बाई… बाई… बाईऽऽऽ… डेक्कन पोलीसांना (अनाठाई) भलतीच घाईऽऽ, नको तिथं कारवाई… पाहिजे तिथं भलतीच आवई
डेक्कन…गुडलक चौक.. संभाजी पुतळा…एफसी रोड… भांडारकर आणि पोलीस स्टे ३६० डिग्रीरशियन, उज्बेकीस्तान, कजाकिस्तान, थायलंड, जम्मु, पंजाब, हरियाणा, युपी-एमपी आणि पुणंसगळा रगडापॅटीस आणि कोल्हापुरी मिळस झालीय बघ्घाऽऽऽ
पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीस ऍक्टीव्ह कधी होतात, रिऍक्ट कधी होतात. पोलीसांचे वर्तन पॉझिटीव्ह आणि निगेटिव्ह होेते तरी कधी हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पोलीसांचे काम कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे एवढेच आहे. समरी पॉवर असली तरी न्यायदानाचे काम हे न्यायालयामार्फतच होत असते. कायदा सुव्यवस्था सांभाळत असतांना, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली स्वतःची वैयक्तिक दुकानदारी सुरू करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षापासून खात्यात सुरू आहे. जिथं अर्थपुर्ण व्यवहार होतात, तिथं पोलीस एकाएकी ऍक्टीव्ह होत आहेत. परंतु न्यायासाठी जे पोलीस चौकीची पायरी चढतात त्यांना मात्र पोलीस रिऍक्ट होताना दिसत नाहीत. ...









