Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

पुणे महापालिकेत विविध पदांची नोकरभरती, सर्व खात्यांकडून रिक्त पदांचा तपशील मागविला

पुणे महापालिकेत विविध पदांची नोकरभरती, सर्व खात्यांकडून रिक्त पदांचा तपशील मागविला

शासन यंत्रणा
पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महापालिकेत नोकर भरती करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या १४ डिसेंबर २०२१ च्या पत्रानुसार मान्यता देण्यात मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात पुणे महापालिकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने, सर्व खातेप्रमुखांना एक परिपत्रक पाठविले असून, त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या विभागाकडील रिक्त पदांचा तपशील तातडीने कळविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या पत्रात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी संवर्गनिहाय बिंदू नामावली नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना कुठल्या पदांची आवश्यकता आहे याची माहिती घेवून सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने पुणे महापाकिलेच्या वेगवेगळ्या विभागांनी महाराष्ट्र शासन यांनी मान्यता दिलेल्या आकृतीब...
पुण्याच्या पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मध्ये , पोलीस व गुन्हेगारांची संयुक्त आघाडी

पुण्याच्या पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मध्ये , पोलीस व गुन्हेगारांची संयुक्त आघाडी

सर्व साधारण
परिमंडळात दोनच भारी-एक समर्थ आणि दुसरे खडक पुणे/दि/ प्रतिनिधी/कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे या दोन मुख्य कामांसाठी पोलीसांची कर्तव्यावर नेमणूक केली जाते. परंतु पोलीस आणि गुन्हेगार एकत्र येवून संयुक्त आघाडी उभी करीत असतील तर त्यावर कारवाईसाठी नेमक्या कोणत्या पोलीसाची नियुक्ती करायची.एक पोलीस दुसर्‍या पोलीसाची सुपारी देत असेल, एक पोलीस हद्दीतील व हद्दीबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या इसमांना नियुक्तीवरील हद्दीत बेकायदा व गैरधंदे करण्यासाठी भागीदारी करीत असेल तर त्यावर कारवाई नेमकंपणाने कुणी करायची असा गहन प्रश्‍न आज निर्माण झाला आहे. मध्यवर्ती भारत सरकार आणि राज्य शासनाच्या सेवेतून आलेले वर्ग एक व दोन मधील अधिकारी स्वतःच्या मनाने निर्णयच घेत नसतील तर कारवाईची अपेक्षा शिपाई अंमलदाराकडून करायची काय…. पोलीसाने दिली दुसर्‍या पोलीसाची सुपारी - पुणे शहर पोलीस द...
जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!

राजकीय
‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी लागणारा खर्च करायला राज्य सरकार तयार असल्याचे सांगावे जेणेकरून केंद्राला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी लागेल आणि त्यातून आवश्यक असलेला इमपीरिकल डेटा प्राप्त होईल.’ मुंबई/दि/ राज्य सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेटवर धडकला. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसर घोषणांनी दणाणून सोडला.राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी आदेश लागू केला तरी ‘वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले होते. सकाळ पासून मुंबईत येणार्‍या वंचितच्या कार...
गुलटेकडी मार्केटयार्डातील भांडवलदारांच्या बेकायदा बांधकामांना सत्तेचे संरक्षण

गुलटेकडी मार्केटयार्डातील भांडवलदारांच्या बेकायदा बांधकामांना सत्तेचे संरक्षण

शासन यंत्रणा
पुणे/दि/ पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या गुळ भुसार व वेगवेगळ्या विभागात मोठ्या संख्येने अनाधिकृत व बेकायदा बांधकामे मोठ्या संख्येने झाली आहेत. तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात इथली शासन यंत्रणा कुचकामी ठरत आहे. बाजार समिती व पुणे महापालिका यांच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या आणभाका अनेक पत्रातून दिसून येत असला तरी कारवाई करतांना दोन्ही यंत्रणा मागे हटत आहेत. ही पिछेमुड धोरण नेमकं कुणासाठी व कुणाच्या सागण्यावरून होत आहे. झोपडपट्टी, चाळी किंवा पुण्यातील पेठांमध्ये घराच्या पुढे ओठा बांधला तरी दोन चार दिवसात अतिक्रमण म्हणून ते पाडले जाते. मग मार्केटयार्डातील बेकायदा बांधकाम पाडायला आता शासन निर्णय काढण्याची आवश्यकता आहे काय असा सवाल नागरीक करीत आहेत. त्यामुळे बेघरांवर जशी कारवाई केली, तसे बिनदिक्कतपणे अतिक्रमण करणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. ...
काय बाई सांगु, कस्स गं सांगू? कोंढवा कोरेगावात हुक्का भरलाया, मसाजचा साज चढलाया, काय बाई सांगु..

