Friday, June 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

PMC- PUNE- झाडणकामांच्या कंत्राटी कामगार भरतीमध्ये सुपणारकडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांच्या तक्रार अर्जावर तीनही उपआयुक्तांनी सुपणारला कशी दिली क्लिनचिट….?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
मागील 15 दिवसात, पुणे महापालिकेची मुख्य इमारत आणि पुणे शहरातून प्रसारित होणाऱ्या सर्व मोठ्या वृत्तपत्रात एकच बातमी सतत फिरत आहे, आणि ती म्हणजे उरूळी देवाची येथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या 500 मेट्रीक टनाच्या प्रकल्पात 300 मे.टन ओला आणि 200 मे. टन सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्याची बातमी सतत फिरत आहे. तसेच पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाने देखील एकाच निविदेला आक्षेप घेतल्यानंतरही प्रशासनाकडून केवळ एकाच ठेकेदाराला डोळयासमोर ठेवून ही निविदा काढली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे, याशिवाय विविध पर्यावरणवादी संघटनांनी देखील एकाच निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तरी देखील एकाच ठेकेदारासाठी पुणे महापालिकेची यंत्रणा राबत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यातून झळकत आहे. सर्वसामान्य नागरीक घरातील,दुकानातील, इंडस्ट्रीमधील कचरा सहजपणे बाहेर फेकुन देतो, परंतु पुढे जावून ह्याच कचऱ्यासाठी मारामारी होते, साठमारी होते, कचऱ्यावर देखील राजकारण केलं जात, हे प्रकरण नंतर मंत्रालयापर्यंत आणि मंत्र्याच्या बंगल्यात देखील शिरले आहे. कचऱ्याचा हा महिमा आहे. हाच महिमा सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार यांनी ओळखले आणि कचऱ्यातून कोट्यवधी रुपयांचा बिजनेस थाटला आहे. पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना बाई आणि बाटली पाहिजे, हे सुपणार यांनी चांगलेच ओळखले. त्यासाठी सुपणार याने स्वतःचा डान्सबार थाटून तिथेच सोमरसपान सुरू केले. राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी केलेल्या तक्रार अर्जांची फडतूस चौकशी होवून, त्यातून सुपणार यांना क्लिनचिट मिळाली आहे. 30 हजार कोटीचा मुद्रांक घोटाळा करणारा तेलगी याने जे केले, तेच सुपणार याने केले आहे. पुणे महापालिकेत सुमारे 20 हजार कोटीचा गार्बेज स्कॅम घडला आहे, सुपणार प्रकरण हे तर हिमनगाचे टोक आहे.

राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी पुणे महापालिकेचे अति. आयुक्त कुणाल खेमणार यांना कोणता तक्रार अर्ज दिला –
रूपाली चाकणकर यांनी 23 सप्टेंबर 2023 रोजी पुणे महापालिकेचे तत्कालिन अति. आयुक्त श्री. कुणाल खेमनार यांना लेखी तक्रार अर्ज दिला असून त्यांनी त्यात नमूद केले की, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे. सदर व्यक्ती हा मागील 13 वर्षांपासून एकाच जागेवर असल्याने त्याची या क्षेत्रात मक्तेदारी वाढली असून, मनमानी पद्धतीने वरिष्ठांना डावलुन अथवा मर्जी राखुन कारभार करीत आहे. सध्या असलेल्या (कंत्राटी) कामगार भरतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचा सर्वांना संशय आहे व तशा चर्चा चालु आहे. बेकायदेशिरपणे कंत्राटी कामगारांची भरती करून त्यांच्याकडून कामाला लावतो म्हणून हजारो लाखो रुपये घेतले जात आहे. विविध ठिकाणी हप्ते घेवून राजरोसपणे नागरिकांना उद्धटपणे बोलत आहे.
या शिवाय चार्जच्या नावाखाली अनेक ठिकाणी अधिकार बजावून अनेकांना वेठीस धरले आहे. प्रभारी डीएसआय चार्ज घेतला असतांना आरोग्य कोठी कारभार घेता येत नसतांना सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून खूप सारे कमवून सेटलमेंट करत असल्याच्या तक्रारी नागरीक करीत आहेत. तसेच सदर अधिकारी (आशिष सुपणार) आपले काम योग्य प्रकारे करत नसून या अधिकाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी असून कोणीही भितीपोटी तक्रार करत नव्हते. तरी सुपणार यांचे निलंबन करावे अशा आशयाचा तक्रार अर्ज रुपाली चाकणकर यांनी दिला होता.

