Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

वंचित बहुजन आघाडीकडे… विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांचा उमेदवारी अर्ज दाखल

वंचित बहुजन आघाडीकडे… विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांचा उमेदवारी अर्ज दाखल

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/        ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडे राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांनी उमेदवारी  मागितली आहे. शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा सेना या पक्षातील आजी माजी आमदार, महापालिका-जिल्हा परिषद सदस्य तसेच काही नाराज नेत्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समिर कुलकर्णी यांना वंचित कडून         उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केल्याची माहिती वंचित आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांनी दिली आहे.        वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील मुलाखती झाल्या आहेत. शनिवार व रविवार पुण्यासह सातार्‍याती...
उध्दवा.. अजब तुझा कारभार तक्रारी खरीप विमा भरपाईच्या, सेनेचा मोर्चा रब्बीच्या कंपनीवर!

उध्दवा.. अजब तुझा कारभार तक्रारी खरीप विमा भरपाईच्या, सेनेचा मोर्चा रब्बीच्या कंपनीवर!

राजकीय
नाशिक/दि/ खासगी विमा कंपन्यांना ‘ठाकरी’ इशारा देत राज्यातील शेतकर्यांच्या हिताचा कळवळा दाखवणार्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा मोर्चा ‘आग सोमेश्‍वरी अन् बंब रामेश्‍वरी’ ठरला आहे.        ‘मातोश्री’पासून सोयीच्या अंतरावर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर बुधवारी ठाकरेंनी मोर्चा काढून १५ दिवसांत शेतकर्यांचे पैसे न दिल्यास पेकाटात लाथ घालण्याचा इशारा दिला आहे. परंंतु पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या राज्यातील शेतकर्यांच्या सर्वाधिक तक्रारी असताना शिवसेनेने मोर्चा काढलेली कंपनी फक्त रब्बी हंगामासाठी असल्याचे पुढे आले आहे.        परभणीसह सहा जिल्ह्यांतील शेतकर्यांना पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारींचे निवेदन उध्...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्या!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्या!

राजकीय
ajit pawar1 मुंबई/दि/  देशभरात ईव्हीएम घोटाळ्याचे वादळ उठले असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही ईव्हीएमविरोधात सूर लावला आहे. लोकशाही टिकून राहावी आणि लोकांच्या विश्‍वासाला तडा जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणी केली आहे.        केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेत नाराजी असतानाही सतराव्या लोकसभेत एकट्या भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्याने हा ईव्हीएमचा विजय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यात आता पवार यांनी आज ट्विट करून ईव्हीएमला विरोध केला. ईव्हीएममध्ये तांत्रिक फेरफार केली जाते, अशी नागरिकांच्या मनात शंका आहे. जगातील प्रगत देशांमध्ये निवडणूक मतपत्रिकेवर घेतल्या जातात. त्यामुळे विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेवरच घेण्यात यावी, अशा मागणीचे ट्विट पवार यांनी केले आहे. ...
बक्षिसाऐवजी शिक्षा -‘चांद्रयान २’ साठी झटणार्या इस्त्रोतील शास्त्रज्ञांचा पगार सरकारने कापला

बक्षिसाऐवजी शिक्षा -‘चांद्रयान २’ साठी झटणार्या इस्त्रोतील शास्त्रज्ञांचा पगार सरकारने कापला

राजकीय
मुंबई/दि/         एकीकडे इस्त्रोचे शास्त्रज्ञ महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चांद्रयान २’ च्या उड्डाणाची तयारी करत आहेत. या मोहिमेतून देशाचे नाव जगाच्या नकाशावर आणि अंतराळावर कोरण्याचा प्रयत्न इस्त्रोचे वैज्ञानिक अन् इंजिनिअर्स करत आहेत. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने इस्त्रोतील शास्त्रज्ञांच्या पगारात कपात केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने १२ जून २०१९ रोजी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार १९९६ पासून मिळणार्या दोन अतिरिक्त वेतनवाढ म्हणजेच देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.        देशाच्या अंतराळ जडणघडणमध्ये इस्त्रोचा सिंहाचा वाटा आहे. अग्नि क्षेपणास्त्र असेल, चांद्रयान मोहीम असेल किंवा चांद्रयान २ च्या लॉंचिंगची तयार असेल. इस्त्रोचे शास्त्रज्ञ दिवस-रात्र एक करुन देशाचे नाव जगात रोशन करत आहेत. देशाची अंतराळ ताकद...
खडसे कार्यकर्त्यांना म्हणाले, मला बाजूला केलं तसं तुम्हांला केलं जाईल

खडसे कार्यकर्त्यांना म्हणाले, मला बाजूला केलं तसं तुम्हांला केलं जाईल

राजकीय
khadse khalsa रावेर/ दि/ रावेर येथ झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना वापरून फेकून देतात बाहेरील लोकांना सन्मान मात्र निष्ठावंताची अवहेलना होत आहे अशी मनातील खदखद पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. माझे मंत्रिपद गेल्याने जळगाव जिल्ह्याचे मोठं नुकसान झाल्याचं वक्तव्य खडसेंनी जाहीर कार्यक्रमात केलं.        विधानसभेत मी मांडलेल्या मुद्द्यांबाबत सरकारला एकही उत्तर देता आले नाही, स्पष्टीकरण दिले नाही. आपल्याला आपला पक्ष टिकिट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे. असं वक्तव्य केल्याने खडसेंना नेमकं काय म्हणायचं आहे याचं राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढण्यास सुरवात झाली आहे.        दुसर्‍या पक्षातील लोकांना भाजपमध्ये मंत्रीपदे देऊन बाहेरच्यांना सन्मानाची वागणूक मिळत आहे मात्र निष्ठ...
राज्यातील प्रस्थापित कॉंग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडी भाजपा -सेना आघाडी व स्वाभिमानीला वंचितची धोबीपछाड…देशात चहावाला आणि महाराष्ट्रात कपबशीवाला मोठा फॅक्टर

