Sunday, May 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील- कुप्रसिध्द अमोल आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर छापा कारवाई,

पुणे/दि/ प्रतिनिधी/
सोमवार दि. 20 जुन रोजी खडक पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला. कारवाई झाल्याची बातमी सर्वदूर पसरली, परंतु पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील प्रेस रूम पासून पोलीस स्टेशनपर्यंत कारवाईची माहिती कुणीच दिली नाही. त्यामुळे एक/दोन वृत्तपत्रे वगळता कोणत्याही वृत्तपत्रात वा मिडीयात ही बातमी प्रसिद्ध झाली नाही. गुन्हा दाखल झालेली बातमी पूर्णतः दडपण्यात आली होती. शुक्रवार पर्यंत आम्ही बातमीचा मागोवा घेत होतो, परंतु किती जणांवर गुन्हा दाखल झाला, एकुण मुद्देमाल, धंदयाच्या मालकाला अटक किंवा कसे याबाबत काहीच माहिती मिळाली नसल्याने थेटच सामाजिक सुरक्षा विभागात जावून माहिती घेण्याची वेळ आली. यापूर्वी देखील सहायक पोलीस आयुक्त गुन्हे पदावर श्री. बर्गे असतांना देखील असाच प्रकार घडला होता. आता देखील बातमी दडपण्याचे प्रकार सुरू आहेत. एक /दोन गुन्हेगार पकडल्यानंतर त्याचा गवगवा करणारे, 20/20, 25/ 25 गुन्हेगारांवर कारवाई केल्यानंतर, बातमी प्रेस रुम मधुन बाहेर येत नाही याच आश्चर्य वाटते. एवढं जीव धोक्यात घालुन, सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कार्यरत असतांना, त्यांनी केलेल्या कारवाईची व एफआयआर झालेल्या गुन्ह्यांची बातमी दडपून ठेवण्यात आली आहे. बरं …. कारवाई झाल्यानंतर, अवैध धंदे बंद होणे आवश्यक असतांना, पुनः दुपारनंतर धंदे आज शनिवार पर्यंत सुरू असल्याचे दिसून आले आहे. थोडक्यात पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कारवाई करीत असतांना, स्थानिक पोलीस स्टेशनकडून गुन्हेगारांवर कारवाई करून, अशा प्रकराचे धंदे पुनः सुरू होणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असतांना देखील, स्थानिक पोलीसच अवैध धंदेवाल्यांच्या पाठीशी उभे राहत असतील तर दाद मागायची कुठे हा प्रश्न अनुत्तरीत राहत आहे.


