Thursday, June 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पोलीस क्राइम

गे डेटिंग ॲपवर ओळख बनवून पुण्यात तरुणाची लूट, एटीएममधून पैसे काढून दागिनेही हिसकावले

गे डेटिंग ॲपवर ओळख बनवून पुण्यात तरुणाची लूट, एटीएममधून पैसे काढून दागिनेही हिसकावले

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/समलैंगिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या डेटिंग ॲपचा गैरवापर करत तरुणांना जाळ्यात ओढून लूटमार करणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ॲपवर ओळख वाढवून एकट्या ठिकाणी बोलावणे, धमकावणे, मारहाण करणे आणि एटीएममधून पैसे काढणे असा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आणला आहे. डेटींग ॲपवरुन संपर्क करुन त्यास डेटिंग करीता रात्री मोकळ्या मैदानामध्ये बोलावुन सदर ठिकाणी लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएम वरुन पैसे काढुन घेतल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहिजे आरोपी नामे राहिल शेख यांच्या घराचे जवळ ए.जे कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु. पुणे येथुन आरोप...
इन्स्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात अडकाविणाऱ्या विधीसंघर्षित बालिकेस युनिट 3 ने केली अटक

इन्स्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात अडकाविणाऱ्या विधीसंघर्षित बालिकेस युनिट 3 ने केली अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/इन्टाग्राम वरून प्रेमाच्या जाळ्यात अडकावुन खेडशिवापुर येथे बोलावून, पुढे त्याचे पर्यावासन खुनात झालेल्या व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका विधीसंघर्षित बालिकेस गुन्हे युनिट 3 च्या पथकाने अतिशय शिफाफीने अटक केली आहे. पुणे शहराला हादरवुन सोडणाऱ्या गुन्ह्याचा तपास युनिट 3 च्या पथकाने केला आहे.गुन्ह्याची हकीकत अशी की, 9 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता वारजे, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पोलीस अमंलदार अमोल काटकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 375/2025 भारतीय न्याय संहिताचे कलम 103, 137 (2) अन्वये दाखल असले...
शनिनगरातील 23 वर्षीय युवकाकडून पिस्टल व जीवंत काडतुस जप्त,

शनिनगरातील 23 वर्षीय युवकाकडून पिस्टल व जीवंत काडतुस जप्त,

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील जांभुळवाडी रोड, शनिनगर येथील एक 23 वर्षीय युवक एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूसासह स्वामी नारायण मंदिरासमोर, ओंकार लॉज जवळील सर्व्हीस रोडवरील मोकळ्या मैदानात थांबला असतांना, क्राईम युनिट 3 च्या पथकाने शिताफीने जप्त करून त्याला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंगलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता नऱ्हे पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, नादेंड सिटी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत नवले ब्रिज येथे आले असताना, पोलीस अमंलदार किशोर शिंदे व पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम रोहित अनिल संगम, वय 23 वर्ष, रा. जांभुळवाडी रोड, शनिन...
पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे पुणे महानगरपालिका निवडणुक 2026 च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने प्रतिबंधक कार्यवाही करीता पेट्रोलिंग करत असताना सुमारे 25 लाख रुपयांचा मॅफेड्रोन जप्त केला आहे. दरम्यान मागील काही काळात याच पुणे शहरात सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा एमडी जप्त केला होता. आता देखील जागोजाग अंमली पदार्थांवर कारवाई केली जात असली तरी, पुणे शहरात मेफेड्रॉन (एम.डी), गांजा, चर्रस, अफीम सारखे अंमली पदार्थ सहज मिळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते की, ज्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळुन येतील, त्या पोलीसांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान पुण्यात बहुतांश ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असतांना, आता का कारवाई केली जात ना...
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी दारूचा महापुर

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी दारूचा महापुर

पोलीस क्राइम
निवडणूक- पुणे महापालिकेची,हातभट्टी - सहकारनगर पोलीसांचीचंगळ आहे, कार्यकर्त्यांची… नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. पुणे शहरात निवडणूकीचा ज्वर पसरला असुन सर्वत्र लोकशाहीचा महाउत्सव सुरू आहे. गल्लीबोळातील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते अंग झटकुन प्रचारात सहभागी झाले आहेत. दरम्यान यात सहकारनगर पोलीसांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश झोपडपट्टयांमध्ये हातभट्टी दारूची खुलेआम विक्री आणि जागेवर बसुन पिण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. कार्यकर्ते कुठून फिरून आले की, एक मग्गा उचलायचा आणि थेट तोंडाला लावायचा… सोबतीला वजडी-पाव आणि तिखट मिठ लावलेला हरभरा… पुणे महापालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहे. मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका झाल्या, परंतु पुणे ...
गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह बालगुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद

गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह बालगुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात दिवसेंदिवस कमरेला बंदुक लावण्याची हौस अनेकांना होत आहे. त्यातल्या त्यात नवशिक्या गुन्हेगारांना तर कट्टा बाळगण्याची हौस तर अधिकच वाढली असल्याचे पोलीस अटक सत्रावरून दिसून येत आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनेक पोलीस स्टेशन हद्दीत एक/दोन सराईत गुन्हेगारांकडून, हौशी आणि त्यातल्या त्यात नवशिक्या गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत राऊंड पकल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत देखील एका सराईत विधीसंघर्षित बालकाकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत राऊंड हस्तगत करून त्याला अटक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे हद्दीत पेट्रोलींग करीत अ...
पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 मधील रेकॉर्डवरील 18 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी केले तडीपार, अबतक… 150 गुन्हेगारांवर धडक कारवाई

पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 मधील रेकॉर्डवरील 18 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी केले तडीपार, अबतक… 150 गुन्हेगारांवर धडक कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी तसेच आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने परिमंडळ 5 हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते, म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 56 प्रमाणे 18 सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीतुन 02 वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.आरोपीचे नावे खालील प्रमाणे आहेत. यात पोलीस स्टेशनचे नाव, गुन्हेगाराचे नाव, केलेले गुन्हे अनुक्रमे नमुद आहेत. 1) काळेपडळ पोलीस स्टेशन- कानिफनाथ शंकर घुले, वय 49 वर्षे, रा. भैरोबा मंदीरजवळ, महंमदवाडी, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत.) 2) काळेपडळ पोलीस स्टेशन -प्रमिला सर्विन काळकर, वय 41 वर्षे, रा. कृषीनगर, गल्ली नं. 13. महंमदवाडी, ...
डावा हात मनगटापासून तोडणाऱ्या विधीसंघर्षित फरार बालकास गुन्हे युनिट 1 ने केले शिताफीने जेरबंद,

डावा हात मनगटापासून तोडणाऱ्या विधीसंघर्षित फरार बालकास गुन्हे युनिट 1 ने केले शिताफीने जेरबंद,

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 22जुलै 2024 रोजी मोदी पेट्रोलपंप जवळ, मंगळवार पेठ, पुणे येथून फिर्यादी हे रोडने जात असताना पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून 08 ते 09 इसमांनी मिळून धारधार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये फिर्यादी यांचा डावा हात मनगटापासून वेगळा झाला होता. ह्या गुन्ह्याची नोंद फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.149/2024. भा. न्या.सं. कलम 109, 189(2), 189 (4), 191 (2). 191 (3). 190. 126 (2), 352.351 (3),115(2), आर्म ॲक्ट कलम 3(25) 4(25) महा पो कायदा कलम 37 (1) (3) सह 135 क्रिमीनल लॉ ॲमेंडमेंट ॲक्ट कलम 7 महा संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1) 3 (2), 3 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान यापुर्वी सदर गुन्ह्यात एकुण 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. विधीसंघर्षित बालक एक वर्षापासून फरार होता. दरम्य...
मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/देवा उर्फ देविदास पालते वय 25 वर्ष मूळ राहणार नांदेड जिल्हा सध्या रा. धायरी याने दुसऱ्याचा मोबाईल फोन त्याला न विचारता घेतल्याने, या तरुणास जबरी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील धायरी येथे घडली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, स.नं. 30/13, साई धाम, त्रिनेश इंजिनिअरींग कंपनीचे वर पहीला मजला प्रभात प्रेस रोड, धायरी पुणे येथे एक इसम हा जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर यांनी लागलीच घटनास्थळी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी इसम नामे देवा उर्फ देविदास पालते (वय 25 वर्षे ) रा.मु.पो.तागयाल पो. कलबर देवाची ता. मुखेड जि. नांदेड (सध्या स.नं. 30/13, साई धाम, जिनेश इंजिनिअरींग कं...
तडीपार आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वावर, गुन्हे युनिट 3 ने कारवाई करीत तडीपारास केले जेरबंद

तडीपार आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वावर, गुन्हे युनिट 3 ने कारवाई करीत तडीपारास केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात तडीपार आरोपींचा वावर असल्याचे पुन्हा समोर आले आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपी त्याच्या पत्नीस सिंहगड रोड येथे कामावर सोडण्यासाठी येत असतो अशी माहिती मिळाल्याने गुन्हे युनिट 3 कडील पथकाने त्याचा अचुक शोध घेवून त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. पो स्टे हददीमध्ये गंभीर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणून अभिलेखावरील तडीपार, मोक्का, पाहीजे आरोपी यांचा शोध घेवून कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी मुफजल आदेश दिल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणेकामी गुन्हे शाखा युनिट 3 मधील सपोफौ शिंदे, पो हवा कैलास लिम्हण, पो हवा अमोल काटकर, पो हवा किशोर शिंदे, पो.शि योगेश झेंडे, पो.शि तुषार किंद्रे असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पो हवा कैलास लिम्हण व पो शि किंद्रे यांना सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तडीपार आरोपी नामे गणेश दिल...