Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या विधी विभागातील वर्षानुवर्ष कार्यरत सेवकांची बदली का होत नाही…श्रीमती चव्हाण यांच्याकडून पदाचा दुरूपयोग – बेकायदेशिरपणे पुणे महापालिकेतील चारचाकी वाहनाचा वापर –

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे महापालिकेच्या विधी विभागाचा महापालिकाद्रोही कारभार सुरू असून, निशा चव्हाण यांना मुख्य विधी अधिकारी या पदावर बसविण्याचे मोठे कारस्थान महापालिका निवडूकी आधी करण्याचे रचले जात आहे. दरम्यान निशा चव्हाण यांचे गुन्हे लक्षात घेता त्यांना मुख्य विधी अधिकारी पदावर बसवु नये अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान विधी विभागात वर्षानुवर्षे कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी असून त्यांना बदलीचा अधिनियम लागु नसल्याच्या अविर्भावात ते असतात. निशा चव्हाण यांच्याविरूद्ध मागील १० वर्षातील अनेक प्रकरणे असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे. (भाग – २)

भ्रष्ट आणि गैरव्यवहार प्रकरणे
पुणे महापालिकेतील विधी अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी पुणे महापालिकेतील टिडीआर, एफएसआय अभिप्राय व केसेस मध्ये नियमबाह्य व बेकायदेशीर घोळ केले असून त्यांची चौकशी केल्यास, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले असल्याचे दिसून येईल तसेच तितकेच आर्थिक नुकसान पुणे महापालिकेचे झाले आहे. उदा- कोथरूड टीडीआर घोटाळा.
दरम्यान आज राज्यातील टीईटी शिक्षक भरती घोटाळा, सैन्य भरती घोटाळा याच प्रमाणे पुणे महापालिकेतील इंजिनिअर सेवकांनी सादर केलेला इंजिनिअरची बोगस पदवी, पदोन्नती घोटाळा आज रोजी चौकशी सुरू आहे. या नुसार या इंजिनिअर घोटाळ्याची सर्व कागदपत्रे बाहेरच्या नागरीकांना स्वतःचे नाव मोठे होण्यासाठी श्रीमती चव्हाण यांनीच दिलेली असल्याची खबर आहे. त्यानुसार आज रोजी पदोन्नतीने इंजिनिअर झालेल्या सेवकांची चौकशी सुरू असून त्यास सर्वथा जबाबदार ह्या श्रीमती चव्हाण ह्याच असल्याचा आरोप तक्रारदारांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आलेला आहे.
ऍन्टी करप्शन कारवाई –
पुणे महापालिकेच्या विधी विभागात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अनेकदा कारवाया केल्या आहेत. ज्या खात्यामध्ये ऍन्टी करप्शन विभागाची कारवाई होते, तेथील जुने सर्व कर्मचारी हा तत्काळ बदलला जात होता. यापूर्वी पुणे महापालिकेमधील शिपाई ते अधिकारी यांच्या तत्काळ बदल्या केल्या जात होत्या. परंतु येथे दोन वेळा खात्यातील अधिकार्‍यांवर ऍन्टी करप्शन मार्फत कारवाई झाली तरी कोणत्याही सेवकांची बदली झालेली नाही हे विशेष आहे. या खात्यामध्ये मोठ मोठे टीडीआर किंग व त्यांचे एजंट सतत ये जा करीत असतात व ठराविक फाईल्स ह्या तत्काळ मंजुरी मिळविण्यासाठी श्रीमती चव्हाण यांचे प्रयत्न असतात. याबाबत अनेक उदाहरणे देता येतील. या खात्यातील वर्षानुवर्ष काम करणारे भ्रष्ट सेवक हे मोठ्या प्रमाणात लाखो कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करीत असून पैसे घेवून श्रीमती चव्हाण यांना देत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही मोठी साखळी असून, नागरीकांच्या फाईल्स अडवून लाखो रूपये घेत आहेत. तसेच कोणतेही काम वेळेत करीत नसून फक्त जो पैसे देईल त्यांचीच कामे प्राधान्याने करण्याकडे लक्ष दिले जाते. या सर्व प्रकरणांस श्रीमती चव्हाण याच जबाबदार असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे.


