Wednesday, May 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

The gift of the market committee with the police to the moneylender-gamblership in the market yard # मार्केटयार्डातील सावकारी-गॅम्बलरशाहीला पोलीसांसह बाजार समितीचे वरदान

The gift of the market committee with the police to the moneylender-gamblership in the market yard # मार्केटयार्डातील सावकारी-गॅम्बलरशाहीला पोलीसांसह बाजार समितीचे वरदान

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. ५ यांच्या कार्यक्षेत्रातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार आणि क्लब सारखे गॅम्बलिंगचे प्रकार सर्रास झाले आहेत. जिथं कुठं जावे तिथे जुगार अड्डे फुल्ल वाहत असतांना दिसत आहेत. पोलीसांचा कुठेही धाक दिसत नाही. बाजार समिती आवारात एखादे वाहन लावले तर बाजार समिती २०० रुपयांचे दंड आकारते. पण जुगार अड्ड्यांबाबत मात्र मौन बाळगुन आहे. थोडक्यात मार्केटयार्ड परिसर व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दतील जुगारांना पोलीसांचे वरदान असल्याचे दिसून येत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाचा क्रमांक लागतो. त्याच मार्केटयार्डाला मटका, जुगारासह अवैध धंद्याचे ग्रहण लागले आहे. क्लबच्या माध्यमातून तर मार्केटयार्डातील सर्व खाजगी सावकर एकत्र येत आहेत. तसेच बेकायदा सावकारी करणार्‍यांकरून तर ...
Ambedkarite organizations demand to file charges against Rohan Malwadkar and his associates # रोहन माळवदकर व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची आंबेडकरी संघटनांची मागणी

Ambedkarite organizations demand to file charges against Rohan Malwadkar and his associates # रोहन माळवदकर व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची आंबेडकरी संघटनांची मागणी

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/ऍड. रोहन माळवदकर यांनी प्रकाशित केलेले तथ्यहिन भिमा कोरेगाव लढाई एक वास्तव या शिर्षकाचे पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. सदर बाबत प्रकाशित वृत्तानुसार ऍड. माळवदकर यांनी भिमा कोरेगावची लढाईबाबत दलित समाजाकडून चुकीचा इतिहास पसरविला जातो असा आरोप केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तरी या संदर्भात दि. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ येथे उद्भवलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्‍वभूमी पाहता, अद्याप पर्यंत दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र व देशभर उमटत आहेत. अशा परिस्थितीत श्री. माळवदकर यांनी लिहलेले पुस्तक हे समाजातील दोन जाती मध्ये जातीयव्देष व जातीय तेढ निर्माण करणारी असून विशेषतः अनु. जाती दलित वर्गाविरूद्ध समाजामध्ये व्देषाची भावना, वैर भावना तसेच हीन भावना पसरवून तेढ निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे व तसा प्रयत्न करणे, असा गंभिर समाजद्रोही अपराध केलेला आहे. अशा परि...
The burden of sugarcane workers and third parties on the wrists of the social welfare department # समाजकल्याण खात्याच्या मानगुटीवर ऊसतोड कामगार आणि तृतीयपंथीयांचा बोजा

The burden of sugarcane workers and third parties on the wrists of the social welfare department # समाजकल्याण खात्याच्या मानगुटीवर ऊसतोड कामगार आणि तृतीयपंथीयांचा बोजा

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/समाजकल्याण आयुक्तालयाकडून राज्यातील अनुसूचित जाती, तत्सम मागास घटकातील नागरीकांच्या कल्याणासाठी योजना राबविल्या जातात. तसेच शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमांतून त्यांचे हितरक्षण केले जाते. परंतु सध्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांपासून समाज कल्याण खात्याच्या माथी ऊसतोड कामगार महामंडळ व तृतीयपंथी यांच्यासाठी निधी दिली असून तो निधी देखील समाज कल्याण खात्यातुन देण्याचे आदेश केल्यामुळे आधीच समाज कल्याण खात्याला निधीची तरतुद कमी असतांना, त्यात ऊसतोड व तृतीयपंथींचा बोजा शासनाने टाकण्यात आला आहे. राजकीय मंडळी जाहीर सभेत घोषणा करतात आणि त्याचे पुढे जाऊन योजनांमध्ये रूपांतर केले जाते. परंतु त्यासाठी निधीची तरतुद करीत असतांना, स्वतंत्रपणे निधी देण्याऐवजी तो निधी समाज कल्याण खात्यातून देण्याचे बंधन ठेवले जाते. त्यामुळे आहे त्या योजनांसाठी निधीची कमतरता ...
Godbengal only changes in Pune Municipal Corporation’s building design! # पुणे महापालिकेच्या भवन रचना मधील बदल्यांच गौडबंगाल!

