Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

अनाधिकृत बाधंकाम कारवाईचे बनावट दस्तएैवज बनविल्या प्रकरणी… पुणे मनपा बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय जाधव यांच्या विरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अनाधिकृत बाधंकाम कारवाईचे बनावट दस्तएैवज बनविल्या प्रकरणी… पुणे मनपा बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय जाधव यांच्या विरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/                 उच्च न्यायालयाने ३१ मार्च २०१२ नंतर शहरात अनाधिकृत बांधकामे होऊ नयेत असे महापालिका प्रशासनाला सुनावले आहे. मात्र न्यायालयाचे आदेश न जुमानता कळस धानोरी या भागात अनाधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. जयश्री डांगे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेसंदर्भात हा निकाल दिलेला आहे. राज्य शासनाने देखील २००९ रोजी अनाधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यान्वित करण्यात आली आहे. तथापी पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन एक या कार्यालयाने अनाधिकृत बांधकामांवर कारवाई न करता, कारवाई केल्याचे बनावट दस्तएैवज पुणे महापालिकेच्या अभिलेख्यात तयार केले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे पुणे महापालिका व उच्च न्यायालयाची अवमानना करणार्‍या ब...

७ व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर जाणार

शासन यंत्रणा
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                  सातव्या वेतन आयोगासाठी सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केला आहे. राज्यातील दीड लाख राजपात्रित अधिकारी आणि तब्बल १५ लाख शासकीय कर्मचारी, शिक्षक हे ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान संपावर जाणार आहेत. सरकारसोबत कोणत्याही प्रकारची वाटाघाटी न करता हा संप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग. दि. कुलथे यांनी दिली.                 सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात वित्तमंत्र्यानी तीन महीन्यापूर्वीच फाईलवर सही केली असून, ती फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलावर पडून आहे. मात्र, तेच यासाठी दरिंगाई करत असल्याचा आरोप यावेळी संघटनेकडून करण्यात आला. तसेच पाच...