
पंढरपूरचे विठ्ठल हे भगवान बुध्दच..
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार असून तेथील खांबांवर बुद्ध वचने कोरलेली आहेत. त्यामुळेच लोकात जनजागृती करण्यासाठी आम्ही भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी धम्म यात्रा काढली आहे,असे या धम्म यात्रेचे आयोजक भंते ज्ञानज्योती महास्थविर यांनी सांगितले,
पंढरपूर शहराला प्राचीन काळापासून इतिहास असून या शहराचे नाव 'पुंढरिक' असे होते. “जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा वसवले पंढरपूर“ असे संत तुकाराम महाराज सांगतात. पंढरपूर शहर पुंढरिक महाधम्मरक्षित नावाच्या अर्हद भिक्षूनी ही नगरी वसवलेली आहे. पूर्वीच्या काळी पंढरपूर बौध्द भिक्षू निर्माण करण्याचे केंद्र होते. येथून देशभरात भिक्षू धम्माच्या प्रचारासाठी जात असत आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला विहाराकडे येत असत. बौध्द भिक्षू सुमारे चार महिने विहारात राहत असत. याच दरम्यान गावोगावचे लोक येथे येवून पंढरपुरातील भिक्षूंना वर्षावासानिमित्त आपल्या गावात घेऊन जात. त्या...