Friday, May 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीच्या विकसकावर ॲट्रॉसिटी कायदयाखाली गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीच्या विकसकावर ॲट्रॉसिटी कायदयाखाली गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

शासन यंत्रणा
पुण्यातील आंबिल ओढा national forum पुणे/दि/ प्रतिनिधी/भारतातील अनुसूचिज जाती आणि अनुसूचित जमाती ह्या मूळनिवासी जमाती म्हणून ओळखल्या जातात. परंतु वर्षानुवर्षे त्यांचे नैसर्गिक व न्यायिक हक्क हिरावून घेवून इथली भांडवलदारी यंत्रणा त्यांना जीवन जगु देत नाहीत. राज्यातील ग्रामीण भागात होणारा जातीय अत्याचार आणि शहरासारख्या ठिकाणी देखील पोहोचला आहे. त्यामुळे न्यायिक हक्कासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांविरूद्ध खोट्या केसेस करणे, त्यांना कायदयाव्दारे अटकाव करून त्यांच्या कर्तव्यापासून त्यांना परावृत्त करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. तथापी न्यायालयाने अनु. जाती व जमाती यांची न्यायिक बाजू लक्षात घेवून, पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीचे विकसक, केदार असोसिएटचे साथीदार दिलीप देशमुख व बांधकाम व्यावसायिक श्री. सूर्यकांत निकम व प्रताप निकम यांवर अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे पुणे न्यायालयाने ...
चतुःश्रृंगीतील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षेचा छापा

चतुःश्रृंगीतील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षेचा छापा

शासन यंत्रणा
कुप्रसिध्द गुन्हेगार झुलकर खान व प्रमोद भेंडे याच्या जुगार अड्ड्यावरून. 5.26 लाखांच्या मुद्देमालासह, 17 आरोपींविरुद्ध कारवाई.कारवाईत चारचाकी, दुचाकी, मोबाईल सह टेबल, खुर्च्या, सोफे जप्त पुणे/दि/ प्रतिनिधी/सामाजिक सुरक्षा विभागास अवैध जुगाराच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, चतुःृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, दर्शन रीव्हर साईड हॉटेल, सांगवी स्पायसर रोड, औंध, या हॉटेलमध्ये व हॉटेलबाहेरील मोकळ्या जागेत बाईकवर सुरू असलेल्या पैशावर मटका, सोरट, पंकी पाकोळी, वगैरे जुगार गैरकारदेशीरीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंचासमक्ष या ठिकाणी रात्रौ सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून, सोरट, पंकी पाकोळी, मटका जुगार, वगैरे प्रकारचे जुगार खेळणारे तसेच अवैध रीत्या विदेशी मद्याचा साठा व विक्री करणारे आरोपी मिळून आलेने, 4 जुगार खेळवणारे, 4 जुगार खेळणारे व पाहीजे आरोपी 9 (त्यात जुगारासह अव...
पुणे महापालिकेतील 10 हजार कंत्राटी कामगारांचे 2700 कोटी रुपयांच्या महाघोटाळा

पुणे महापालिकेतील 10 हजार कंत्राटी कामगारांचे 2700 कोटी रुपयांच्या महाघोटाळा

शासन यंत्रणा
घोटाळेबाजांना पदोन्नतीची खिरापत, पुणे महापालिकेच्या आकृतीबंधात मनमानी फेरबदलपुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांचे सेवाप्रवेश नियम 2014 च्या अधिसुचनेनुसार निर्गमित केले आहेत. दरम्यान आकृतबंधामध्ये प्रशासकीय सेवा मध्ये पुनः उपकामगार अधिकारी हे पद निर्माण करून सेवाप्रवेश नियमामध्ये बदल एप्रिल 2022 रोजी करण्यात आलेला आहे. त्यानुसार नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी श्री. दिलिप वाणिरे यांनी पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील उप कामगार अधिकारी या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम, नेमणूकीची पद्धत व टक्केवारी निश्चित केली असून 50 टक्के नामनिर्देशानाने व 50 टक्के पदोन्नतीने भरण्याचे आदेश निर्गमित केले आहे. वस्तुतः 100 टक्के पदे नामनिर्देशानाने भरण्याची तरतुद आकृतीबंधामध्ये असतांना देखील केवळ जवळच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे मार्ग खुले करून दिले आहेत. प्रशासकीय...
पुणे महापालिकेने लाडावुन ठेवलेल्या …..क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना पगारच नाही,