काय बाई सांगु, कस्स गं सांगू? कोंढवा कोरेगावात हुक्का भरलाया, मसाजचा साज चढलाया, काय बाई सांगु..

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/माझ्या डोळ्यात कचरा गेल्ला, कुणी येवोनी फुंकर्र घाला अशी आजच्या पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षकांची अवस्था झाली आहे. लॉकडाऊन नंतर तर सगळी कडे बेकायदा आणि अवैध धंद्यांचा पुर आला आहे. अधिकृत व्यवसाय कोणते आणि अवैध धंदे- व्यवसाय कोणते असा प्रश्‍न पडावा इतकं अंतर दोन्ही व्यवसायामध्ये आले आहे. कोंढवा-मुंढवा, कोरेगावपार्क-विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत तर कहर झाला आहे. हुक्का पार्लरवर युवकांचे तांडेच्या तांडेनशेसाठी धडकत आहेत, तर मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला महिलांचा अपव्यापार सुसाट वेगाने सुरू आहे. रशियन, उब्जेकेस्तान, कजाकिस्तान, क्युबा सारख्या राष्ट्रातील तसेच इशान्य भारताच्या बाजूकडील इतर राष्ट्रातील लहान मुली, बालके, युवती आणि ललनांचा मोठा बाजार सध्या विमानतळ, कोरेगावपार्क पोलीस स्टेशन हद्दीतील अपव्यपाराने व्यापला गेला आहे. त्यामुळे कारवाई करण्यात पोलीसांचे हात...
पोलीसवाल्या, सायकलवाल्या, बिरेक लाऊन थांब्ब , टोपी तुझी तर हातात माझ्या, व्हईल कस्सं रं काम …? जाऊया डबलशिट रं लांब लांब…लॉंब…वसुली करूया लांब लांब… लॉंब…

पोलीसवाल्या, सायकलवाल्या, बिरेक लाऊन थांब्ब , टोपी तुझी तर हातात माझ्या, व्हईल कस्सं रं काम …? जाऊया डबलशिट रं लांब लांब…लॉंब…वसुली करूया लांब लांब… लॉंब…

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/दरवर्षी डिसेंबर महिना उजडला की, पुणे शहर पोलीसांना बदलीचे वेध लागु लागतात. अमुकच एक पोलीस स्टेशन पाहिजे म्हणून पुण्यापासून मुंबईपर्यंत अनेकांच्या वार्‍या सुरू होतात. मंत्री आणि पुढार्‍यांच्या पायर्‍या झिजवु लागतात. थोडक्यात क्रिम पोलीस स्टेशन मिळावे म्हणून अनेकजन धडपड करीत असतात. आज तीच धडपड पुणे शहरातील बहुतांश सगळ्या पोलीस स्टेशनसहित गुन्हे युनिट व आयुक्तालयातील वेगवेगळ्या सेल मध्ये सुरू आहे. चौकातील कट्टयावर थांबुन माझे पोलीस स्टेशन फिक्स झाले, आता बघा फरासखान्याला आलोच म्हणून समजा… येरवड्यात आलोच म्हणून समजा… अशा गप्पा आता सुरू झाल्या आहेत. खरंच, पुण्या मुंबईच्या वार्‍या करून मनासारखे पोलीस स्टेशन मिळते काय, हा प्रश्‍न सर्वसामान्य पुणेकरांप्रमाणेच मलाही पडला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच आता या प्रश्‍नांची उत्तरे देणे संयुक्तिक ठरेल. ब...
कॉंग्रेस ची अवस्था जुन्या जमीनदारासारखी?

कॉंग्रेस ची अवस्था जुन्या जमीनदारासारखी?