Godbengal only changes in Pune Municipal Corporation’s building design! # पुणे महापालिकेच्या भवन रचना मधील बदल्यांच गौडबंगाल!

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील सर्वच संवर्गातील बदल्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. काही अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या, विहीत कालावधी पूर्ण होण्याच्या आतच बदली आदेश काढला जातो. काही कर्मचार्‍यांना तर दोन तीन महिन्यांतच एका खात्यातून दुसर्‍या खात्यात बदली केली जाते. परंतु काही कर्मचार्‍यांची बदलीचा दोन पदावधी पूर्ण केला तरी बदली केली जात नाही. केवळ टेबलची अदला बदल केली की, बदलीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखविण्यात येत आहे. थोडक्यात काही विशिष्ट कर्मचार्‍यांच्यावर विशिष्ट दया दाखविली जात आहे, तर काही कर्मचार्‍यांच्या बाबतीत दुराभाव दर्शविण्यात येत आहे. यामुळे पुणे महापालिकेतील बदल्यांमधील गौडबंगाल अधिकच वाढत चालले आहे.पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी दि. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी भवन रचना, अतिक्रमण अनाधिकृत बांधकामे व घनकचरा विभागातील कनिष्ठ अभियंता संवर्...
Attempt by Thackeray government to blunt atrocity law? # ऍट्रोसिटी कायदा बोथट करण्याचा राज्यातील ठाकरे सरकारचा प्रयत्न?

Attempt by Thackeray government to blunt atrocity law? # ऍट्रोसिटी कायदा बोथट करण्याचा राज्यातील ठाकरे सरकारचा प्रयत्न?

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/ऍट्रोसिटी ऍक्ट १९८९ व सुधारित २०१५ अंतर्गत दाखल जातीय अत्याचारांच्या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपअधीक्षक- सहायक पोलिस आयुक्त यांचे ऐवजी पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे सोपविण्यासंदर्भात गृह विभागाने दि १० जानेवारी २०२२ ला पोलीस महासंचालक मुंबई यांना पत्र पाठविले आणि नोटिफिकेशनचे प्रारूप मागितले. या प्रस्तावास विधी व न्याय विभागाची सहमती आहे असेही पत्रात नमूद केले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाची प्रस्तुत कार्यवाही अधिकाराबाहेरील व बेकायदेशीर असून कायद्याचा उद्देशच निष्प्रभ करण्यारी आहे. त्यामुळे ह्यास आमचा तीव्र विरोध असल्याचे मत माजी सनदी अधिकारी इ. झेड खोब्रागडे यांनी व्यक्त केेले आहे. ऍट्रोसिटी ऍक्ट मधील गुन्हे तपासणीचे सूत्र पोलिस निरीक्षक आणि सहायक पो निरीक्षक यांचेकडे सोपवून कायदा प्रवाहहीन करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप माजी ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – गजभिये

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – गजभिये

सामाजिक
पुणे/दि/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेसाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे, असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नामांतर आंदोलनातील लढ्यातील शहिदांना अभिवादन करून श्री. गजभिये यांनी नामांतर लढ्यातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. महासंचालक श्री. गजभिये म्हणाले, मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचा पाया रोवला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आजच्या दिवशी देऊन नामविस्तार करण्यात आला.यावेळी बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती स्मिता राऊत, श्री....
‘टेक फॉग’ ऍपच्या माध्यमातून भाजपाकडून फेक न्यूज आणि बीभत्स शिवीगाळ

‘टेक फॉग’ ऍपच्या माध्यमातून भाजपाकडून फेक न्यूज आणि बीभत्स शिवीगाळ

सामाजिक
नवी दिल्ली: ‘टेक फॉग’ नावाचे एक अत्याधुनिक व छुपे ऍप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरले जात असल्याचा दावा, स्वत: एक नाराज भाजप कर्मचारी असल्याचे सांगणार्‍या, Aरीींहळीहरीार०८ या निनावी ट्विटर अकाउंटने, एप्रिल २०२० मध्ये ट्विट्सच्या एका मालिकेद्वारे, केला होता. भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी, टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील प्रपोगंडा राबवण्याचे ण्याचे उद्दिष्ट या ऍपपुढे आहे, असेही दावा करणार्याने म्हटले आहे. एकप्रकारे त्याने भाजपाचा पर्दाफाश करत त्यांचा बेगडी मुखवटा टराटरा फाडला आहे. या ट्विटर हॅण्डलने टेक फॉग या ‘छुप्या ऍप’चा उल्लेख केला होता. हे ऍप ‘रिकॅप्चा कोड्स बायपास’ करून वापरकर्त्यांना ‘टेक्स्ट्स व हॅशटॅग ट्रेण्ड्स ऑटो-अपलोड’ करण्याची परवानगी देते, असेही म्हटले होते. अशा प्रकारच्या ऍपचा उल्लेख आल्य...
चवली न् पावली, चिल्लर खुर्दा, पुणे महापालिकेचा नाद छनाछन् एैका…

