Sunday, August 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

PMC-PUNE- झाडणकामांच्या कंत्राटी कामगार भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, रूपाली चाकणकरांच्या तक्रार अर्जावर तीनही उपआयुक्तांनी सुपणारला कशी दिली क्लिनचिट….

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदलीचा अधिनियम लागु आहे. एका पदावर 3 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची समुपदेशनाने बदली केली जाते. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील आशिष सुपणार हे नियुक्तीपासून म्हणजे मागील 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. बदली नंतर तिथेही काम करायचे आणि बदलीच्या ठिकाणीही कामच करायचे असते. बदली झाल्यानंतर तिथेही नियमानुसार पगार मिळणारच आहे. काम तर प्रत्येक ठिकाणी करायचे आहे, परंतु आशिष सुपणार हे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय सोडून बाहेर जाण्यास तयार नाहीत. किंबहुना पुणे महापालिकेतील उपआयुक्त घनकचरा विभाग, उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 हे सुपणार यांची बदली करीत नाहीत. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी आशिष सुपणार याच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे निवेदन पुणे मनपा अति. आयुक्तांना सादर केल्यानंतर, श्री. सुपणार यांची कोणतीही चौकशी न करता निव्वळ बदली करण्यात आली. परंतु धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाने श्री. सुपणार यांना बेकायदेशिररित्या 2 महिन्यांची वैदयकीय रजा मंजुर केली. श्री. सुपणार यांनी या दोन महिन्याच्या कालावधीत बदली रद्द करण्यासाठी पुणे, मुंबई व नागपुरच्या भेटी घेतल्याचे ज्ञात असून, पुढे जावून दोन महिन्याच्या आतच त्यांची बदली पुनः सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे करण्यात आली. दुसऱ्या ठिकाणी बदली केली तरी तिथेही काम करायचे आहे आणि तिथेही पगार/वेतन मिळणार आहे, मग सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय का… असाही प्रश्न निर्माण होत आहे. मध्यंतरी पुणे शहरात जनगणना व स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान सुरू असतांना चार डिएसआय व 6 एसआय यांच्या बदल्या करण्यात आल्या. यातील डिएसआय माने व नाईक यांची 2 वर्षात 3 वेळा बदली करण्यात आली आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार हे आधुनिक अब्दुल करीम तेलगी आहेत, स्टॅम्प घोटाळ्याचा जनक तेलगी प्रमाणेच श्री. सुपणार हे उद्योगपती झाले आहेत. मुद्रांक घोटाळ्यातील बहुतांश रकमा तेलगीने विविध धंदयात (बिजनेसमध्ये) लावल्या होत्या. श्री. सुपणार याने देखील विविध स्त्रोतातून मिळालेल्या अपसंपदेचा वापर विविध उद्योग विस्तारात केला आहे. सिंहगड क्षेत्रिय कार्यालय हे सुपणार याचे हेडक्वॉर्टर आहे. सुपणार यांची बदली कुणीच करणार नाही (कुणीच म्हणजे आयुक्त देखील करणार नाही) आणि बदली केलीच तर बदलीसाठी हजारो,लाखो आणि कोटी रुपये ओतण्याची सुपणार यांची तयारी आहे, हे सुपणार यांनी धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे बदली झाल्यानंतर, तो आदेश रद्द करून त्यांनी दाखविला आहे. घनकचरा विभागात असे अनेक सुपणार आहे. सुपणार हे एक हिमनगाचे टोक आहे. परंतु मुद्दा शिल्लक राहतो की, सुपणारांना सिंहगडच का पाहिजे…