विधी विभागातील कर्मचारी –
पुणे महापालिकेच्या विधी विभागात वर्षानुवर्ष कार्यरत असणार्‍यांची मोठी संख्या आहेत. शासनाचा बदलीचा अधिनियम या खात्यात पाळला जात नाही. पुणे महापालिकेतील सर्व खात्यांना, बदलीचा अधिनियम, शासन व कायदयाच्या तरतुदी नुसार कार्यवाही बाबत अभिप्राय देत असतात, त्यांच्याच खात्यात मात्र शासनाचे नियम डावलले जात आहेत. गेल्या कित्येक वर्षात कोणत्याही कर्मचार्‍याची बदली झाली नाही. बदली झाली तरी ती कागदांवर असते. त्याची माहिती खालील प्रमाणे पहा –
१. श्रीमती स्वाती साळवी- उच्चश्रेणी लघुलेखक – ११ वर्ष
२. श्रीमती गोहर सय्यद – उच्चश्रेणी लघुलेखक – ११ वर्ष ( श्रीमती सय्यद ह्या लघुश्रेणी लघुलेखक म्हणून याच खात्यात काम करीत होत्या, व पदोन्नतीने पुनः याच खात्यात उच्चश्रेणी लघुलेखक म्हणून वर्ग २ चे प्रमोशन घेतले आहे. बदलीच्या नियमानुसार पदोन्नतीपात्र कर्मचार्‍यास आहे त्याच खात्यात पदोन्नती देता येत नाही असा नियम आहे. हाच नियम विधी विभागात मोडण्यात आलेला आहे.)
३. श्रीमती रमा चव्हाण – उपअधीक्षक – १० वर्ष
४. श्रीमती विद्या बागल – उपअधीक्षक – १० वर्ष ( श्रीमती विद्या बागल ह्या वरीष्ठ लिपिक म्हणून याच खात्यात काम करीत होत्या, व पदोन्नतीने पुनः याच खात्यात उपअधीक्षक म्हणून वर्ग २ चे प्रमोशन घेतले आहे. बदलीच्या नियमानुसार पदोन्नतीपात्र कर्मचार्‍यास आहे त्याच खात्यात पदोन्नती देता येत नाही असा नियम आहे. हाच नियम विधी विभागात मोडण्यात आलेला आहे.)
५. श्री. अमोल गोलांडे – लिपिक – १२ वर्ष
६. श्रीमती वंदना पाटसकर – लिपिक – १२ वर्ष
७. श्रीमती शारदा जाधव – शिपाई – १२ वर्ष
८. श्री. गोवर्धन साळुंके – शिपाई – १२ वर्ष
वरील १ ते ८ हे कर्मचारी वर्षानुवर्ष विधी खात्यात कार्यरत आहेत. हेच सेवक लाखो रुपये घेवून टीडीआर, एफएसआय, कोर्ट केसेस यांची प्रकरणे हाताळत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्यांच्या तक्रार अर्जात केलेला आहे. दरम्यान वेळप्रसंगी पैसे न मिळाल्यास, फाईल्स किंवा फाईल्स मधील कागदपत्र जाणुन बुजून गहाळ गायब केले जात आहेत. हेच सेवक दिवसभर याच कामांशिवाय दुसरे कोणतेही काम करीत नाहीत.
दिवसभर युट्युब, फेसबुक, गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे हीच कामे दिवसभर करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी या खात्यांमध्ये १५ ते २० टायपिस्ट कंत्राटी तत्वावर कामगार होते. हे ही नवलच आहे. येथील सेवक हे वर्षानुवर्षे येथेच प्रमोशन का घेतात, यांच्या मालमत्तेची तपासणी चौकशी ऍन्टी करप्शन व पोलीस यंत्रणेमार्फत झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.


