Saturday, June 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पोलीसांवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांकडून टेहळणी पथके

मला नाही अबु्र, मी कशाला पोलीसांना घाबरू

पोलीसांवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांकडून टेहळणी पथके

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे शहरात आजपर्यंत 70 गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केल्याची शेखी मिरविणाऱ्या पुणे पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारांनी पुणे शहरात स्वतंत्र साम्राज्य निर्माण केलं आहे. आज पर्यंत
पोलीस गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी पथके तयार करीत होते, तर आता गुन्हेगार प्रवृत्तीच्या टोळ्यांनी आता पोलीसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह जागोजाग टेहळणी
पथके तयार केल्याची बाब निदर्शनास आली आहे. पुणे शहरातील महिला व बालकांची तस्करी, बिनधोकपणे सुरू असलेले जुगार अड्डे, अंमली पदार्थांची विक्री, देशी विदेशी मदयाची रेललेच, राजरोसपणे सुरू असलेला वेश्याव्यवसाय व बालकांकरवी भिक मागायला लावण्याचे कारखाने जोरदार सुरू झाले आहेत. पुणे शहर पोलीसांना तक्रार करून, करून थकलेल्यांनी आता गृहमंत्रालयाचे दरवाजे ठोठावले असून, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल कार्यालयापर्यंत ही बाब पोहोचली आहे. तरी देखील अब तक 70…. म्हणून मिरविणाऱ्या पोलीस आयुक्तालयाकडून जबरी आणि जुजबी कारवाईची अजून प्रतिक्षाच आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागा गुन्हे शाखेचे वरीष्ठ अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, पुणे शहरातील अवैध धंदे, जुगार अड्डे, देशी विदेशी मदयाची तस्करी, दिवस-रात्र ढाणढाण सुरू असलेले जुगारक्लब यांच्याविरूद्ध मोहिम उघडली आहे. त्यामुळे घाबरलेल्या अवैध धंदे चालकांनी मदतीसाठी स्थानिक पोलीसांना पाचारण केले आहे. स्थानिक पोलीस स्टेशन आणि गुन्हेगारी टोळ्यांनी राजेश पुराणिक यांच्या कायदेशिर कारवाया निष्प्रभ करण्यासाठी नवीन शक्कल लढविली आहे. जुगार अड्डे, क्लब चालकांनी त्यांच्याकडील गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पंटर मंडळींना टेहळणी पथकात सामिल करून अवैध धंदयाच्या चारही दिशांना टेहळणी पथके नियुक्त केली आहेत. त्यातच आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी थांबुन जुगार अड्डे, मानवी तस्करी उद्योग करण्यापेक्षा फिरून/ फिरून उद्योग सुरू आहेत. ग्रुप करून थांबण्यास सध्या मनाई करण्यात आली आहे. यामुळेच मागील पाच सहा दिवसात सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाया काहीशा संथगतीने असल्या तरी आता संस्थगित झाल्यासारखे दिसून येत आहे. 

फरासखान्यातील द(वा)ळवी
पोलीस परिमंडळ एक च्या हद्दीतील फरासखाना पोलीसात मागील 20 वर्षात अनेक वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदाचे अधिकारी आले, त्यांनी त्यांच्या कामाचा ठासा उमटविला. अनेक मातब्बर गुन्हेगारांना पकडून त्यांना फासावर लटकाविले. परंतु आताचे पो.नि. यांना कर्तव्यात कसुरी हा शब्दच अपुरा पडत आहे. बुधवारातील पप्पूचे हस्तक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच फरासखाना पोलीसात सध्या द(वा)ळवीने पोखरले आहे. ते स्वतःचे मनाचे काहीच करीत नाहीत. तिसराच रिंग मास्टर त्यांना चालवित असल्याचे दिसून आले आहे. वाळवीने एखादे झाड किंवा घर पोखरून काढावे तसे आत्तापर्यंत पोखरून काढले असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान शहर पोलीस कारवाई करतील यावर विश्वासच राहिला नसल्याचे दुःख असल्यामुळेच ही बाब गृहमंत्रालयास अवगत करण्यात आली असून पुढील कारवाई अपेक्षित आहे.


आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्यांची बदनामी आणि गुन्हेगारी टोळ्या पोसणारी स्थानिक पोलीस यंत्रणा –
पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक चा पदभार स्वीकारल्यानंतर, त्या आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुरते बदनाम करून, त्यांना पुणेरी पाणी दाखविले आहे. त्यामुळे उपआयुक्त कार्यालय गुन्हेगार किंवा कर्तव्यात कसुरी प्रकरणी कोणतीही कारवाई करतांना, त्या प्रकरणांची सखोल चौकशी करूनच कारवाईचा प्रस्ताव पुढे देत असल्याचे समजते. तथापी एका आयपीएस महिला पोलीस उप आयुक्तांना बदनाम करून, त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करून, मागाहून, अवैध धंदयाचे जाळे मोठ्या प्रमाणावर उभे करण्यात आले आहे. यात उपआयुक्त कार्यालयातील तत्कालिन काळातील प्रतिनियुक्तीवरील पोलींसांचा मोठा सहभाग आहे.
10/10 वर्ष एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर, पिसाळलेल्या व सैरभैर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बदनामीचे कारस्थान रचले. प्रकरण जेंव्हा घडले तेंव्हा देखील आम्हीच हे उघड केले होते. परंतु मास्टर माईंड अजूनही पडद्याचे मागे आहे. त्यामुळेच अवैध धंदयाचे जाळे विस्तारले आहे. परिमंडळ एकच्या अधिन असलेले एकुण सहा पैकी चार पोलीस हद्दीत एकुण 5000 हजारांच्या आसपास येरवडा मंगल कार्यालयातून हळद लावुन आलेले अट्टल गुन्हेगार अवैध धंदयात कार्यरत आहेत.
याच पाच हजार गुन्हेगारांना पोसण्याचे काम स्थानिक पोलीस यंत्रणा करीत असल्याचे उघडपणे दिसत आहे. त्यासाठी कोणत्याही चौकशी समिती किंवा आयोगाची आवश्यकता नाहीये. एकट्या फरासखाना पोलीस हद्दीत 35 अवैध धंदयावर सुमारे 1200 गुन्हेगार कार्यरत आहेत. यावरून लक्षात येते की, पोलीसच गुन्हेगारांना पोसत असल्याचे दिसून येते.
खाजगी सावकारी आणि धंदयाचा मालकही एकच –
देशी विदेशी महिला व बालकांची तस्करी प्रकरणाचे सर्व धागेदोरे बुधवार- शुक्रवार पेठेपर्यंत असल्याचे सर्व पोलीसांना माहिती झाले आहे. परंतु हाच तस्कर, बहुतांश पोलीस स्टेशन सांभाळत आहे, बहुतांश पोलीसांना सांभाळत आहे. त्यांच्या अडी-नडीला धावुन जात आहे. तसेच कित्येक पोलीसांना नोकरीसह त्याने जोडधंदे सुरू करण्यास मदत केली आहे. काहींना हॉटेल व्यवसाय, काही पोलीसांना ट्रॅव्हल एजन्सीसाठी वाहने खरेदी करण्यासाठी, काही पोलीसांना बांधकाम क्षेत्रात उभे करून त्यांना बिल्डर म्हणून नावलौकिक मिळवून दिला आहे. कित्येक पोलीस क्रांती चौकात येवून बिर्याणीचा रोज आस्वाद घेतात.
पोलीसांच्या जेवणाची तरतुदही याच मोक्यातील गुन्हेगाराने केली आहे. बुधवार पेठेतील रंजले गंजलेल्या, कुटूंब आणि समाजापासून दुर फेकेल्या गेलेल्या अबलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी याच खाजगी सावकाराकडून पैसे घ्यावे लागत आहेत. पोलीसांकरवी कारवाई झाली तर सोडवून आणून पुनः त्या अबले करवी वेश्याव्यवसाय करवुन त्याव्दारे व्याजाचे पैसे गोळा करीत आहे. त्यातच थोड थोडके की काय म्हणून जोडीला अवैध धंदयाचे जाळे उभे केले आहे. शेकडोंनी गुन्हेगार मंडळी त्याच्या आश्रयाला आहेत. थोडक्यात खाजगी सावकार म्हणून तोच आणि धंदा मालक म्हणून तोच कार्यरत आहे. पोलीसच त्याच्या दिमतीला आहेत मग कारवाई करणार तरी कोण……….
टेहळणी पथकाचे लोण शहरभर पसरले
पोलीसांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आजपर्यंत गुन्हे संशोधन पथक तयार केल्याचे सर्वांना माहिती आहे. परंतु अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांकडून पोलीसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार केली असतील हे ऐकुण आश्चर्य वाटायला नको. कारण पुणे शहरात सध्या सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेच्या धडक कारवाई विरूद्ध अंमली पदार्थ,जुगार अड्डे, मानवी तस्करांकडून टेहळणी पथके तयार केली आहेत. एवढंच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेरे, गुन्हेगारांची साखळी तयार केली आहे. ही परिस्थिती एकट्या परिमंडळ एक मधील पोलीस स्टेशन हद्दीत नसून संपूर्ण पुणे शहरात ही पथके कार्यरत आहेत.


उदहारण म्हणून एकट्या फरासखाना हद्दीतील हकीकत पहा –
उदाहरण म्हणून एकट्या फरासखाना पोलीस स्टेशनचा विचार केला तर मध्यवर्ती पुणे शहरातील बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, गुरूवार पेठ, मंगळवार पेठ इथले गल्ली बोळात 40 पेक्षा अधिक अवैध उद्योग सुरू आहेत. त्यावर 1200 पेक्षा अधिक गुन्हेगार 40 कंपन्यात कार्यरत आहेत. बुधवार-शुक्रवार ते सर्व परिचित आहेच. त्यातच गुरूवार पेठ, दगडी नागोबा, पवळ्यांचा ढग्यापासून ते भिमनगरातील शिवाजी स्टेडीअम पर्यंत गल्ली बोळ धंदयाने व्यापले आहे. तिकडे समर्थ मध्ये देखील काही अलबेल नाही.
अपोलोचा सर्व खेळ जोरात आहेत. एमएसईबी पासून ते बारणे पर्यंतच्या नागझरीत कोण गडबडा लोळतय… खडक मध्ये तर विचारूच नका, खडकचा नंदू पराठा फरासखाना व खडक हद्दीत जोरदार आहे, अमूल बटर तर अंडाभुर्जी सोडून देत आता, 15/20 टेबलावरून कॅटची विक्री करीत आहे. छोटे मोठे सोम्या गोम्या तर आहेतच. त्या डेक्कनच तर काही विचारूच नका… त्यांना पुढील काळात पाहू, नदी पल्याड डेक्कनच पाणी थोड वेगळं आहे.
थोडक्यात अशी ही परिस्थिती आहे. आता सामाजिक सुरक्षा विभागाला पोलीसांनीच निष्प्रभ करून हतबल केले आहे. त्यामुळे राजेश पुराणिकांची कारवाई संस्थगित झाल्यातच जमा आहे. कारवाईच्या नावाने शिमगा आहे, संपूर्ण पुणे शहरात विना कारवाईचा केवळ वणवा पेटला आहे.