Sunday, May 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

राहुल गांधींचे आश्वासन हा जुमलाचः मायावती

राहुल गांधींचे आश्वासन हा जुमलाचः मायावती

राजकीय
Mayavati-rahul-Gandhi लखनौ/दि/                   लोकसभा निवडणुकीनंतर केद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्यास देशातील सर्व गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना राबवली जाईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी छत्तीसगडमध्ये केली होती. या घोषणेवर बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या १५ लाख रुपयाच्या घोषणेप्रमाणे राहुल गांधीची गरीबी हटाओ योजना ही जुमलाच आहे.           कॉंग्रेस आणि भाजपा दोघेही अपयशी ठरले आहेत. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असाही आरोप मायावती यांनी केला. सोमवारी राहुल गांधी म्हणाले होते नव्या भारताची उभारणी करणे अशक्य आहे. त्यामुळे केंद्रात सत्तेत आल्यास कॉंग्र...
भाजप सरकारचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नः आ. शरद रणपिसे

भाजप सरकारचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नः आ. शरद रणपिसे

राजकीय
Congress-vardhapan-din मुंबई/दि/  कॉंग्रेस पक्षाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त केले व देशात लोकशाहीची बीजे रोवून ती बळकट केली. पण विद्यमान भाजप सरकार देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला पराभूत करून देशाचे संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे यांनी केले.       कॉंग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनामित्त आज महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. रणपिसे बोलत होते.       ते पुढे म्हणाले की, विद्यमान सरकारच्या काळात देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. जाती- जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. राजकीय फायद्यासाठी ध्रुवीक...
कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी, नेते नको-आंबेडकर

कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी, नेते नको-आंबेडकर

राजकीय
Prakash-Ambedkar अकोला/दि/  मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न कॉंग्रेसने निरंतर प्रलंबित ठेवला आहे. कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी आहेत. मात्र, त्यांना मुस्लिमांचे नेते नको आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. अकोला येथे मुस्लीम आरक्षण महामोर्चादरम्यान ते बोलत होते.       कॉंग्रेस मुस्लिमांचा फक्त निवडणुकीसाठी उपयोग करीत आहे. त्यामुळे त्यांना १९ टक्के आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेसने कुठलीच पावले उचलली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले. मात्र, १९ टक्के असलेल्या मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदरांनी कुठलाच दबाव आणला नसल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी क...
केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले उशिरा शहाणपण

केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले उशिरा शहाणपण

राजकीय
Upendra-Kushwah पुणे: विकासाच्या अजेंड्यावर सरकार असेल, अशी चर्चा केली गेली. मात्र सरकार आल्यावर विकासाऐवजी भाजपने त्यांचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. त्यांचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. तो आमच्यासाठी नव्हे, तर देशातील लोकांसाठीही योग्य नाही.त्यामुळे सरकारमधून बाहेर पडलो अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले बिहारमधील ’राष्ट्रीय लोक समता पार्टी’चे नेते उपेंद्र कुशवाह यांनी केली.       छगन भुजबळ यांच्यासमवेत कुशवाह यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कुशवाह विरोधकांच्या गोटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत कुशवाह म्हणाले, पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेटलो. भुजबळ गेल्या १२ वर्षांपासून माझे मित्र आहेत. भुजबळ यांच्याशी कौटुंबिक संबंध असून, राजकारणात त्यांचे...
बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, संविधान वाचवणे हेच आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान!

बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, संविधान वाचवणे हेच आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान!

राजकीय
जयपुर/ राजस्थान/ दि/ आपल्याला केवळ अर्धे स्वातंत्र्य मिळाले असून संविधान वाचवणे, हेच आपल्यापुढील सध्या सगळ्यात मोठे आव्हान आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.                 राजस्थानमधील फलोडी येथे संविधान बचाव, देश बचाव सभेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सत्तेसोबत राजेशाहीत आपला कोणताही संबंध नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार देऊन प्रत्येकाचा संबंध हा सत्तेशी जोडला आहे. क्रांतीसोबतच प्रतिक्रांतीही होत असते, हे लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हीच बाब सांगितली आहे. आताही प्रतीक्रांतीचा प्रयत्न सुरु आहे. ही प्रतिक्रांती मिटविण्याचे आपल्यापुढे आव्हान आहे. शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो शि...
बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली शस्त्रास्त्रे सरकारने जप्त करावी. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके ४७ रायफल कशी आली, असा सवाल करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी  देवेंद्र फडणवीस सरकारला सवाल केला आहे, की सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करणार की नाही. संघाकडे असलेली शस्त्रे जप्त केली नाही तर महाराष्ट्रात चक्का जाम करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.                 रास्वसंघ दरवर्षी दसयाला नागपूरमध्ये शस्त्रपूजन करत आले आहे. त्यांच्या या शस्त्रपूजनाला शांतताप्रिय संघटनेने विरोध केला आहे. यावि...
संभाजी महाराजांनंतर आता  संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण

संभाजी महाराजांनंतर आता संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण

राजकीय
मुंबई/दि/प्रतिनिधी/                 छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आता संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीबद्दल एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले आहे. आता तर हद्द झाली, सर्व शिक्षा अभियानातली ही पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून घ्या. संबंधितांवर कारवाई कराच, पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जबाबदारी पेलवत नसेल तर राजीनामा द्यावा,  असा हल्लाबोल अजितदादा पवार यांनी केला.                 सर्व शिक्षा अभियानाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा वाद शमत नाही तोच, या अभियानातील आणखी एका पुस्तकात संत तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याची...

सत्तेतून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा – विखे पाटील

राजकीय
मुंबई/दि/                 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दात समाचार घेतला असून, अगोदर या सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले आहे.                 कॉंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. या विशाल सभेला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्यावर बरसताना ते म्हणाले की, शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपयर्ंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी आहे, शेतकरी विरोधी असे व...
राफेल घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; प्रशांत भूषण व शौरी यांची मागणी

राफेल घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; प्रशांत भूषण व शौरी यांची मागणी

राजकीय
नवी दिल्ली/ दि/                 राफेल करारात झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात यावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केली आहे. सीबीआय मुख्यालयात जाऊन त्यांनी गुरुवारी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची भेट घेतली.                 ’हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीने यापूर्वीच सुखोईसारख्या ७ अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती केलेली आहे. सरकार सध्या त्यांच्या स्वत:च्या भुमिकेवरच ठाम नाही. एक खोटे लपवण्यासाठी त्यांना अनेक खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडाव्या लागत आहेत, असे अरुण शौरी यांनी म्हटले.     ...
अवैध व्यवसायांच्या प्रतिबंधासाठी अचानक तपासणी करण्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

अवैध व्यवसायांच्या प्रतिबंधासाठी अचानक तपासणी करण्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

राजकीय
मुंबई/दि/  राज्याच्या ग्रामीण भागातील असामाजिक तत्व व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांना त्या त्या भागात अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.                 येत्या आठवडाभरात प्रत्येक पोलीस परिक्षेत्रात पोलीस महानिरीक्षकांनी ही अचानक भेटी देऊन प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद झाले आहे की नाही ते पाहणे. तसेच शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळा येथे विशेषतः मुलींच्या बाबतीत घडणार्‍या घटनांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांमार्फत सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.     ...