खात्यातील फाईल्सवर श्रीमती चव्हाण यांचा कोंबडा –
निशा चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक शंका असून विधी खात्यांमध्ये येणार्‍या फाईल्स व कागदपत्रांवर श्रीमती चव्हाण या सह्या म्हणजे फक्त शासकीय भाषेत कोंबडा मारतात, त्या प्रकरणांवर शिपाई गोवर्धन साळुंके हे सविस्तर शेरे लिहून ती फाईल किती महत्वाची आहे ….. यामध्ये किती पैसे मिळू शकतात, याचा अंदाज बांधुन संबंधित एजंटकडे माहिती घेवून, खात्यातील संबंधित इतरांकडे देतात. शिपाई साळुंके हे काही दिवसांमध्ये लिपिक या पदावर पदोन्नती घेणार असल्याचे ज्ञात आहे, ते याच खात्यामध्ये पदोन्नती घेणार असल्याचे समजते. त्यामुळे उद्या याच खात्यात हे एखादया टीडीआरचा टेबल किंवा या सारखा पैश्यांचा टेबल घेवून बसल्यास नवल वाटावयास नको.
विधी अधिकारी पदांसाठी स्वतःच्या मर्जीतील वकीलांची वर्णी लावण्याचे प्रयत्न –
सहायक विधी अधिकारी, विधी अधिकारी या पदांवर ऍड राणी कांबळे, ऍड. संजय मुरकुटे, ऍड. लिना कारंडे यांचीच नेमणूक व्हावी यासाठी चव्हाण यांचे पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांना डावलुन यांच्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. उदया भविष्यात हेच पुणे महापालिकेतील पदांवर दिसले तर आश्‍चर्य वाटू नये. तसेच काही अधिकार्‍यांनी त्यांच्या मुलांची वर्णी देखील येथे लागावी म्हणून कंबर कसुन कामाला लागले असल्याची पुणे महापालिकेत जोरदार चर्चा आहे.


श्रीमती चव्हाण यांच्याकडून पदाचा दुरूपयोग – बेकायदेशिरपणे पुणे महापालिकेतील चारचाकी वाहनाचा वापर –
श्रीमती चव्हाण यांनी पदाचा दुरूपयोग करून बेकायदेशिरपणे पुणे महापालिकेच्या चार चाकी वाहनांचा वापर करण्यात आल्याचा तक्रार अर्ज २०१५ पासून प्रलंबित आहे. याबाबत देखील माहिती अधिकार कार्यकर्ते व नागरीकांनी तक्रारी केलेल्या आहेत. तथापी याबाबत देखील कोणत्याही प्रकारची चौकशी केली गेली नाही. श्रीमती चव्हाण यांच्या सध्याच्या पदानुसार व वेतनानुसार त्यांना कोणत्याही प्रकारचे वाहन व वाहन भत्ता देय नाही. असे असतांना देखील नियमबाह्यपणे पुणे महापालिकेच्या यंत्रणांचा बेमालूमपणे वापरत करीत आहेत. तत्कालिन पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार व राजेंद्र जगताप अति. आयुक्त यांनी श्रीमती चव्हाण यांना वाहन देण्याचे नाकारलेले आहे. तरीही श्रीमती चव्हाण स्वतःचे मनमानीपणे वाहन वापरत आहेत. तसेच प्रभारी अतिरिक्त पदावर असतांना देखील वाहन वापरता येत नाही. तरी देखील यांनी बेकायदेशीररित्या पुणे महापालिकेचे वाहन वापरत आहेत.


दरम्यान श्रीमती चव्हाण यांनी चारचाकी वाहन पुणे शहराच्या बाहेर वापरले प्रकरणी अडीज लाख रुपये दंड वसुल करण्याचे निर्देश हितेंद्र कुरणे यांनी कनिष्ठ अभियंता श्री. कमलेश शेवते यांना निदेश देण्यात आले आहेत तथापी कार्यवाही न केल्यामुळे श्री. शेवते यांच्यावर मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम ५६ (२) नुसार कारवाई करण्यात आलेली आहे, तरी आजपर्यंत श्रीमती चव्हाण यांच्याकडून पालिकेच्या झालेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीची नुकसान भरपाई केलेली नसल्याची माहिती आहे. (क्रमशः) भाग – ३ पहा