Saturday, June 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली, बढतीच्या प्रकरणी 1 जुनला होणार झाडा झडती,

pmc pune

पुणे/दि/ प्रतिनिधी/
महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा पुणे जिल्ह्याचा दौरा दि. 1 जुन 2022 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यामध्ये अनु. जाती कल्याण समिती, पुणे महापालिकेतील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती,बढती, आरक्षण व अनुशेष तसेच मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. ही बैठक बुधवार दि. 1 जुन 2022 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत होणार आहे दरम्यान पुणे महापालिकेत अनु. जाती प्रवर्गातीलकर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. बढती व आरक्षण प्रश्नी सातत्याने बोटचेपे धोरण ठेवले जात आहे. शासनाने आदेश देऊन देखील पदोन्नती दिली जात नाही. वरीष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती देवून, अनु. जातीच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखून धरली जात आहे.

तरी या विषयाची माहिती असलेल्या पुणे शहरातील संस्था व संघटनांनी आपले म्हणणे देखील अनु. जाती कल्याण समितीची भेट घेवून मांडण्याचे आवाहन नॅशनल फोरमच्या वतीने करण्यात येत आहे.