घरफोडी, दरोडा, सायबर क्राईम, संगनमताने लुट आणि फसवणूकीने पुणे शहर दणाणून गेले, जबरी दरोड्याने आठवडा गाजला
पुणे/दि/ प्रतिनिधी/मोबाईलवरील व्हॉटसऍप, फेसबुक ची चॅटींग, सुशांतसिंह, कंगणाबाई काय म्हणाली, राऊत- फडणवीस भेटी, हाथरस मधील राजपुत्र व राजकन्येवरील पोलीसी वर्तणूक या सारख्या घटनांनी आठवडा गाजत असतांना, पुणे शहरातील जबरी दरोडे, सायबर क्राईम, घरफोडी, संगनमताने लुट व फसवणूकीने पुणे शहरातील आठवडा दणाणून गेला आहे. जबरी दरोड्याने संपूर्ण आठवडा गाजला आहे. आठवड्याची सुरूवातच फरासखाना पोलीस स्टेशनने सुरू केली. फरासखाना हद्दीतील कसबा पेठेत भर सोमवारी दरोड्याची बातमी आली. सोमवार ते रविवार पर्यंत शहरात दरोड्याशिवाय दुसरे काहीच नाही.
पुणे शहरात वास्तवात काय चालले आहे त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न असतो. सर्वसामान्यांच्या जीवनाशी ज्यांचा कोणताही संबंध नाही त्या बातम्या प्रसारित करून, जनतेचे लक्ष विचलित करायला आमचा हा काही आयटी सेल नाही. किंवा भांडवलदारी वृत्तपत्र वा मिडीया नाही. जे भांडव...