एकाच ठेकेदाराला 500 मे. टनाची निविदा मिळावी म्हणून पुणे महापालिकेची यंत्रणा कशी राबते-
मागील 15 दिवसात, पुणे महापालिकेची मुख्य इमारत आणि पुणे शहरातून प्रसारित होणाऱ्या सर्व मोठ्या वृत्तपत्रात एकच बातमी सतत फिरत आहे, आणि ती म्हणजे उरूळी देवाची येथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या 500 मेट्रीक टनाच्या प्रकल्पात 300 मे.टन ओला आणि 200 मे. टन सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्याची बातमी सतत फिरत आहे. तसेच पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाने देखील एकाच निविदेला आक्षेप घेतल्यानंतरही प्रशासनाकडून केवळ एकाच ठेकेदाराला डोळयासमोर ठेवून ही निविदा काढली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे, याशिवाय विविध पर्यावरणवादी संघटनांनी देखील एकाच निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तरी देखील एकाच ठेकेदारासाठी पुणे महापालिकेची यंत्रणा राबत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यातून झळकत आहे. सर्वसामान्य नागरीक घरातील,दुकानातील, इंडस्ट्रीमधील कचरा सहजपणे बाहेर फेकुन देतो, परंतु पुढे जावून ह्याच कचऱ्यासाठी मारामारी होते, साठमारी होते, कचऱ्यावर देखील राजकारण केलं जात, हे प्रकरण नंतर मंत्रालयापर्यंत आणि मंत्र्याच्या बंगल्यात देखील शिरले आहे. कचऱ्याचा हा महिमा आहे. हाच महिमा सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार यांनी वेळीच ओळखला, आणि कचऱ्यातून कोट्यवधी रुपयांचा बिजनेस थाटला आहे. पुणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना बाई आणि बाटली हवीच असते, हे सुपणार यांनी चांगलेच ओळखले असल्याचे दिसते. त्यासाठी सुपणार याने स्वतःचा घरगुती डान्सबार थाटून तिथेच सोमरसपान सुरू केले. राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी केलेल्या तक्रार अर्जांची फडतूस चौकशी होवून, त्यातून सुपणार यांना क्लिनचिट मिळाली आहे. 30 हजार कोटीचा मुद्रांक घोटाळा करणारा तेलगी याने जे केले, तेच सुपणार याने केले आहे. पुणे महापालिकेत सुमारे 20 हजार कोटीचा गार्बेज स्कॅम घडला आहे, सुपणार प्रकरण हे तर हिमनगाचे टोक आहे.

राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी पुणे महापालिकेचे अति. आयुक्त कुणाल खेमणार यांना कोणता तक्रार अर्ज दिला –
रूपाली चाकणकर यांनी 23 सप्टेंबर 2023 रोजी पुणे महापालिकेचे तत्कालिन अति. आयुक्त श्री. कुणाल खेमनार यांना लेखी तक्रार अर्ज दिला असून त्यांनी त्यात नमूद केले की, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे. सदर व्यक्ती हा मागील 13 वर्षांपासून एकाच जागेवर असल्याने त्याची या क्षेत्रात मक्तेदारी वाढली असून, मनमानी पद्धतीने वरिष्ठांना डावलुन अथवा मर्जी राखुन कारभार करीत आहे. सध्या असलेल्या (कंत्राटी) कामगार भरतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचा सर्वांना संशय आहे व तशा चर्चा चालु आहे. बेकायदेशिरपणे कंत्राटी कामगारांची भरती करून त्यांच्याकडून कामाला लावतो म्हणून हजारो लाखो रुपये घेतले जात आहे. विविध ठिकाणी हप्ते घेवून राजरोसपणे नागरिकांना उद्धटपणे बोलत आहे.

या शिवाय चार्जच्या नावाखाली अनेक ठिकाणी अधिकार बजावून अनेकांना वेठीस धरले आहे. प्रभारी डीएसआय चार्ज घेतला असतांना आरोग्य कोठी कारभार घेता येत नसतांना सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून खूप सारे कमवून सेटलमेंट करत असल्याच्या तक्रारी नागरीक करीत आहेत. तसेच सदर अधिकारी (आशिष सुपणार) आपले काम योग्य प्रकारे करत नसून या अधिकाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी असून कोणीही भितीपोटी तक्रार करत नव्हते. तरी सुपणार यांचे निलंबन करावे अशा आशयाचा तक्रार अर्ज रुपाली चाकणकर यांनी दिला होता. श्रीमती चाकरणकर यांच्या अर्जात जसा मजकुर होता, तो तसाच तसा नमूद केला आहे. 

तक्रार अर्जांवर पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने कोणती कार्यवाही केली –
1) घनकचरा विभागाचे तत्कालिन उपआयुक्त संदीप कदम यांनी त्यांच्या 3 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या पत्रात नमूद केले आहे की, सौ. रुपाली चाकणकर, महिला आयोग अध्यक्षा महाराष्ट्र राज्य यांनी आशिष सुपणार यांच्या विषयी विविध आरोप केले असून नमूद बाबींच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून अहवाल तत्काळ घनकचरा विभागाकडे सादर करावा असे नमूद केले.
2) घनकचरा विभागाचे प्रशासन अधिकारी यांनी देखील 10 ऑक्टोंबर 2023 रोजी सहा. आयुक्त सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय यांना पत्र दिले असून, त्यात नमूद केले आहे की, रुपाली चाकणकर यांच्या पत्राचे अवलोकन केले असता, तक्रारीत कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही. तरी आशिष सुपणार यांचेबाबतचा सुस्पष्ट अहवाल पुन्हा सादर करण्याविषयी नमूद केले आहे.