तक्रार अर्जांवर पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने कोणती कार्यवाही केली –
1) घनकचरा विभागाचे तत्कालिन उपआयुक्त संदीप कदम यांनी त्यांच्या 3 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या पत्रात नमूद केले आहे की, सौ. रुपाली चाकणकर, महिला आयोग अध्यक्षा महाराष्ट्र राज्य यांनी आशिष सुपणार यांच्या विषयी विविध आरोप केले असून नमूद बाबींच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून अहवाल तत्काळ घनकचरा विभागाकडे सादर करावा असे नमूद केले.

2) घनकचरा विभागाचे प्रशासन अधिकारी यांनी देखील 10 ऑक्टोंबर 2023 रोजी सहा. आयुक्त सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय यांना पत्र दिले असून, त्यात नमूद केले आहे की, रुपाली चाकणकर यांच्या पत्राचे अवलोकन केले असता, तक्रारीत कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही. तरी आशिष सुपणार यांचेबाबतचा सुस्पष्ट अहवाल पुन्हा सादर करण्याविषयी नमूद केले आहे. 

आशिष सुपणार यांच्याबाबत सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहा. आयुक्तांनी कोणता अहवाल सादर केला –
घनकचरा विभागाचे तत्कालिन उपआयुक्त संदीप कदम व प्रशासन अधिकाऱ्यांच्या पत्रावर तत्कालिन सहायक महापालिका आयुक्त श्री. प्रदीप आव्हाड यांनी त्यांच्या 5 ऑक्टोंबर 2023 रोजीचे पत्रात नमूद केले आहे की,
अ) आशिष सुपणार यांना आरोग्य निरीक्षक पदाचे कामकाज सांभाळून प्रभारी विभागीय आरोग्य निरीक्षकाचे कामकाज सोपविले आहे. आरोग्य विभागामध्ये कायम सेवकांबरोबरच कंत्राटी सेवक झाडणकामाचे व इतर कामकाज करीत आहे. कंत्राटी सेवक यांची भरती प्रक्रिया सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय स्थापत्य विभाग यांचेमार्फत निविदा मागवून ठेकेदारांकडून सदर सेवक नेमण्यात येतात असा खुलासा आशिष सुपणार यांनी केला असल्याचे नमूद करून पुढील योग्य तो निर्णय घनकचरा विभागाने घ्यावा सहायक महापालिका आयुक्त सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय यांच्या पत्रात नमूद आहे.

तांत्रिक मुद्दा उपस्थित करून, आशिष सुपणार यांना कशी क्लिनचिट दिली –
कंत्राटी सेवक यांची भरती प्रक्रिया सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय स्थापत्य विभाग यांचेमार्फत निविदा मागवून ठेकेदारांकडून सदर सेवक नेमण्यात येतात, हा मुद्दा तांत्रिक स्वरूपाचा आहे. दरम्यान याच पत्रात नमूद आहे की, आरोग्य विभागामध्ये कायम सेवकांबरोबर कंत्राटी सेवक झाडणकामांचे व इतर कामकाज करावे लागते असे नमूद आहे. यात आरोग्य कोठीनिहाय कंत्राटी सेवकांची हजेरी लिहणे, हद्दीत झाडणकाम केले आहे की नाही त्याची पाहणी करणे, दरमहा कंत्राटी सेवकांची पगाराची हजेरी पाठविणे ही सर्व कामे असतात.