चवली न् पावली, चिल्लर खुर्दा, पुणे महापालिकेचा नाद छनाछन् एैका…

सर्व साधारण
बदली, पदोन्नतीतील पदस्थापनेत भ्रष्टाचार - गैरव्यवहारांना अति. आयुक्तांकडून राजमान्यता पुणे/दि/ प्रतिनिधी/महानगरपालिका निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करून नगरसेवक व्हायचे आणि सत्ता मिळवायची. सत्ता मिळाल्या नंतर पदाचा वापर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांसाठी करायचा. कॉंग्रेस राष्ट्रवादीची ही परंपरा भाजपा सेना या पक्षांनी जोपासली आहे. सत्तेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार हे नवे नसले तरी त्याला राजमान्यता देऊन त्याचा कुशलपणे वापर करण्याचे सुत्र सर्वच राजकीय पक्षांनी अंगिकारले आहे. त्यात आयएएस- आयआरएस संवर्गातील उच्चतम अधिकारी देखील सहभागी होत असतील तर दोष नेमका कुणाला दयायचा. शासनातील सर्व यंत्रणा कोरानाग्रस्त नव्हे तर भ्रष्टाचारग्रस्त झालेली आहे. वाळवीने एखादे झाड पोखरावे तसे पुणे महापालिकेला पोखरून खिळखिळे करण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या कामकाजाबाबत आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त तर ब्र शब्...
पुणे महापालिकेच्या भवानी पेठेवर कारवाई, सिंहगडावर मात्र एवढी दया कशासाठी….

पुणे महापालिकेच्या भवानी पेठेवर कारवाई, सिंहगडावर मात्र एवढी दया कशासाठी….

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या स्थापत्य विभागातील टेंडर महाघोटाळ्याने भ्रष्टाचार किती खोलवर रूजला असल्याचे दाखवुन दिले आहे. कारवाईच्या भितीने एका अभियंत्यांचा मृत्यू झाला. धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील एक उपभियंता आणि कनिष्ठ अभियंता निलंबित झाला. परंतु सिंहगड क्षेत्रिय कार्यालयातील प्रभाग क्र. ४२ मधील फाईल्स दक्षता विभागात धुळखात पडल्या असतांना, त्यांच्यावर मात्र कारवाईचे नाव नाही. असा भेदभाव का केला जात आहे असा सवाल सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते विचारत आहेत. पुणे महापालिकेतच्या भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाने काढण्यात आलेले टेंडर मध्ये कामे न करताच बिले अदा केल्याचे निदर्शनास आले. तसेच टेंडर नुसार करण्यात आलेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची, दर्जाहीन हीणकस कामे केल्याचेही चौकशीत आढळुन आल्यानंतर, उपआयुक्त कार्यालयाने, संबंधित क्षेत्रिय कार्यालयातील अभियंत्या...
कॉंग्रेसवाले एकटा चलो रे….

कॉंग्रेसवाले एकटा चलो रे….

राजकीय
मुंबई/दि/कॉंग्रेसची देशातील सत्ता गेली, राज्यातीलही गेलीच होती. पुणे महापालिकेसह राज्यातील बहुतांश महापालिकेतील सत्ता गेलेली आहे. दोन चार पक्षांच्या कुबड्या घेवून हा पक्ष निदान कसा बसा सत्तेत असतांना, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेता असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कॉंग्रेसच्या पुढार्‍यांना हसावे ही रडावे अशी अवस्था झाली आहे. एवढी रक्कम खर्च करून नगरसेवक तरी होणार का ही भिती सध्या तरी पुण्यातून दिसून येत आहे.राज्यात सरकार चालवताना जरी तिन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील वाद कधी लपले नाहीत, त्यामुळेच कॉंग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने राज्यातल्या नेतृत्वाने हलचालीही सुरू केल्या आहेत, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं प्रदेश ...