पुणे महापालिकेने लाडावुन ठेवलेल्या …..क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना पगारच नाही,

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीये. महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्यान, पाणी टाकी व कार्यालये येथे कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. सुमारे 32 कोटी रुपयांचे हे कंत्राट मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. ही कंपनी भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याची असून केवळ दबावापोटी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने या कपंनीचा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप प्रस्ताव मंजुरीच्यावेळी विरोधकांकडून करण्यात आला होता. या कंपनीच्या मार्फत 1500 कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र कराराचे उल्लंघन होत अ...
पुणे पोलीसांना आली लहर…आणि रात्रीत केला कहर…

पुणे पोलीसांना आली लहर…आणि रात्रीत केला कहर…

शासन यंत्रणा
पोलीसांच्या साध्या अचानक छापामारीत सापडले बंदूका, तलवारी, कोयते, बंदूकीच्या पोतभरून गोळ्यापुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस काही कामच करीत नाहीत, स्थानिक पोलीस गुन्हेगारांवर मेहेरबान आहेत असा आरडा ओरडा सर्व बाजुने होत असल्याने अखेर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने, एका रात्रीत साधी छापामारी केली अन्‌‍ गुन्हेगारांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत बंदूका, बंदूकीला लागणाऱ्या गोळ्या, कोयते, तलवारी मोठ्या संख्येने पकडले आहेत. त्यातच 14 तडीपार इसम पुणे शहरात वास्तव्य करीत असल्याचे आढळुन आले आहे. ही साधी छापमारी होती. परंतु खरीच मोठी कारवाई केल्यास, दोन/पाच ट्रक भरून शस्त्रसाठी आढळुन येईल यात शंकाच नसल्याचे या कारवाईवरून अनुमान निघत आहे. पुणे शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी मागील आठवड्यात भर मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनमधील पथकांनी विशेष मोहिम राबविली....
मला घ्या, मला घ्या- अन्‌‍ पंचात न्या… काय तर म्हणे, आम्हालाही सह महापालिका आयुक्त पदाचा दर्जा दया,

मला घ्या, मला घ्या- अन्‌‍ पंचात न्या… काय तर म्हणे, आम्हालाही सह महापालिका आयुक्त पदाचा दर्जा दया,

शासन यंत्रणा
ॲन्टी करप्शनच्या कारवाईसाठी पात्र ठरलेल्या सरावलेल्या पांढऱ्या हत्तींनापुणे महापालिकेने केली पदांची खैरात, शिवाजी दौंडकर आणि उल्का कळसकर झाले सहमहापालिका आयुक्त पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासनावर कुणाचा वचक राहिला नाही. त्यामुळे मन मानेल तसे पदांची खैरात सुरू आहे. ज्यांच्यावर ॲन्टी करप्शने कारवाई करून, त्यांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे पुरावे शोधुन काढून, त्यांच्यावर कारवाईची पूर्व परवानगी पुणे महापालिकेकडे मागण्यात आली आहे, तथापी पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या भ्रष्टाचारी व गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पुणे महापालिकेने त्यांना सहमहापालिका आयुक्त पदांची खैरात केली आहे. दि. 13 जुन 2022 च्या आज्ञापत्रकानुसार, पुणे महापालिका, खातेप्रमुख संवर्गात 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या खातेप्रमुखांचे नामाभिमान सह म...
या आयएएस-आयपीएस लोकांचं करायचं काय ?

या आयएएस-आयपीएस लोकांचं करायचं काय ?

शासन यंत्रणा
आम्ही भ्रष्ट म्हणून राजकारण्यांकडे बोट दाखवतो परंतु भारतामध्ये सर्वात जास्त भ्रष्ट कोण असतील तर ते हे आयएएस आणि आयपीएस हे अधिकारी शंभर पिढ्यांचे भले होईल इतकी कमई करून ठेवतात आणि वर नैतिकतेच्या गोष्टी सांगायला , भाषणबाजी करायला सर्वात पुढे असतात सांगताहेत ॲड. विश्वास कश्यप…. एका महत्त्वाच्या बातमीकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे .बातमी अशी आहे की , दिल्ली सरकार मधील आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांच्या कुत्र्यास मोकळेपणाने मैदानात फिरता यावे म्हणून दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममधील क्रीडापटूंचे प्रशिक्षण लवकर बंद केले जायचे . कुत्रा आणि खिरवार पती पत्नीला मुक्तपणे फिरता यावे यासाठी संध्याकाळी सात वाजता त्यागराज स्टेडियममधील प्रशिक्षण संपूर्णपणे बंद केले जात असे . याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसमध्ये गुरुवार दिनांक 26 मे 2022 रोजी पहिल्या पानावर प्रकाशित झाले . संजीव खिरवार सोबत त्य...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली, बढतीच्या प्रकरणी 1 जुनला होणार झाडा झडती,