राजकीय
घराणेशाही आणि एकाधिकारशाही यांचा अनिष्ट संगम असलेला पक्ष म्हणून कॉंग्रेसची ख्याती आहे. बिगरभाजपवादी पक्ष कॉंग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास करण्यास तयार नाहीत. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला घराणेशाहीचा मोह सुटत नाही. बहुतांश घटकराज्यांत भाजपची किंवा भाजपप्रणीत राज्य सरकारं असल्यामुळे राज्यपातळीवरील पक्षसंघटना डबघाईला आलेली आहे. आहेत त्या नेत्या-कार्यकर्त्यांत सुसंवाद नाही, अशा परिस्थितीत २५ वर्षांपूर्वी २८८ पैकी २०० आमदार असलेला कॉंग्रेस पक्ष आज केवळ ४४ आमदारांवर आलेला आहे. तरीही कॉंग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सातत्याने सांगणारे नाना पटोले ह्यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसच्या नशिबी राज्यात फरफटत जाणे एवढेच आहे. ह्या फरफटीला अधिकच गती दिली ती तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी. कहा है युपीए? यूपीए आता उरली नाही, असा जबरी टोला ममता बॅन...
महागाईचा महाउद्रेक

महागाईचा महाउद्रेक

राजकीय
पुणे/दि/अच्छे दिनाचे वादे करून लोकांना फसवणार्‍या केंद्रातील भाजपा सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवले नसून या महागाईत गरीब मात्र होरपळताना दिसत आहे. भारतातील महागाई १४.२३ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर गेली असल्याने आज गरीबासमोर जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.यापूर्वी डिसेंबर १९९१ मध्ये इतकी उच्चांकी पातळी होती. देशात घाऊक महागाई वाढण्याचा दर एप्रिलनंतर सलग दुहेरी अंकात आहे. केंद्राकडून मंगळवारी जारी घाऊक महागाईच्या आकडेवारीबाबत आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या, ‘अंदाजापेक्षा जास्त महागाई वाढली आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर ५ टक्केपेक्षा कमी होता. घाऊक महागाई १४ टक्क्यांवर गेली आहे. यामुळे आगामी दिवसांत सामान्य ग्राहकांवर त्याचा परिणाम होणे अटळ आहे. महागाई वाढीच्या आंतरराष्ट्रीय कारणांचा परिणाम फक्त भारतावरच झालेला नाही. सामान्यपणे महागाई वाढीचा कमी दर असलेल्य...
माहिती आयुक्तांच्या सुनावणीला पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांची दांडी,

माहिती आयुक्तांच्या सुनावणीला पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांची दांडी,

शासन यंत्रणा
अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्याकडून सज्जड दम, हजर राहून सहकार्य करा- अन्यथा कारवाईला समोरे जावे लागेल पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये कामचुकारीचा प्रादुर्भाव झाला आहे. कोणतंही काम आज कसं टाळावं याच उत्तम प्रशिक्षण पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांनी अवगत केलं आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेतील लोकशाही दिन असो की, माहिती अधिकाराचे प्रथम अपिल असो, एवढच कशाला विभागीय आयुक्त कार्यालयातील लोकशाही दिनाला देखील दांडी मारली जात आहे. आता तर चक्क माहिती आयुक्तांकडील द्वितीय अपिलाला देखील दांडी मारली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी कार्यालयीन आदेश थोडक्यात फर्मान जारी करून, अधिकारी व कर्मचार्‍यांना सज्जड दम भरला आहे. काय म्हणाले अतिरिक्त आयुक्त -पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे ...
पुणे महापालिकेच्या बांधकाम, विद्युत व यांत्रिकीच्या अभियंत्यांनो, बदलीच्या जागी हजर व्हा, अन्यथा…..

पुणे महापालिकेच्या बांधकाम, विद्युत व यांत्रिकीच्या अभियंत्यांनो, बदलीच्या जागी हजर व्हा, अन्यथा…..

शासन यंत्रणा
पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या बांधकाम, विद्युत व यांत्रिकी शाखेतील उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना बदली हा प्रकारच आवडत नाहीये. वर्षानुवर्षे एकाच खात्यात व एकाच विभाग-कार्यालयात राहण्याची सवय जडली आहे. नियुक्तीपासून रग्गड १०/१२ वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर, उपअभियंता पदापर्यंत संबंधित अभियंता महाशय, आहे त्याच कार्यालयात कार्यरत असतांना अनेकांनी अनेकांना पाहिले आहे. बदली आणि पदोन्नती झाली तरीही पगाराला बदलीच्या ठिकाणी व कामाला आहे त्याच कार्यालयात कार्यरत असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे आता प्रशासनाचे डोळे उघडले असून, बदलीच्या जागी रुजू न होणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या स्थापत्य अर्थात बांधकाम, विद्युत आणि यांत्रिकी संवर्गातील अभि...