
पुणे महापालिकेच्या विधी विभागातील वर्षानुवर्ष कार्यरत सेवकांची बदली का होत नाही…श्रीमती चव्हाण यांच्याकडून पदाचा दुरूपयोग – बेकायदेशिरपणे पुणे महापालिकेतील चारचाकी वाहनाचा वापर –
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेच्या विधी विभागाचा महापालिकाद्रोही कारभार सुरू असून, निशा चव्हाण यांना मुख्य विधी अधिकारी या पदावर बसविण्याचे मोठे कारस्थान महापालिका निवडूकी आधी करण्याचे रचले जात आहे. दरम्यान निशा चव्हाण यांचे गुन्हे लक्षात घेता त्यांना मुख्य विधी अधिकारी पदावर बसवु नये अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान विधी विभागात वर्षानुवर्षे कार्यरत असणार्या कर्मचार्यांची संख्या मोठी असून त्यांना बदलीचा अधिनियम लागु नसल्याच्या अविर्भावात ते असतात. निशा चव्हाण यांच्याविरूद्ध मागील १० वर्षातील अनेक प्रकरणे असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे. (भाग - २)
भ्रष्ट आणि गैरव्यवहार प्रकरणेपुणे महापालिकेतील विधी अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी पुणे महापालिकेतील टिडीआर, एफएसआय अभिप्राय व केसेस मध्ये नियमबाह्य व बेकायदेशीर घोळ केले असून त्य...