दरम्यान कंत्राटी सेवकांची भरती ठेकेदारामार्फत केली जात असली तरी, हजेरी, रजा लिहण्याचे काम सुपणार यांच्या सांगण्यावरून आजही होते. कुणाची हजेरी लिहायची आणि कुणाची रजा मांडायची हे सर्व आशिष सुपणार आजही ठरवितात. तसेच दरमहिन्याला पगारासाठी हजेरी पाठविण्याचे काम आरोग्य निरीक्षक यांचेच असते.

ठेकेदाराने जर सुपणार यांच्या मर्जीतील कंत्राटी सेवकाला नोकरीत लावुन घेतले नाही तर, ठेकेदाराचा छळ केला जातो. त्यात कामगार हजर असतांना देखील गैरहजर दाखविणे, हद्दीत स्वच्छता होत नाही म्हणून ठेकेदाराला ज्ञापन व नोटीस देणे, ठेकेदाराने नोटीशीला उत्तर दिले तरी त्यातही त्रुटी काढुन कंत्राट रद्द करण्याविषयी सहायक महापालिका आयुक्तांना पत्र दिले जाते. त्याच्याही पुढे पगारासाठी हजेरी पाठविली जात नाही. त्यामुळे आशिष सुपणार किंवा कोणत्याही आरोग्य निरीक्षकांची... नको ती कट कट... म्हणून ठेकेदार देखील एसआय व डीएसआय जे म्हणततील तेच करतात. केवळ कंत्राटी भरती ठेकेदार करतो ह्या एका वाक्यावर सुपणार यांना क्लिनचिट देण्यात आली आहे. परंतु सुपणार याने किती कंत्राटी सेवकाची भरती केली, त्यांच्याकडून किती रूपये घेतले, कुठे घेतले, पैसे कोण स्वीकारत होता, तसेच नोकरीला लावतो म्हणून अजून किती बेरोजगार नागरीकांना कामावर घेतले नाही याची कोणतीही चौकशी केली नाही. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्तांनी एका वाक्यात आशिष सुपणार याला क्लिनचिट दिली आहे. पुढे हाच चौकशी अहवाल, उपआयुक्त, परिमंडळ क्र. 03, उपआयुक्त घनकचरा विभाग व उपआयुक्त सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे आल्यानंतर त्यांनी देखील सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या अहवालाला आक्षेप घेणे अपेक्षित होते. तथापी या सर्व प्रकरणांत तीनही उपआयुक्तांनी आक्षेप घेतले नाहीत. 

उद्याच्या अकांत-
मग पुढे काय झाले…
सुपणार यांची बदली झाली. परंतु दोन महिन्यांची रजा टाकुन सुपणार हे परागंदा झाले. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर, सुपणार हे पुन्हा सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले. धनकवडी येथे एक दिवसही काम केले नाही.
परंतु सुपणार यांना 2011 पासून ते आजपर्यंत सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथेच का काम करायचे आहे. दुसऱ्या क्षेत्रिय कार्यालयात गेल्यानंतर देखील पगार हा मिळणारच आहे, मग सिंहगड रोडच कशासाठी….
पुणे महापालिकेने सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयास झाडणकामासाठी 480 कंत्राटी कामगार मंजुर केले असतांना सुमारे 530 कामगारांची भरती केली….. 480 ते 530 व्हाया परिमाणाचे अर्थशास्त्र, 50 पेक्षा अधिक बंद घरे, आरोग्य कोठीनिहाय कायम सेवकांचे बंद घरातून दरमहा 10 ते 15 हजार रुपये, यानुसार विविध आरोग्य कोठ्यांतील कायम सेवकांची बंद घरे, बल्क वेस्ट खाजगी संस्थांचे कामकाज यातून दरमहा 30 ते 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची वसुली…. जिल्हाधिकारी तरी सोडा, भारताच्या राष्ट्रपतींनाही एवढा पगार मिळत नसेल, एवढी वसुली एकट्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे सुपणार व त्याच्या आरोग्य निरीक्षकांकडून होते. ते कसे पाहुयात पुढील अंकात…..
20 हजार कोटीच्या गार्बेत स्कॅम मध्ये प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात एक/दोन सुपणार आहेत,