
पुण्यातील पोलीस अधिकारी, तडीपार-मोक्कातील गुन्हेगारांच्या अलिशान वाहनातून
खाजगी कामासाठी फिरत असतील तर…
1.पुणे शहरातील अवैध धंदयाचे कर्दनकाळ व.पो.नि. श्री.राजेश पुराणिक2.राजेश पुराणिक यांच्यासह सार्वत्रिक बदलीबाबत गृहविभागास निवेदन3.स्थानिक पोलीस स्टेशन कडील अवैध धंदे कारवाई अधिकार काढून घ्यावेतपुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/कोरोना महामारी नंतर पुणे शहर हळुहळु पूर्वपदावर येत आहे. औद्योगीक कारखाने भांडवल आणि अकुशल कामगारांविना ओस पडू लागले असले तरी सुशिक्षित आणि डिग्य्रांची भेंडोळी घेवून फिरणाऱ्या बेरोजगारांची संख्याही कमी नाही. उच्च शिक्षण झाले असल्याने, अकुशल कामगारांचे काम करण्यास त्यांना कमीपणा वाटतो. त्यामुळे कामाच्या शोधात असतांना सोशल मिडीयावरील सर्वच प्रकारच्या जुगारात दिवस-दिवसभर मोबाईलवर गेमा खेळत बसलेले असतात. त्यातच लॉटरी सेंटरच्या नावाखाली एक आकडी चिठ्ठी, पणती- पाकोळी सारखे कॉम्प्युटरवरील सोरट, पारंपारीक मटका, त्यासोबतच तीन पत्ती, लाल-काला सारखे जबरी जुगार अड्डे दिवसेंदिवस वाढत चा...