Friday, November 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Punecrime

राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजचा घाट म्हटलं की राजकारणातील सापशिडीचा खेळ समोर येतो. कात्रजचा घाट म्हटलं की, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या दगा फटक्याची तीव्र आठवण होते. कात्रजचा घाट म्हटलं की भंबेरी कशी उडते याचे अनुभव व आठवणी डोळ्यासमोर तर्रर्रपणे उभे राहतात. परंतु त्याच कात्रजच्या घाटाचा हिस्का जर शासनातील सरकारीबाबु लावत असतील तर जाब विचारायचा तरी कुणाला. सर्पउद्यानापासून ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि तिथून पुढे कात्रजच्या बोगद्यापर्यंत आणि व्हाया मांगडेवाडी,जांभूळवाडी, नऱ्हे यासारख्या एकूण 40 ते 45 हॉटेल कम ढाबा मध्ये दिवस रात्र बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री केले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यातून राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे तसेच पुणे शहर पोलीसातील ...
बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला जुगार अड्डयाची खबर, पण एकदाही कारवाई न्हाईपुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, संपूर्ण पुणे शहरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. स्वयंरोजगार सुरू करायचा तर बँका पायरीवर देखील उभे करीत नाहीत. अशा वेळी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे भाजीपाल्याची हातगाडी, कुठे चहा वडपावाची हातगाडी, कुठे नाष्ट्याची हातगाडी किंवा झालेच तर चायनिजची हातगाडी टाकुन धंदा करायचा म्हटला तरी भांडलासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. अशा वेळी भांडवल जमा करून धंदा सुरू केला तर प्रथम पुणे महापालिका आणि नंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे गैरमहसुली अंमलदार हप्ता वसुलीसाठी तत्काळ हजर असतात. आत्ता सुरू केली आहे, हप्ता कुठून देणार, मग कारवाईचे सत्र सुरू होते. ही अवस्था आज प्रत्येक काम करणाऱ्...
पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

पोलीस क्राइम
राज्याचे गृहमंत्री महोदय, पुण्यातील गुटखा विक्रीकडे लक्ष देतील काय…सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पान टपरी,चहा टपरीसह किराणामाल दुकानदार धर्म संकटातपोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यात गुटखाबंदी करून दहा पंधरा वर्ष उलटून गेले तरी पुण्यात गुटखा बंदी असल्याचे कुठे जाणवत नाही. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदी ही केवळ सरकारी कागदांवर असून, ती प्रत्यक्षात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक सामजिक कार्यकर्ते व संस्था गुटख्याबाबत तक्रार करीत आहेत. परंतु कारवाई होत नाही. मध्यंतरी कोंढवा व वानवडी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुटख्याची तक्रार केली तर त्यांच्या विरूद्ध मागाहून खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. थोडक्यात गुटखा बंदी आहे, परंतु ती केवळ कागदावर आहे हेच दाखवुन दिले आहे. सामाजिक क...
पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

पोलीस क्राइम
खडकीतील सराईत गुन्हेगाराचे विश्रांतवाडीमार्गे शिवाजीनगरात बस्तान, कोण तालेवार पोलीस अधिकारी पाठीशी आहे…?सहकारनगर पोलीसांनी तर कहर केला आहे…! नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/ Aniruddha Shalan Chavanपुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली असल्याचे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील मकोका, एमपीडीए व तडीपार गुन्हेगारांच्या संख्येवरून अनुमान काढण्यात येत आहे. पुण्याचे तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांच्या दोन अडीच वर्षाच्या काळात मकोका व एमपीडीए ने शतक गाठले होते. परंतु पाच सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या नुतन पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए चे अर्धशतक गाठले आहे. त्यांच्या दोन अडीच वर्षात काळात ते नक्कीच व्दिशतक काढतील असे त्यांच्या वेगवान कारभारावरून दिसून येत आहे. परंतु एवढी गुन्हेगारी पुणे शहरात नेमकी का वाढली… नवीन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलीस आणि कायदयाची भिती का वाटत ...
राज्यात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 11 टक्के वाढ; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी

राज्यात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 11 टक्के वाढ; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देशात महाराष्ट्राची पुरोगामी अशी ओळख असली तरी याच पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक विषमता अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या नागरीकांवर जातीय द्व्‌ेषातून अत्याचार करणे, सामाजिक बहिष्कार, बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रात 11 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत सन 2022 चा अहवाल 28 फेब्रुवारी 2023 रोजी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केला आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट हा विशेष कायदा 1989 मध्ये आला. कायद्याचे नियम 1995 मध्ये तयार झाले. सुधारित नियम 2016 ला लागू करण्यात आले. नव्या नियमावली अंतर्गत नियम 16 नुसार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार या समितीच्या बैठका दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये घेणे बंधनकारक आहे. तरीही अद्याप राज्यस्तरीय दक्षता ...
बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

बेरोजगारांनाच अवैध धंदे चालु करायला परवाना दया, पुण्यात एवढे क्राईम का वाढले?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल क्राईम आणि महाराष्ट्र क्राईम रेकॉर्डनुसार देशात व राज्यात गुन्हेगारी वाढली असल्याचे आकडेवारीनिशी प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान गुन्हेगारीमध्ये वाढ का होत आहे याबाबत पुणे शहर पोलीसांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. गुन्हेगारीतूनच अवैध धंदे व खाजगी सावकारी, कंपनी सावकारी अधिक वाढली लागली आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात बऱ्यापैकी वास्तवातील गुन्हेगारीचे चित्रण करण्यात आले आहे. थोडक्यात आर्थिक फायदयाकरीता गुन्हेगारी वाढली आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. आता त्यामध्ये पोलीसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायचे सोड...
पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती, पोलिसांची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या कामगार नाक्यावर थांबलेल्या महिला देखील सुरक्षित राहिल्या नाहीत असे आज पकडल्या गेलेल्या आरोपींच्या कृत्य व गुन्ह्यावरून दिसून येत आहे. दि. 24 जून रोजी एका कामगार महिलेस काम देतो असे सांगून चार अनोळखी इसमांनी रस्त्यावरून चालणाऱ्या एका चार चाकी प्रवासी वाहनातून संबंधित महिला कामगार व इतरांना घेऊन जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे गाडीतून उतरून, डोंगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर घेऊन जाऊन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट रोख असे एकूण 76 हजार रुपयांची जबरीने चोरी केल्याचा प्रकार घडला. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून लुटणाऱ्या...
हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा येथील नागपूर चाळीत डिसेंबर 2016 मध्ये एका महिलेस कार्यक्रमांमध्ये नाचत असताना धक्का मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जसप्रीतसिंग गुरुचरणसिंग बाला व अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे रा. 611 कासेवाडी, गणेश मित्र मंडळाशेजारी यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेली होती. गुन्हा नोंद झाल्यापासून अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा सात वर्षापासून फरार होता. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पाहिजे आरोपी म्हणून त्याला घोषित केले होते. दरम्यान गुन्हे युनिट एक ने फरार आरोपीस जेरबंद केले आहे. दि. 27 जुलै 2023 रोजी युनिट 1 कडील पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार श्री. अमोल पवार व श्री. अभिनव लडकत यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा येथील गुन्ह्यात सात वर्षांपासून फरारी असलेला आरोपी अजय उ...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलिसांची सराईत गुन्हेगारांसह, गुन्हेगारी टोळ्यांना हस्ते परहस्ते आर्थिक मदत… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. परंतु याच दहशतीचा वापर करून पुढे जाऊन मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थांची विक्री, पब, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, स्पा आदिंसारखे अवैध व बेकायदेशिर धंदे करून ह्याच गुन्हेगारी टोळ्या आर्थिक संपन्न होत आहेत. त्यात पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि अवैधपणे सुरू असलेले मटका जुगार अड्डे तातडीने बंद करण्याची सामाजिक स...
उस्मानाबाद येथून पळून आलेल्या गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीसांनी केले जेरबंद

उस्मानाबाद येथून पळून आलेल्या गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोन पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करून पुण्यात पळुन आलेल्या गुन्हेगाराला पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी जेरबंद केले आहे. शिराढोन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302, 364, 324, 323, 504, 506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार वय 26 वर्ष, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद यास गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी करता त्याने उस्मानाबद येथे गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद यांचे ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्निक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 05 श्री. विक्रांत देशमुख, सहाय्यक पो...