आशिष सुपणार यांच्याबाबत सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहा. आयुक्तांनी कोणता अहवाल सादर केला –
घनकचरा विभागाचे तत्कालिन उपआयुक्त संदीप कदम व प्रशासन अधिकाऱ्यांच्या पत्रावर तत्कालिन सहायक महापालिका आयुक्त श्री. प्रदीप आव्हाड यांनी त्यांच्या 5 ऑक्टोंबर 2023 रोजीचे पत्रात नमूद केले आहे की,
अ) आशिष सुपणार यांना आरोग्य निरीक्षक पदाचे कामकाज सांभाळून प्रभारी विभागीय आरोग्य निरीक्षकाचे कामकाज सोपविले आहे. आरोग्य विभागामध्ये कायम सेवकांबरोबरच कंत्राटी सेवक झाडणकामाचे व इतर कामकाज करीत आहे. कंत्राटी सेवक यांची भरती प्रक्रिया सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय स्थापत्य विभाग यांचेमार्फत निविदा मागवून ठेकेदारांकडून सदर सेवक नेमण्यात येतात असा खुलासा आशिष सुपणार यांनी केला असल्याचे नमूद करून पुढील योग्य तो निर्णय घनकचरा विभागाने घ्यावा असे सहायक महापालिका आयुक्त सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय यांच्या पत्रात नमूद आहे.

तांत्रिक मुद्दा उपस्थित करून, आशिष सुपणार यांना कशी क्लिनचिट दिली –
कंत्राटी सेवकांची भरती प्रक्रिया सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय स्थापत्य विभाग यांचेमार्फत निविदा मागवून ठेकेदारांकडून सदर सेवक नेमण्यात येतात, हा मुद्दा तांत्रिक स्वरूपाचा आहे. दरम्यान याच पत्रात नमूद आहे की, आरोग्य विभागामध्ये कायम सेवकांबरोबर कंत्राटी सेवक झाडणकामांचे व इतर कामकाज करावे लागते असे नमूद आहे. यात आरोग्य कोठीनिहाय कंत्राटी सेवकांची हजेरी लिहणे, हद्दीत झाडणकाम केले आहे की नाही त्याची पाहणी करणे, दरमहा कंत्राटी सेवकांची पगाराची हजेरी पाठविणे ही सर्व कामे असतात.
दरम्यान कंत्राटी सेवकांची भरती ठेकेदारामार्फत केली जात असली तरी, हजेरी, रजा लिहण्याचे काम सुपणार यांच्या सांगण्यावरून आजही होते. कुणाची हजेरी लिहायची आणि कुणाची रजा मांडायची हे सर्व आशिष सुपणार आजही ठरवितात. तसेच दरमहिन्याला पगारासाठी हजेरी पाठविण्याचे काम आरोग्य निरीक्षक यांचेच असते.

ठेकेदाराने जर सुपणार यांच्या मर्जीतील कंत्राटी सेवकाला नोकरीत लावुन घेतले नाही तर, ठेकेदाराचा छळ केला जातो. त्यात कामगार हजर असतांना देखील गैरहजर दाखविणे, हद्दीत स्वच्छता होत नाही म्हणून ठेकेदाराला ज्ञापन व नोटीस देणे, ठेकेदाराने नोटीशीला उत्तर दिले तरी त्यातही त्रुटी काढुन कंत्राट रद्द करण्याविषयी सहायक महापालिका आयुक्तांना पत्र दिले जाते. त्याच्याही पुढे पगारासाठी हजेरी पाठविली जात नाही. त्यामुळे आशिष सुपणार किंवा कोणत्याही आरोग्य निरीक्षकांची... नको ती कट कट... म्हणून ठेकेदार देखील एसआय व डीएसआय जे म्हणततील तेच करतात. 