खडक पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाईची बातमी पोलीस आयुक्तालयातील प्रेस रूम सह मिडीयात देखील दडपण्यात आली आहे, काय आहे ही बातमी…
पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग या गुन्हे शाखेस अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, 398, गौरी आळी फूलवाला चौकाजवळ सोफा वाला बिल्डिंग च्या मागे गुरुवार पेठ, पुणे असलेल्या येथील पत्र्याच्या शेड मध्ये व बाहेर मोटरसायकलवर बसून सुरू असलेल्या मटका जुगार, पैशावर गैरकारदेशीरीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकून मटका जुगार वगैरे खेळणारे 8, खेळवणारे 6 व पाहीजे आरोपी 4 असे व 5 अनोळखी इसम ( पळून गेलेले ) एकुण 23 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5 व 12 (अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर ठिकाणी अटक/कारवाई केलेल्याआरोपीत इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
अ) मेन बाझार मटका जुगार घेणारे/रायटर्स/मॅनेजर्स
1) राजेश मधुकर शेळके, वय 42 वर्षे, धंदा- मटका रायटर, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे,(मोटारसायकलवर मटका जुगार घेणारे),
2) शंतनु विजय पंडित, वय 31 वर्षे, रा.ठी. 1343, सदाशिव पेठ, पुणे,(मोटर सायकलवर मटका जुगार घेणारे )
3) गजानन राम महाडीक, वय30 वर्ष, रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ ,पुणे, (मोटार सायकलवर जुगार घेणारा रायटर)
4) परशुराम भिकाजी कांबळे, वय 51 वर्षे, रा.1108 नाना पेठ, पुणे (मोटर सायकलवर मटका जुगार घेणारे )
पत्र्याच्या शेड मधील जुगार घेणारे रायटर्स
5) रिचर्ड अँथनी डिसूझा, वय 43 वर्ष, रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ, पुणे
6) उमेश नानाजी चौधरी, वय 47 वर्ष रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ ,पुणे
ब) पाहीजे आरोपी, जुगार अड्डा मालक
7) अमोल बाळासाहेब आंदेकर ,वय अंदाजे 45 वर्षे रा. फुलवाला चौक, जैन मंदिराचे पाठीमागे, गुरुवार पेठ, जुगार अड्डा मालक ,
8) मनोज ढावरे, रा. ठी. सर्वे नंबर 65, तळजाई माता वसाहत, पद्मावती, पुणे,धंदा जुगार अड्डा मालक
9) शकील शेख ,रां. मोमीनपुरा , (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) पुणे, धंदा जुगार अड्डा मालक,
10) रवींद्र रामभाऊ पवार, वय 55 वर्षे, रा. धोबी तालीम जवळ, रविवार पेठ, पुणे. धंदा जुगार अड्डा मालक,
क) पैशावर मेन बझार मटका जुगार खेळणारे खेळीं आरोपींची नांवे.
11) हर्शल सुनिल चित्ते, वय 32 रा. रविवार पेठ,
12) संजय गणपत रेनुसे, वय 50 रा. गुरुवार पेठ,
13) संजय सिताराम मेमाणे, वय 51 रा. रविवार पेठ
14) तन्वीर अमीर शेख, वय 34 रा. भवानी पेठ,
15) नजिर हुसेन मोमीन, वय 65 रा. शुक्रवार पेठ,
16) हुसेन जाफर कोटालीया, वय 32 रा.घोरपडी पेठ,
17) सुनिल चंद्रकांत पारखे, वय 43रा.शुक्रवार पेठ,
18) महमद फयूम जमीर अहमद अत्तार, वय 30 वर्षे, रा.लक्ष्मी नगर, धानोरकर कॉलनी, कोथरुड, पुणे,
(5 अनोळखी आरोपी, नाव पत्ता माहीत नाही, घटनास्थळावरून पळून गेलेले)
अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमांकडून, (6 रायटर व 8 खेळी व 4 पाहिजे आरोपी व 5 अनोळखी इसम (पळून गेलेले ) असे एकुण 23 आरोपी) रु.2,75,420/- रु.चा एकुण मुद्देमाल (त्यामध्ये रोख रु. 8920/- , तसेच रु. 60,500/- किंमतीचे 13 मोबाईल सेट्स व रु. 6000/- चे जुगाराचे साहित्य, 2,00,000/- किमतीच्या 4 मोटर सायकल्स) हस्तगत करण्यात आला आहे.
अटक/कारवाई केलेल्या आरोपीविरुद्ध खडक पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. 185 /2022, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 अ, 5 व 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाड सत्र सुरू असल्याने जुगार चालकांनी नविन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरू केला आहे. यात जुगार रायटर हा एखाद्या रीक्षात अथवा दुचाकी वर बसून खेळी कडून मटका व रक्कम स्विकारतो. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीवरून पसार होतात. पण आजच्या कारवाईत ज्या दुचाकीवरून मोबाईल मटका खेळला जात होता त्या दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.
खडक पोलीस स्टेशन स्वतः कारवाई करण्यास कसुरी व कर्तव्यात हयगय करीत असल्यामुळे खडक पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री. श्रीनिवास घाटगे, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, महिला पोलीस उप निरीक्षक पंधरकर, मपोहवा मोहिते, मपोहवा शिंदे ,पो.ना इरफान पठाण, पोना कांबळे, यांच्या पथकाने केली आहे.
विशेष म्हणजे मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार सदर कारवाई तीन परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांचे एक पथकही सहभागी झाले होते.

पुढील अंकात –
पोलीस विभागाकडून जशी बातमी प्राप्त झाली, तशीच्या तशी बातमी प्रसिद्ध केली आहे. बातमीमध्ये एक शब्दाचीही भर घालण्यात आली नाही. किंवा त्यातील एकही शब्द वगळण्यात आलेला नाही. दरम्यान कालपर्यंत अंडभुर्जीची गाडी लावणारा आज मटका क्षेत्रात एवढा पुढे कसा … कोण आहे जुगार अड्याचा पाठीराखा… जुगाऱ्यांशी खडक पोलीस स्टेशनचे कोणते संबंध आहेत काय, घोणे आणि बेग कोणत्या कर्तव्यावर आहेत… यासारखे मुद्दे बातमीच्या विश्लेषणात नमूद केले नाहीत. ते पुढील अंकात पाहूयात…