Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

‘टेक फॉग’ ऍपच्या माध्यमातून भाजपाकडून फेक न्यूज आणि बीभत्स शिवीगाळ

नवी दिल्ली: ‘टेक फॉग’ नावाचे एक अत्याधुनिक व छुपे ऍप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरले जात असल्याचा दावा, स्वत: एक नाराज भाजप कर्मचारी असल्याचे सांगणार्‍या, Aरीींहळीहरीार०८ या निनावी ट्विटर अकाउंटने, एप्रिल २०२० मध्ये ट्विट्सच्या एका मालिकेद्वारे, केला होता. भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी, टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील प्रपोगंडा राबवण्याचे ण्याचे उद्दिष्ट या ऍपपुढे आहे, असेही दावा करणार्याने म्हटले आहे. एकप्रकारे त्याने भाजपाचा पर्दाफाश करत त्यांचा बेगडी मुखवटा टराटरा फाडला आहे.


या ट्विटर हॅण्डलने टेक फॉग या ‘छुप्या ऍप’चा उल्लेख केला होता. हे ऍप ‘रिकॅप्चा कोड्स बायपास’ करून वापरकर्त्यांना ‘टेक्स्ट्स व हॅशटॅग ट्रेण्ड्स ऑटो-अपलोड’ करण्याची परवानगी देते, असेही म्हटले होते. अशा प्रकारच्या ऍपचा उल्लेख आल्यामुळे ‘द वायर’चे लक्ष त्याकडे वेधले गेले आणि प्रस्तुत लेखाचे लेखक, या अज्ञात ऍपच्या अस्तित्वाचा तपास करण्याच्या उद्देशाने, ट्विटर अकाउंटमागील व्यक्तीपर्यंत पोहोचले.
त्यानंतर झालेल्या संभाषणांमध्ये, सोर्सने असा दावा केला की, टविटरवरील ‘ट्रेण्डिंग’ विभाग टार्गेटेड हॅशटॅग्जसह अनधिकृतरित्या ताब्यात घेणे, भाजपशी निगडित अनेकविध व्हॉट्सऍप ग्रुप्स तयार करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे तसेच भाजपवर टीका करणार्‍या पत्रकारांच्या ऑनलाइन त्रासाचे दिग्दर्शन करणे ही त्याची दररोजची कामे होती. ही सर्व कामे टेक फॉग या ऍपमार्फत केली जात होती.
भाजपने २०१९ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता कायम राखल्यास गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या देण्याचा वायदा आपले कथित सूत्रधार देवांग दवे यांनी केला होता. देवांग दवे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय सोशल मीडिया सचिव होते. ते सध्या भाजपचे महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापक आहेत. दवे यांनी मोठ्या पगाराची नोकरी देण्याचा वायदा पूर्ण न केल्यामुळे आपण ही माहिती उघड करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
पुढील दोन वर्षे संभाषणांची प्रक्रिया सुरूच राहिली. या जागल्याने (व्हिसलब्लोअर) केलेल्या आरोपांपैकी कोणत्या बाबींची पडताळणी होऊ शकते आणि कोणत्या बाबींची होऊ शकत नाही याची चाचपणी ‘द वायर’ची टीम या काळात करत होती. याशिवाय अशा प्रकारच्या ऍपचा सार्वजनिक संवादावर तसेच देशातील लोकशाहीच्या पावित्र्यावर अधिक व्यापक परिणाम कसा होऊ शकतो याचाही तपास सुरू होता.