Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Godbengal only changes in Pune Municipal Corporation’s building design! # पुणे महापालिकेच्या भवन रचना मधील बदल्यांच गौडबंगाल!

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेतील सर्वच संवर्गातील बदल्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. काही अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या, विहीत कालावधी पूर्ण होण्याच्या आतच बदली आदेश काढला जातो. काही कर्मचार्‍यांना तर दोन तीन महिन्यांतच एका खात्यातून दुसर्‍या खात्यात बदली केली जाते. परंतु काही कर्मचार्‍यांची बदलीचा दोन पदावधी पूर्ण केला तरी बदली केली जात नाही. केवळ टेबलची अदला बदल केली की, बदलीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखविण्यात येत आहे. थोडक्यात काही विशिष्ट कर्मचार्‍यांच्यावर विशिष्ट दया दाखविली जात आहे, तर काही कर्मचार्‍यांच्या बाबतीत दुराभाव दर्शविण्यात येत आहे. यामुळे पुणे महापालिकेतील बदल्यांमधील गौडबंगाल अधिकच वाढत चालले आहे.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी दि. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी भवन रचना, अतिक्रमण अनाधिकृत बांधकामे व घनकचरा विभागातील कनिष्ठ अभियंता संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. तसेच बदली आदेशात तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देवून, आदेश न मानणार्‍या कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे आदेशित करण्यात आले होते. तथापी बदली आदेश येवून देखील काही कर्मचार्‍यांची बदलीच्या जागी रुजु न होता, बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.


याचा परिणाम म्हणजे, दोन महिन्यांच्या आतच काही विशिष्ठ कर्मचार्‍यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. तसेच काही ठिकाणी तर बदलीच्या आदेशात अंशतः बदल करण्यात आले आहे. या शिवाय बदली प्रक्रियेबाबत साशंकता निर्माण होऊच नये म्हणून संपूर्ण बदली आदेश रद्द करून, सध्याचे खाते रकान्यातील पदांवर पुनः बदली कर्मचार्‍यांना रुजु करून घेण्यात आले आहे. अशा प्रकारे पुणे महापालिकेचे धर-सोडीचे आणि सोईचे काम सध्या सुरू आहे. बदलीचा अधिनियम लागु नसल्याच्या अविर्भावात अनेक अधिकारी व कर्मचारी सातत्याने वावरत असतात.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी काढण्यात आलेल्या बदली आदेशानुसार भवन रचना वगळता, घनकचरा विभाग, वारसा विभाग, अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम मधील कनिष्ठ अभियंता यांनी बदलीच्या जागी हजर झाले. परंतु भवन रचना विभागातील कर्मचार्‍यांनी बदली रद्द करण्यासाठी अनेकांचे उंबरठ झिजविले असल्याचे ऐकण्यात येत आहे.


दरम्यान पुणे महापालिकेच्या भवन रचना विभगातील विशाल पाठक, सुनिल पोपळे किरण नारद, महेश उपरे, सुशिल मोहिते व अक्षय राऊत यांनी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. त्यातील सुशिल मोहिते यांनी तर वरीष्ठांसह राजकीय नेत्यांचे उंबरठ झिजविले, त्यामुळे बदली आदेश रद्द करण्यात आला असल्याची पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागात चर्चा आहे.


दरम्यान बदली कुठेही झाली तरी पगार आहे तेवढाच मिळणार आहे, त्यामुळे बदली रद्द करण्यासाठी संबंधित कर्मचारी सगळ्याच प्रकारची ताकद नेमकी का लावत असतात ही गहन प्रश्‍न नसला तरी, चर्चेचा विषय झाला आहे. निविदा कामे आणि वर कमाईच्या लालसेने अनेक कर्मचारी बदली रद्द करण्यासाठी धडपडत असतात. तसेच क्रीम खाते व क्रिम पोस्ट मिळावी म्हणून अनेक कर्मचारी कार्यरत असतात. थोडक्यात पुणे महापालिकेच्या काही विशिष्ठ खात्यात पगारावर कुणीच काम करीत नाहीत, तर पगारासह पारितोषण घेण्याकडे अधिक लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
भवन रचना विभागातील वरील नमूद कर्मचार्‍यांनी बदलीचा पदावधी पूर्ण केला आहे, त्यावरही संबंधित कर्मचारी आहे त्याच खात्यात पुनः कार्यरत झाले आहेत. त्यामुळे या बदल्यांमध्ये काहीतरी मोठे गौडबंगाल झाले असल्याची चर्चा वेगात सुरू आहे. मार्च एंडींग जवळ येत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी बदलीसाठी उत्सुक नाहीत. परंतु शासनाचा बदलीचा आदेश मग पायदळी तुडविला जाणार आहे काय असाही सवाल उपस्थित होत आहे. ज्या कर्मचार्‍यांचा बदली अधिनियमानुसार पदावधी पूर्ण झाला आहे, त्या कर्मचार्‍यांची खाते व विभागातून तातडीने बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच पुणे महापालिकेत चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचे अनेक कर्मचारी नाराज असल्याचेही दिसून आले आहे.