राज्यातील प्रस्थापित कॉंग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडी भाजपा -सेना आघाडी व स्वाभिमानीला वंचितची धोबीपछाड…देशात चहावाला आणि महाराष्ट्रात कपबशीवाला मोठा फॅक्टर

राजकीय
congress. ncp.vanchit पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/      मध्यवर्ती शासनकर्त्यांच्या चूकीच्या धोरणाविरूद्ध देशात वेगवेगळ्या पक्षांची आघाडी झाली. राज्यातही प्रस्थापित पक्षांनी आपआपली आघाडी महाआघाडीची स्थापना केली. यातही वर्षानुवर्षे सत्ता, संपत्तीपासून दूर असलेल्या समाजघटकांना विचारात न घेता, निव्वळ सत्ता मिळविण्यासाठी आघाड्या तयार झाल्या. वर्षानुवर्षे सत्ता आणि  संपत्ती धारण करणार्‍यांनाच पुनः पुनः उमेदवारी देण्यात आली. याच काळात राज्यातील सत्ता, संपत्ती, शिक्षण, सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या वर्गांना बरोबर घेवून वंचित बहुजन आघाडीची स्थापना ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. धनगर, मुस्लिम, वंजारी, सारख्या ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी समाजातील दुर्लक्षित व वंचित समाजातील कार्यकर्त्यांना लोकसभेची उमेदवारी देवून, त्यांच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्ण...
… तर विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार – बाळासाहेब आंबेडकर

… तर विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार – बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
prakash amedkar मुंबई/दि/  विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत,  तर  निवडणुकांवर  बहिष्कार टाकणार,  अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनी बोलताना  घेतली आहे.  तसेच ईव्हीएममुळेच वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा त्यांनी यावेळी केला.       याबाबत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की,  हे सरकार, निवडणूक आयोग ईव्हीएम वापरण्यात इंटरेस्टेड असेल तर आपण निवडणूक प्रक्रियेतच भाग घेऊ नये. बॅलेट येणार असेल तर आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सहभागी होऊ,  ही भूमिका महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी.      बॅलेट आलेच पाहिजे यावर मी ठाम आहे आणि नाही आले, तर विधानसभा नाही लढणार. आता माझे हे मत आमच्या पक्षात कॅरी होईल का हे मी आता ठामपणे सांगू शकत ना...
ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणे हे समाजासाठी घातक-भुजबळ

ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणे हे समाजासाठी घातक-भुजबळ

राजकीय
Samata-Parishad मुंबई/दि/  केंद्र सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबत न्या. रोहिणी आयोग नेमून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात ओबीसींची जनगणना झाली नसताना कोणत्या आकडेवारीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे ठरविले आहे असा सवाल उपस्थित करत ओबीसींचे तीन तुकडे हे ओबीसींसाठी अत्यंत घातक असल्याचा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी करत पुढील काळात ओबीसी  आरक्षणाप्रमाणे इतर आरक्षणाबाबतही असे निर्णय होण्याचे चित्र आहे असे सांगितले. मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची आढावा बैठक मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.      यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींचे तीन तुकडे करण्याविरोधात सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. केंद्र सरकारने न्या.रोहिणी आयोग नेमून आरक्...
तुमच्या पक्षाचे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच विचार करू

तुमच्या पक्षाचे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच विचार करू

राजकीय
सोलापूर : ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची चर्चा आहे.     सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या संघटनासाठी नेत्यांनी गावोगावी बैठका घेण्यात सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता लाखोंची गर्दी जमवायची कशी, असा पेच जानकर आणि आठवले यांच्यापुढे निर्माण झाल्याची चर्चा आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने रिपब्लिकन पक्षाला दिलेली आश्‍वासने न पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.     जानकर यांनी धनगर आरक्षणासाठी सरकार दरबारी काहीच हालचाली केल्या ...
वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर, सर्वाधिक धनगरांना ६ जागा, बौद्धांसह २१ जातींना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर, सर्वाधिक धनगरांना ६ जागा, बौद्धांसह २१ जातींना उमेदवारी

राजकीय
Prakash-Ambedkar मुंबई/दि/ प्रतिनिधी/     मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या रेकॉर्डब्रेक जाहीर सभा झाल्या.लोकसभा निवडणूकीच्या तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवार निश्‍चित केले. दरम्यान मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वेगवेगळ्या समाजाला सत्तेच्या जवळ नेण्याची महत्वकांक्षा बाळगलेल्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपली पहिली यादी जाहीर केली. जाहीर केलेले उमेदवार हे महाराष्ट्रातील त्या त्या जिल्ह्यात वर्षानुवर्षे राजकीय सामाजिक क्षेत्रात कामे करीत आलेली आहेत. परंतु त्यांना संधी मात्र कोणत्याही पक्षाने दिली नाही. अशाच उमेदवारांना बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे.     तब्बल ३६ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१  व...