Monday, April 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात भाड्याने राहणाऱ्या नांदेड येथील आरोपींनी कामगार महिलेस लुटले, भारती विद्यापीठ पोलिसांनी लुटारू टोळीस केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती, पोलिसांची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या कामगार नाक्यावर थांबलेल्या महिला देखील सुरक्षित राहिल्या नाहीत असे आज पकडल्या गेलेल्या आरोपींच्या कृत्य व गुन्ह्यावरून दिसून येत आहे. दि. 24 जून रोजी एका कामगार महिलेस काम देतो असे सांगून चार अनोळखी इसमांनी रस्त्यावरून चालणाऱ्या एका चार चाकी प्रवासी वाहनातून संबंधित महिला कामगार व इतरांना घेऊन जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे गाडीतून उतरून, डोंगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर घेऊन जाऊन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट रोख असे एकूण 76 हजार रुपयांची जबरीने चोरी केल्याचा प्रकार घडला.

फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून लुटणाऱ्या टोळी विरुद्ध भादवि कलम 392 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान दाखल गुन्ह्याचा तपास करीत असतांना, आरोपी मिळून आले आहेत. या तपासा मध्ये 1) नितीन साहेबराव चव्हाण (वय 30 वर्ष) रा. कांबळे बाई यांच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने, सहयोग नगर वारजे माळवाडी, मूळ राहणार नांदेड 2)  संतोष नागोराव कानवडे वय 20 वर्ष, रा. सदर, मूळ राहणार नांदेड 3) सुकलाल बाजीराव गिरी वय- 19 वर्ष, रा. सदर, मूळ राहणार नांदेड 4) सुनील नारायण गिरी वय- 19 वर्ष, रा. सदर. मूळ राहणार नांदेड यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना या गुन्ह्यांमध्ये अटक करून गुन्ह्यात चोरी केलेले दोन सोन्याचे मंगळसूत्र, दोन जोड कानातील फुले असा एकूण 76 हजार रुपयांचा मुद्देमाल हास्तगत केला आहे.

 ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. विजय पुराणिक, श्री. गिरीश कुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल रसाळ, पोलीस अंमलदार शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधूत जमदाडे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, अभिनव चौधरी, आशिष गायकवाड, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.