दरम्यान पुणे महापालिकेतील झाडणकामाचे ठेकेदार बहुतांश कंत्राटी सेवकांचे महीनोमहाचे ईपीएफ व ईएसआय भरत नाहीत. हे केवळ एसआय व डिएसआय यांना माहिती असते. त्यातच नगरसेवक, एसआय व डिएसआय यांची काही बंद घरे असतात. त्यामुळे त्याच्या नावावर ईपीएफ व ईएसआय भरला तर संबंधित व्यक्तीला समजेल. त्यामुळे ईपीएफ व ईएसआय भरला जात नाही. 

केवळ कंत्राटी नोकर भरती ठेकेदार करतो ह्या एका वाक्यावर सुपणार यांना क्लिनचिट देण्यात आली आहे. 1. परंतु सुपणार यांनी किती कंत्राटी सेवकाची भरती केली, 2.नोकरीस लावण्यासाठी त्यांच्याकडून किती रूपये घेतले, 3.ते पैसे कुठे घेतले, 4.पैसे कोण स्वीकारत होता, तसेच 5.नोकरीला लावतो म्हणून अजून किती बेरोजगार नागरीकांना कामावर घेतले नाही, 6.त्यांनी कुठे तक्रारी अर्ज दिले आहेत, याची कोणतीही चौकशी केली नाही. श्रीमती रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या अर्जानुसार कोणतीही चौकशी झाली नाही. निव्वळ कंत्राटी कामगारांची भरती ठेकेदार करतो व पुढे सुपणार यांच्यावर काय कारवाई करायची हे उपआयुक्त घनकचरा यांनी ठरवावे असा लेखी अहवाल सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाने पाठवुन, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्तांनी एका वाक्यात आशिष सुपणार याला क्लिनचिट दिली आहे. पुढे हाच चौकशी अहवाल, उपआयुक्त, परिमंडळ क्र. 03, उपआयुक्त घनकचरा विभाग व उपआयुक्त सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे आल्यानंतर त्यांनी देखील सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या अहवालाला आक्षेप घेणे अपेक्षित होते. तथापी या सर्व प्रकरणांत तीनही उपआयुक्तांनी आक्षेप घेतले नाहीत. 

सुपणार यांना क्लिननिट दिल्यानंतर पुढे काय झाले-
खरं तर श्रीमती रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या अर्जावर योग्य ती चौकशी झाली असती तर सुपणार हे निव्वळ निलंबित नव्हे तर सेवेतून बडतर्फ झाले असते. फौजदारी गुन्हे दाखल झाले असते. ही सर्व कारवाई होवू नये म्हणून सुपणार यांची बदली धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे करण्यात आली. दि. 5/10/2023 रोजी सुपणार यांची बदली धनकवडी येथे केल्यानंतर, सिंहगड कार्यालयाने तब्बल तीन दिवसानंतर सुपणार यांना कार्यमुक्त केले. दरम्यान सुपणार यांनी धनकवडी येथे आरोग्य निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला नाही. दि. 9/10/2023 ते 1/12/2023 तब्बल दोन महिने वैदयकीय रजा धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाने दिली. दरम्यान सुपणार यांनी धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले नव्हते. तरी देखील वैदयकीय रजा धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाने कशी दिली याचीही चौकशी झाली नाही. दि. 2/12/2023 रोजी श्री. सुपणार हे धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले व 25/12/2023 रोजी पुनः सुपणार यांची बदली सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे करण्यात आली. वैदयकीय रजेचे कारण देवून दोन महिन्याच्या कालावधीत सुपणार यांनी बदली रद्द करण्यासाठी जंगजंग पछाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी राजकीय व आर्थिक ताकद लावण्यात आल्याचे सर्वांना ज्ञात आहे.

सुपणार यांनी पुनः कंत्राटी नोकरभरती केली, रेट 50 हजारावरून थेट 2 लाख रुपये केला –
राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या पत्रात नमूद असल्याप्रमाणे, चौकशी न झाल्यामुळे श्री. सुपणार यांनी पुन्हा नव्या जोमाने सिंहगड रोड क्षेत्रि कार्यालय येथे कंत्राटी नोकरभरती सुरू केली. पुणे महापालिकेने सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या झाडणकामासाठी सुमारे 480 जागा बीटनिहाय निश्चित केल्या आहेत.सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाने 480 ऐवजी आता 530 ते 560 जागेवर नोकरभरती केली आहे. दरम्यान मुळच्या 480 मध्ये देखील 50 ते 55 बंद घरे आहेत. नऱ्हे येथील तीनही कोठ्यांवर 160 पेक्षा अधिक कंत्राटी कामगार आहेत. मुळात एकाट्या नऱ्हेमध्ये तीन आरोग्य कोठ्या तयार केल्या असून त्यात जेमतेम 100 झाडण हद्दीत असतांना देखील तत्कालिन काळातील कनिष्ठ अभियंता श्री. नाईक यांना हाताशी धरून सुमारे अडीचशे ते तीनशे झाडणहद्दीत दाखविण्यात आल्या आहेत.