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली, बढतीच्या प्रकरणी 1 जुनला होणार झाडा झडती,

शासन यंत्रणा
pmc pune पुणे/दि/ प्रतिनिधी/महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा पुणे जिल्ह्याचा दौरा दि. 1 जुन 2022 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यामध्ये अनु. जाती कल्याण समिती, पुणे महापालिकेतील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती,बढती, आरक्षण व अनुशेष तसेच मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. ही बैठक बुधवार दि. 1 जुन 2022 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत होणार आहे दरम्यान पुणे महापालिकेत अनु. जाती प्रवर्गातीलकर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. बढती व आरक्षण प्रश्नी सातत्याने बोटचेपे धोरण ठेवले जात आहे. शासनाने आदेश देऊन देखील पदोन्नती दिली जात नाही. वरीष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती देवून, अनु. जातीच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखून धरली जात आहे. तरी या विषयाची माहिती असलेल्या पुणे शहरातील संस्था व संघटनांनी...
सावरकर भवन मध्ये अघोरी पुजा- तांत्रिक मांत्रिक गंडे दोरेचा प्रकार –

सावरकर भवन मध्ये अघोरी पुजा- तांत्रिक मांत्रिक गंडे दोरेचा प्रकार –

शासन यंत्रणा
pmc bandhakam 2022 पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात अमुलाग्र सुधारणा,बांधकाम झोन 7 मधील झुंडशाहीचे अतिक्रमण मोडून काढले, पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात सातत्याने ठिय्या मारून बसलेल्या दगडी नागोबांना सध्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असून, झुंडशाहीचे अतिक्रमण बऱ्यापैकी मोडून काढले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगातभिनलेला रेसवटपणा मंगळवारच्या बैठकीतून काढुन टाकला जात आहे, त्यानंतर स्वतः अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वात सातत्याने कार्यालयीन बैठका घेण्याचा पायंडा पाडला जात आहे. या माध्यमातून अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेतच शिवाय नागरीक, माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते- पुढारी मंडळी, नगरसेवक आणि आमदार - नामदारांच्याही अर्जांवर तातडीने कार्यवाही केली जात आहे, टपाल आणि प्रकरणांच्या निर्गतीचे...
विधी विभागाच्या ऍड. निशा चव्हाण यांच्या चुकीच्या अभिप्रायांमुळे मेडीकल कॉलेजचे अदा केले कोट्यवधी रुपये

विधी विभागाच्या ऍड. निशा चव्हाण यांच्या चुकीच्या अभिप्रायांमुळे मेडीकल कॉलेजचे अदा केले कोट्यवधी रुपये

शासन यंत्रणा
पुणे /दि/पुणे महापालिकेला संलग्न असलेले अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज ट्रस्ट नव्याने स्थापन करण्यात आले आहे. ह्याचे कामकाज पुणे महापालिकेच्या नायडू कंपाऊंड मध्ये सुरू आहे. तथापी पुणे महापालिकेने मेडीकल कॉलेज सुरू करण्यात आले असले तरी कोविड १९ मुळे विद्यार्थीच नाहीत. विना विद्यार्थी मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर प्राध्यापकांची भरती करून सुमारे ५ कोटी रुपयांचे वेतन अदा करून पुणे महापालिकेची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेज साठी सहा महिन्याच्या मुदतीवर प्राध्यापक असलेले डॉक्टर घेतलेले आहे. कोविड १९ मुळे मेडिकल कॉलेजमध्ये विदयार्थी नसल्यामुळे त्यांना कमला नेहरू हॉस्पीटल मध्ये काम देण्यात आले. कमला नेहरू हॉस्पीटल मध्ये ते ओपीडी मध्ये काम करीत असल्याचे सांगण्यात आले तथापी त्या ठिकाणी संबधित प्राध्यापक असलेले डॉक्टर आढळुन आले नसल्याच्या तक्रारी ...