांना मिळाली आहे. आंबेडकरी जनतेला मिळाली आहे. भाजपाला धडा शिकविण्याची वेळ आली आहे.