सिंहग्ड क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील विठ्ठलवाडी आरोग्य कोठी, माणिकबाग आरोग्य कोठी, सनसिटी आरोग्य कोठी व इतर पाच ते सहा आरोग्य कोठ्यांमध्ये देखील झाडणहद्दी जास्त दाखवुन कामगार भरती केली आहे. मुळात तेथे एवढ्या कंत्राटी कामगारांची आवश्यकता नाही. जास्त कंत्राटी कामगार भरती करून, त्यातही नगरसेवकांचे 4, आमदारांचे 2 आणि एसआय व डीएसआय यांचे प्रत्येकी 5/5 कंत्राटी सेवकांची बंद घरे आहेत. त्यांचा सर्व पगार वाटून घेतला जातो हे उघड आहे. 

सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाचा निर्लज्जपणा –
कंत्राटी कामगारांची वेठबिगाऱ्यासारखी पिळवणूक –

सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात 480 कंत्राटी कामगार संख्या निश्चित केलेली असतांना, देखील 560 कंत्राटी भरती केली आहे. याबाबत मी स्वतः तक्रार अर्ज देवून विचारणा केली असता, मला तोंडी उत्तर दिले आहे की, 480च्या परिमाणातच पगार/ वेतन दिले जाते. परिमाणात काहीच बदल होत नाही. त्यामुहे 480 च काय 880 कंत्राटी सेवक भरले तरी पगार/वेतन हे 480 च्या परिमाणानुसार दिले जाते. यात पुणे महापालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही असे निर्लज्जपणे सांगितले जाते. परंतु महत्वाची बाब म्हणजे, काही कंत्राटी सेवकांना 15 दिवसांचे काम, काही कंत्राटी सेवकांना 20 दिवसांचे काम, काही सेवकांना 22 दिवसांचे काम, काही सेवकांना तर 8 दिवसांचे काम दिले जाते. संबंधित कंत्राटी सेवक नियमित येण्यास तयार असतांना देखील उर्वरित भरलेल्या सेवकांना काम देण्यासाठी व 480 कंत्राटी सेवकांचा आठवड्यातील 1 व महिन्यातील 4 किंवा 5 रविवारचा पगाराचे पैसे खाण्यासाठी परिमाणाचे कारण सांगुन रक्कमा वसुल केल्या जात आहेत. याबाबत देखील माझा तक्रार अर्ज मागील दिड वर्षांपासून कार्यवाहीविना प्रलंबित ठेवला आहे. सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात कंत्राटी कामगारांची वेठबिगाऱ्यांसारखी पिळवूणक केली जात आहे. याकडे उपआयुक्त परिमंडळ क्र. 03, उपआयुक्त घनकचरा जाणिपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यामागे सुपणारचा डान्सबार, मासिक पॅकेट आणि सहामाहि पॅकेज आडवे येत असल्याने त्यावर कारवाई केली जात नाही.

एका कंत्राटी कामगाराचा रविवार हक्काच्या सुट्टीचा पगार 800 रुपये गृहित धरल्यास, 480 कंत्राटी कामगारांचे 4 रविवारचे एकुण 15 लाख 36 हजार रुपये गिळंकृत केले जात आहेत. याबाबत अनेक तक्रार अर्ज दिले आहेत. परंतु कार्यवाही केली जात नाही. सुपणार यांची 50 ते 55 बंद घरे आहेत. दरमहा 18 हजार रुपये प्रमाणे 50 कंत्राटी सेवकांचा एकुण किती लाखाची रक्कम सुपणार आणि त्याच्या टोळीच्या हातात जात आहे याचा विचार आता पुणेकरांनी करावा अशी माझी विनंती आहे. दरमहा नऊ लाख रुपये .... विचार करा, थोड थोडकीशी रक्कम नाहीये...